आयुष्यावर बोलू काही…

Devesha
By Devesha
17 Min Read
आयुष्यावर बोलू काही

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे “स्ट्रेस”(ताण) हा शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतो. कोणाला शारीरिक ताण तर कोणाला मानसिक ! या ना त्या कारणाने आपण सगळेच तणावग्रस्त आहोत किंवा झाले आहोत की काय असे वाटायला लागले आहे. या सगळ्याचे मूळ मानसिक तणावच आहे असे आता निदर्शनासही आले आहे.

मूळात प्रश्न हा आहे की हा ताण निर्माण कशाने होतो?  तशी बरीच कारणं देता येतील…कधी आपल्या अपेक्षा आणि त्यांची पूर्तता यात न बसलेला ताळमेळ तर कधी विश्वासाला गेलेला तडा..एक ना अनेक..थोडक्यात काय तर प्रामुख्याने आपल्या मनाला पवनकुक्कुटाप्रमाणे वारा येईल त्या दिशेला भरकटण्याच्या लागलेल्या सवयीने ही समस्या निर्माण झालेली दिसून येते.ईजनसेवा१ 1

स्ट्रेस मॅनेजमेंट करावयाचे असेल तर ध्यान हा उत्तम उपाय आहे असा बोलबालाही आपल्याला सर्वत्र ऐकू येतो.पण ध्यान करणे म्हणजे नेमके काय? इंग्रजीत ध्यानाला Meditation म्हटले आहे. Meditation या शब्दाच्या dictionary meaning नुसार Meditation is nothing but continuously thinking about something ! म्हणजेच सतत एकाच गोष्टीचा विचार करणे म्हणजेच ध्यान असा ध्यानाचा ढोबळ अर्थ !

मग कुणी पैशावर ध्यान करत असेल तर कुणी खेळावर. अर्थात प्रत्येकजण कशाना कशाचा सतत विचार करीत असतो म्हणजेच ढोबळ अर्थाने ध्यानच करीत असतो. विचार करणे हा मनाचा स्थायीभाव आहे मग त्याला चिरडून किंवा मारून आपल्याला जे साध्य करावयाचे आहे ते कसे साध्य करता येईल?

मनाला आपला मित्र बनवूनच हे शक्य होईल.ज्याप्रकारे सुसाट वाहणार्‍या नदीच्या प्रवाहाला योग्य दिशेने वळविले असता तिचा उपयोग जनकल्याणाकरिता करता येऊ शकतो त्याच प्रकारे आपल्या मनाचा नियमनाद्वारे आपल्याच कल्याणाकरिता उपयोग केला जाऊ शकतो.

मनाचे नियमन त्याला योग्य विचाराची दिशा देऊन आणि योग्य विचारावर स्थिर करून ध्यानद्वारे सहज साध्य होऊ शकते.पण जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा खरी परीक्षा सुरू होते. डोळे मिटून बसल्यावर आपल्या मनात अक्षरशः विचारांचं काहूर माजतं.म्हणजे डोळे उघडे असताना येणार नाहीत एवढे विचार डोळे बंद केल्यावर येतात.

मग करायचं काय? अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं.जसे एखादी व्यक्ती नको असताना आपल्या घरी आल्यास आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अगदी तसेच आपल्या विचारांच्या बाबतीतही करायचे. म्हणजे आपोआपच विचारांची निर्मिती बंद होऊन मन निर्विचार होण्यास सुरुवात होते.अश्या तर्‍हेने काही दिवस नियमितपणे अभ्यास चालू ठेवल्यास ध्यान करणे सोपेच नाही तर आनंददायी बनते.

मग ताण्,स्ट्रेस अश्या शब्दांना आपल्या आयुष्यात काही महत्त्वच उरत नाही.म्हणूनच ध्यानामुळे होणार्‍या या फायद्याकडे पहाता ध्यान ही काळाची गरज होती , आहे आणि राहील असेच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जीवनात उत्साह आणि उत्सव असायला हवा. परमेश्वराने मनुष्य जन्म हा मोकळेपणाने हसायला, उत्सव साजरा करायला, मनोरंजन करायला आणि खेळण्यासाठी दिला आहे. सर्व हिंदू सण आणि संस्कारांमध्ये समतोल राखून नृत्य, संगीत आणि पदार्थांचा सामंजस्याने समावेश केलेला आहे. उत्सवामुळे जीवनात सकारात्मकता येते. भेटीगाठी वाढतात आणि अनुभवाची समृद्धी येते.

जीवन जगणं ही देखील एक कला आहे. उदा. ड्रायव्हिंग न शिकलेल्या चालकाच्या हातात एखादी महागडी दिली तर तिचे नुकसान होणार हे ठरलेलेच आहे. जीवनात ज्ञान, बुद्धी, विश्वासाशिवाय तुमच्या इच्छेचेही योगदान असते. योग्य ज्ञान आणि पूर्ण विश्वास यांच्या जोडीला सकारात्मकता नसेल तर तुम्हाला सतत अपयश येत राहते. याचे कारण अनेकजण जीवन म्हणजे एक संघर्ष आहे असे मानतात.हिंदू धर्मानुसार, जीवन एक उत्सव आहे.

संघर्ष सतत सुरू असतो किंबहुना आपण स्वत:च जीवनाला संघर्षपूर्ण करत असतो. पण जीवनाला उत्सवाचे रूप देणे हा देखील जीवन जगण्याच्या कलेचा एक भाग आहे. गीत, भजन, नृत्य, संगीत आणि कला यांच्या धर्मात उल्लेख आढळतो कारण जीवन एक उत्सव आहे. काही धर्मात नृत्य, संगीत आणि कलेवर निर्बंध आहेत. यामुळे समाज बिघडतो असा काही लोकांचा समज आहे.

आज क्रोध, सामाजिक द्वेष, हावरटपणा, युद्ध आणि अनेक प्रकारच्या विषारी विचारधारांमध्ये लोकांना असहाय्य वाटते आहे. डोक्यावरचा भार इतका वाढला आहे की, आता माणसे सामूहिक आत्महत्या करायला लागली आहेत. त्यांच्या डोक्यात सतत विचारचक्र सुरू असते. प्रेम, द्वेष, अपमान, बदला, गुन्हेगारी, नैराश्य अशा अनेक गोष्टींच्या दडपणाखाली लोक कसेबसे जीवन जगत आहे.

मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा अशा ठिकाणी गेल्यावरही त्याचे मन शांत राहात नाही. जीवन जगण्याची कलाच जणू त्यांना अवगत नाही, असे वाटते. रामायण आणि महाभारत हे आपले ग्रंथ आहेत. यात व्यक्तिगत जीवन, कुटुंब, समाज आणि राष्ट्र अधिकाधिक सक्षम करण्याची अनेक सूत्रे सांगितलेली आहेत. तुम्ही कोण आहात हे जाणून घेण्यासाठी तुमच्या आत्म्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन असायला नको. उपनिषद आणि गीतेत हीच शिकवण दिलेली आहे. यातून आपण जीवन जगण्याची कला शिकतो.

जीवन हे परमेश्वराचे दुसरे रूप आहे, असे हिंदू धर्म मानतो. आयुष्याचा शोध घ्या. त्याला अधिकाधिक सुंदर बनवा. त्यात सत्य, शुभचिंतन, सौंदर्य, आनंद, प्रेम, उत्सव, सकारात्मकता आणि ऐश्वर्याचा समावेश करा.अर्थात, या साऱ्यासाठी नियमांचीही आवश्यकता आहे. नाहीतर या सर्व गोष्टी अनैतिकतेत परावर्तित होतात.  प्रत्येक धर्मात ध्यान आणि योगाचे काही विधी सांगितलेले आहेत.

हे विधी आपण आवश्यकतेनुसार आपलेसे केले आहेत असेही म्हणता येईल. पण जीवन जगणं ही एक कला हे या ठिकाणी नमूद करावे लागेल. ही विद्या आपण योग्य रितीने समजून घेतली तर या जीवनात काहीही अशक्य नाही.

बऱ्याचदा आयुष्यात सर्व काही निरर्थक वाटायला लागतं. त्यावेळी सर्वात जास्त गरज असते ती आपल्या आजूबाजूला चांगल्या माणसांची आणि चांगल्या प्रेरणादायी विचारांची. कारण माणूस हा असा प्राणी आहे ज्याचं संपूर्ण जग हे विचारांवर चालू असतं.

आपण आपल्या आजूबाजूला जशी माणसं पाहतो किंवा त्या माणसांमध्ये वावरतो तसंच आपले विचारही असतात.त्यामुळेच मराठीमधील एक उक्ती आहे, जशी संगत तसा विचार त्याप्रमाणे आपण वागत असतो. त्यामुळे मुळात चांगली संगत असेल तर विचारही चांगले राहतात हे महत्त्वाचं आहे.

बरेचदा माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे चढउतार येत असतात. अशावेळी खचून जाणं हे साहजिकच आहे. पण अशावेळी मनाची समजून घालत आपल्याला असे प्रेरणादायी विचार मराठी हे जगण्याला अधिक बळ देत असतात.शिवाय संकटाचा सामना करण्याची ताकद देत असतात. असे मराठीमध्ये कोणते प्रेरणादायी विचार आहेत आणि त्याचं आपल्या आयुष्यात नेमकं काय स्थान आहे हे आपण जाणून घेऊया.

प्रेरणादायी विचारांची गरज काय? (Importance Of Inspirational Quotes In Marathi)

वास्तविक आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की, आयुष्यात प्रेरणादायी विचारांची अशी वेगळी गरज काय आहे? पण खरं सांगू का मैत्रिणींनो. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी वाईट परिस्थिती येतेच. मग ती शारीरिक असो, भावनिक असो वा आर्थिक असो. प्रत्येक माणूस या परिस्थितीतून जातोच.

या जगात असा एकही माणूस नाही ज्याला कधी दुःखाचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे असे प्रेरणादायी विचार मराठी आपल्याला जगायला बळ देतात आणि अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत करत असतात. या विचारांनी आपल्याला जगायला आणि त्या संकटांचा सामना करायचं बळ मिळतं.

आंतरराष्ट्रीय योग दिवस -२१ जून

काही लोकांना हे फक्त संवाद वाटतात पण हे खरं आहे की, त्या परिस्थितीतून जात असताना अशी वाक्यच असतात  जी पुन्हा यातून उभं राहण्यासाठी बळ देत असतात. ती एक प्रकारे आपलं आयुष्य बुस्ट करत असतात. अर्थात आपल्या आयुष्याची गाडी पुढे ढकलायला मदत करत असतात.

 1. स्वत:ला कमी लेखणं सोडा

बऱ्याचदा अशी परिस्थिती येत असते की, संकटं ही एकामागून एक येत असतात. अशा वेळी स्वतःला कसं सांभाळायचं हे कळत नसतं. कोणी काही सांगितलेलं पटतही नसतं. सतत स्वतःला दोष देत माणसं जगायला लागतात.पण अशा वेळी खरं तर परिस्थिती काहीही असो स्वतःला कमी लेखणं सोडा.

कारण तसं करत राहिल्यास, तुमचा आत्मविश्वास कमी होऊन काहीही करण्याची उमेद राहात नाही. शिवाय सतत स्वतःला कमी लेखत राहिल्यामुळे पुढे काय करायचं आहे हे विचार करण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे अशावेळी स्वतःला बढावा देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी स्वतःला कमी लेखणं सोडून द्या.

 1. स्वत:च स्वत:ला गृहीत धरणं सोडा

कोणत्याही वाईट गोष्टीसाठी काही माणसं स्वतःला सतत दोष राहतात. त्यामुळे सतत त्याच गोष्टीचा विचार त्यांच्या मनात येतो. या विचारांमुळे सर्वच गोष्टी चुकीच्या ठरतात. कारण कोणतीही गोष्टी करायला जाण्याआधी आपण हा निर्णय चुकीचा घेतला असणार असंच या व्यक्तींच्या मनामध्ये येत राहतं.

त्यामुळे स्वतःच स्वतःला गृहीत धरणं सोडा. तुम्ही जितकं स्वतःला अशा गोष्टींमध्ये गृहीत धरणार तितकं लोकही तुम्हालाच दोष देणार. त्यामुळे नक्की परिस्थिती काय होती आणि आपण काय केलं किंवा समोरच्या व्यक्ती कशा वागल्या याचा सारासार विचार तुम्ही करायला हवा.

 1. इतरांशी सतत तुलना करणं टाळा

आपल्यापेक्षा दुसरी व्यक्ती कशी सरस आहे हे सतत शोधू नका. कारण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. त्यामुळे आपलं महत्त्व स्वतः जपा.मुळात कधीही दुसऱ्यांशी तुलना करणं चांगलं नाही. त्यामुळे तुम्ही जर हे करत असाल तर यामध्ये तुमचंच नुकसान आहे.

 1. एखाद्या समस्येवर रडण्यापेक्षा त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करा

कोणत्याही गोष्टीवर रडत बसणं हा उपाय कधीच असू शकत नाही. त्यामुळे आपल्याबरोबरच हे का घडलं किंवा अजून काहीतरी सतत विचार करून रडणं टाळा.बऱ्याचदा काही गोष्टीवर काहीच उपाय नसतो हे आपल्याला जाणवतं. त्यामुळे असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हादेखील रडू नका. कारण कितीही रडून त्यावर तोडगा तर निघणार नाही.त्यामुळे त्यावर दुःख करत बसण्यात आणि ते उगाळण्यात काहीही अर्थ नाही.

 1. चुकतो तो फक्त आपला निर्णय

कोणतीही गोष्ट बिघडते तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला निर्णय चुकलेला असतो. त्यामुळे त्यासाठी कोणाला दोष देत बसू नका. दुसऱ्यांना दोष दिल्याने काहीही बदलणार नसतं. वेळ निघून गेलेली असते आणि निर्णयही घेतलेला असतो. त्यामुळे आपल्याला हे माहीत असायला हवं की, जो काही निर्णय घेतला गेला आहे तो सर्वस्वी आपला आहे.त्यामुळे काही झालं तरी चुकतो तो फक्त आपला निर्णय असतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

 1. नशीबाच्या आहारी जाणे

कर्तृत्ववान माणसं कधी नशीबाच्या आहारी जात नाहीत आणि नशीबाच्या आहारी गेलेली माणसं कर्तृत्ववान ठरत नाहीत‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ ही म्हण अर्थातच आपण सगळेच लहानपणापासून ऐकतो. पण तसं वागणारी माणसंही आहेत. तुम्हाला जर खरंच कर्तृत्व गाजवायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही.केवळ नशीबावर अवलंबून राहणं योग्य नाही. कारण जर तुम्ही फक्त नशीबावर अवलंबून राहिलात तर तुम्हाला कधीच एका उंचीवर पोहचता येणार नाही.

 1. तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार कधीच करू नका

आपण काहीतरी वेगळं करत असू आणि समोरचा माणूस स्तुती करत असेल तर आपल्यावर जळणाऱ्या वक्तींची संख्या खूप जास्त प्रमाणात असते. पण त्यासाठी त्या व्यक्तीचा तिरस्कार कधीही करू नका.कारण त्या व्यक्तीकडे ही गोष्ट समजून घेण्याची तितकी ताकद नसते आणि मुळात आपल्याला त्या पातळीला उतरण्याची काहीच गरज नाही हे समजणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.

कारण ती समोरची व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट समजते तेव्हाच जळू शकते. त्यामुळे तुम्ही सरस आहात आणि तुमच्या कामात योग्य आहात हेच सिद्ध होतं. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाणंच जास्त योग्य आहे.

 1. आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा

तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी जर खूप प्रयत्न करावे लागत असतील तर हरू नका. ते प्रयत्न करत राहा. तुम्हाला सतत संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा.कारण संघर्षातूनच माणूस शिकत असतो. त्याला स्वतःला निर्णय घ्यायची आणि होणाऱ्या परिणामांची जाणीव ही संघर्षातूनच होत असते. आयतं कमावून ठेवलेलं किंवा संघर्षाशिवाय एखादी गोष्ट मिळाली तर त्याची माणसाला किंमत नसते.त्यामुळे संघर्ष हा अशाच व्यक्तींच्या वाट्याला येतो जो त्यातून बाहेर पडण्याची हिंमत ठेवतो. संघर्षाकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

 1. संकटाबरोबर नेहमी संधी येते

खरं तर संकटात आपण डगमगून जातो. पण प्रत्येक संकटाबरोबर एक संधी तुम्हाला आयुष्यात चालून येत असते. त्यामुळे डगमगून न जाता तुम्ही त्या संकटात धीराने उभं राहून संधीचं सोनं करायला हवं.आपली विचारशक्ती शाबूत ठेऊन कितीही संकट आलं तरीही परिस्थितीचा सामना करत उभं राहिलं पाहिजे. जेणेकरून या संकटातून बाहेर येऊन तुम्ही आलेल्या संधीचा खूपच चांगला फायदा करून घेऊ शकता.ज्याला साधारणतः आयुष्यात दुसरी संधी असं म्हटलं जातं आणि सहसा अशी संधी आली की, आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळत असते.

 1. स्वप्न तीच आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत

प्रत्येकाला आयुष्यात स्वप्न पडत असतात. पण झोपल्यावर पडणारी स्वप्न वेगळी आणि उघडया डोळ्यांनी पाहायची स्वप्न वेगळी. कारण उघड्या डोळयांनी पाहिलेल्या स्वप्नांना एक दिशा असते आणि अशीच स्वप्न असतात  जी तुम्हाला झोपू देत नाहीत आणि तुम्हाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन पोहचवतात. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक प्रेरणादायी वाक्य नक्कीच आहे. कारण प्रत्येक माणसाचं स्वप्न मोठं व्हायचं नाव कमावण्याचं असतं. पण यश त्यालाच मिळतं जो या स्वप्नांच्या मागे न झोपता अर्थात खऱ्या अर्थाने मेहनत करून लागतो.

 1.   गुणवत्तेवर कोणी शंका घेत असेल तर घेऊ द्या

तुमच्या गुणवत्तेवर कोणी शंका घेत असेल तर घेऊ द्या, कारण शंका ही सोन्याच्या शुद्धतेवरच घेतली जाते, लोखंडाच्या नाही हे वाक्य नेहमीच जगायला बळ देतं. कारण निंदकाचे घर असावे शेजारी असं मराठीमध्ये म्हटलं जातं आणि ते खरंच आहे.आपले पाय नेहमी जमिनीवर राहायला हवे असतील तर आपल्यातले दोष सांगणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला हव्या हे नक्की.त्यामुळे त्यांना आपल्या गुणवत्तेवर जितकी शंका घ्यायची असेल घेऊ द्या. त्यामुळे अधिक जोमाने आपल्याला हव्या त्या योग्य गोष्टी करायला आपल्याला बळ मिळतं हे नेहमी लक्षात ठेवा.

महाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच – आजच करा नोदणी !

 1. अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा

प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी अपयशाला सामोरं जाव लागतंच. पण अपयश आलं आहे म्हणून खचून न जाता, जिद्दीने ते अपयश परतवायची ताकद ठेवा.कितीही मोठं अपयश असो त्यातून जिद्दीने बाहेर येणं गरजेचं आहे. हे सतत स्वतःला समजावत राहिल्यास, तुम्ही पुन्हा एकदा नव्याने उभं तर राहताच. शिवाय तुम्हाला तुमच्यामधील असलेली जिद्द आणि चिकाटीची जाणीवही नव्याने होते.

 1. काळ्याकुट्ट रात्रीनंतर सूर्य उगवतोच

बऱ्याचदा सतत काही ना काहीतरी आपल्या मनाविरुद्ध घटना आयुष्यात घडत राहतात. पण त्याने खचून जाणं योग्य नाही. कारण जसा रोज सूर्यास्तानंतर सूर्योदय होत असतो. तसंच वाईट दिवस सरतात आणि चांगले दिवस येणार असतात. हा केवळ प्रेरणादायी विचारच नाही तर हे लोकांचे अनुभवही असतात. आयुष्य कायमस्वरूपी एकसारखं राहत नाही.तर प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाच्या सारीपाटाचा खेळ हा चालू राहतोच. जेव्हा वाटतं की, सर्व संपलं आहे तेव्हा स्वतःलाच हे समजावत राहणं गरजेचं आहे की, काळ्याकुट्टा रात्रीनंतर सूर्य हा उगवणारच आहे.

 1. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही

हे शंभर टक्के प्रेरणादायी वाक्य आहे. कारण ज्यांना स्वतःवर विश्वास असतो. ते दुसरे किती बलशाली आहेत याचा अजिबात विचार करत नाहीत. कारण त्यांना आपण काय करतो याकडे जास्त लक्ष द्यायचं असतं. स्वतःचं आयुष्य जास्त महत्त्वाचं. हा विचार प्रत्येकानेच अंगी बाळगायला हवा.

 1. आपल्या कामामध्ये आनंद घेणं हेच समृद्धी असण्याचं लक्षण

ज्यांना आपल्या कामात आनंद मिळतो त्या व्यक्ती सुखी असतात. कारण इतर गोष्टींमध्ये नाक खुपसत राहण्यापेक्षा आपण भले आणि आपलं काम भले यामध्ये कधीच कोणाचं नुकसान होत नसतं.शिवाय काम हीच पूजा असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या जीवनात कायम समृद्धी राहते.

काही लोक  खुप ताण तणावात असतात कि ज्यांच्याकडे कोणी गप्पा मारायला  ,मन मोकळे करायला ,आपले प्रोब्लेम्स सांगायला . असे कोणी जवळचे नसते.मग अश्या परिस्थिती मध्ये ते एकदम टोकाचे निर्णय घेतात.तो म्हणजे आत्महत्या करणे.पण मित्रानो आयुष्य संपवणे हा काय त्यावर शेवटचा पर्याय असू शकत नाही.असे खुप उदाहरण आपल्या समोर आहेत कि त्यांनी शेवटी  त्यांचे आयुष्य संपवले.

ह्यात काही गरीब तर काही श्रीमंत लोक आहेत.त्या प्रेत्येकाच्या  अडचणी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा शेवट हा आत्महत्या करणे  हा होता.म्हणूनच मित्रानो आपण या उदाहरणातून काहीतरी शिकूया कि आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हताश न होता ,घाबरून न जाता ,तणाव न घेता तो प्रोब्लेम आपल्या नातेवाईक,मित्र -मैत्रिण,आपले जवळचे कोणी लोक असतील तर त्यांच्या सोबत बोला ह्यातून काहीतरी पर्याय नक्कीच निघतो.

‘आयुष्य सुंदर आहे’, ‘आनंद आपल्या अवतीभोवतीच असतो’, अशी वाक्ये आपण अनेकदा ऐकतो. पण आनंद खरेतर आपल्या मध्येच आहे. त्याला वाट करून देणे, त्याला दिशा देणे, हे आपले काम आहे.यामुळे आपले  रोजचे आयुष्य आनंददायी होऊ शकते. गरज आहे, ती स्वयंस्फूर्ती शोधण्याची, आपला आतला आवाज शोधण्याची, परस्पर-संवाद साधण्याची.

धन्यवाद!

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article