महाजोब्स भरती ( येथे क्लिक करा : https://mahabharti.in/mahajobs-portal-registration/ )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महा जॉब्स’ पोर्टलचं लोकार्पण केले . राज्यातल्या उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाजॉब्स’ पोर्टलचे राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे हा देखील    उद्देश आहे. नोकरी शोधणा-या कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा हा सातत्याने प्रयत्न आहे.काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमीपुत्रांना  पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी अशी अपेक्षा आहे . तसेच सरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी महाभरती अँप येथून डाउनलोड करा,म्हणजे आपणास नोकरीचे सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील.

या पोर्टलची उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः

– नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा.

– निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.

– उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे.

– महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे.

महाजॉब्स काय आहे?

‘महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि खेड्यापाड्यातील ग्रामीण आणि शहरी युवकांना त्यांच्या कौशल्याला साजेसा सर्वोत्तम जॉब मिळवण्याची व यशस्वी करिअर घडवण्याची संधी महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या युवकांना प्रगतीपासून आणि औद्योगिक क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग घेण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. जर त्यांनी त्यांच्या कौशल्याला मेहनतीची जोड दिली तर त्यांच्या प्रगती पुढे आकाश ठेंगणे होणार आहे. महाराष्ट्राला प्रगतीच्या पुढच्या पातळीवर घेऊन जाणे हेच आमचे स्वप्न आहे औद्योगिक विकासासाठी घेत असलेल्या मेहनतीशिवाय पुढील सर्व आव्हानांना तोंड देत पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे,’ अशा शब्दात राज्य सरकारने या पोर्टलचे उद्दिष्ट स्पष्ट केले आहे.

Ejanseva Teamन्युज अपडेट
महाजोब्स भरती ( येथे क्लिक करा : https://mahabharti.in/mahajobs-portal-registration/ ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महा जॉब्स’ पोर्टलचं लोकार्पण केले . राज्यातल्या उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या 'महाजॉब्स' पोर्टलचे राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या...
Ejanseva.com is Free Informative blog portal for all Indians. People can submit articles, content to us. We check & unique useful post publish with your name as author.
Topics - Current Affairs | Social | Politics | Agriculture | Sports | Educations | Festivals | Historical | Online Internet and many more useful
Like, Share, Follow, Subscribe, Contribute & Get Rewarded from Ejanseva Submit Article Now