प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जन्म प्रमाणपत्र पहिले जन्म दिनांक व ठिकाण दाखविणारे महत्वाचे ओळखपत्र आहे. शासकीय विविध योजनांचा सेवा सवलतीचा फायदा घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.मतदान अधिकार प्राप्ती,शाळेत प्रथम प्रवेश, कायदेशीर विवाह वय प्रमाणित करण्यासाठी, वंशगत संपत्ती अधिकार प्राप्ती, पासपोर्ट इ.कारणांसाठी जन्म प्रमाणपत्र म्हह्त्वाचा पुरावा आहे.जन्म दाखला प्राप्तीच्या दृष्टीने ग्रामपंचायत ,नगरपालिका व महानगरपालिका द्व्यारे स्वतंत्र नोंदनीकक्ष स्थापन केलेला असतो. जन्म प्रमानपत्र प्राप्त करण्यासाठी प्रथम ज्या रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले आहे तेथे जन्म नोंदणी करणे आवश्यक आहे.प्रमाणित जन्म दाखला मिळविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून २१ दिवसाच्या आत स्थानिक जन्म नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावा संबंधीत अधिकार ज्या रुग्णालयातील रेकॉर्डची सत्यता पडताळणी करून जन्म प्रमाणपत्र देईल.जर निर्धारित मुदतीच्याआत नोंदनी झालेली नसेल तर राजस्व अधिकारयाच्या आदेशाने पोलीस द्वारे प्रमानीत प्रतिज्ञापत्र केल्यानंतर जन्म प्रमाणपत्र काढता येते.६ वर्षे पूर्ण असूनही जन्म दाखला नसेल तर पुढील कागदपत्र जमवावे लागतात आणि दाखला काढता येतो.

१.विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टंप सह रु.१०० च्या बोंड पेपरवर शपथपत्र.

२.ग्रामसेवकाचा दाखला

३.गावाचे सरपंच किंवा वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र.

रेशनिंग कार्डला नागरिकाच्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे.आणि आता तर अन्न सुरक्षा विधेयकामुळे रेशनकार्ड अत्यावशक कागदपत्रांपैकी आहे. तसेच शासकीय बहुतांशी दाखले व परवाने प्राप्तीसाठी रेशनिंकार्ड ची मागणी केली जाते.थोडक्यात आपला परिचय साधन म्हणूनही रेशनकार्ड वापरता येते.मतदान यादीत नाव समाविष्ट करणे,रहिवाशी प्रमाणपत्र प्राप्त करणे,पासपोर्ट काढणे,बँकेत खाते उघडणे इ.साठी रेशनकार्ड आवश्यक असते.या घटकांचा विचार करता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग यांच्या द्वारे दिनांक २९ जून २०१३ रोजी नवीन रेशनकार्ड देताना कोणती कागदपत्र असावित या बाबत शासन निर्णय झाला.त्यानुसार…