Gudi Padwa 2024: गुढी पाडवा संपूर्ण मराठी माहिती

गुढीपाडवा कधी आहे? जाणून घ्या हा सण कसा आणि का साजरा केला जातो.

Reshma
By Reshma
8 Min Read
गुढी पाडवा संपूर्ण मराठी माहिती

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

गुढीपाडवा यावर्षी वार मंगळवार दि.९ एप्रिल २०२४ (Gudi Padwa 2024) रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू नववर्ष विक्रम संवत २०८१ चा शुभारंभ चैत्र नवरात्रीने होत आहे. युगादी, चेती चंद आणि नवसंवत्सरा उगादी अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा सण चैत्र प्रतिपदा उत्सवाची सुरुवात देखील करतो.

गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. मराठी लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवातही होते.

या दिवशी मराठी समाजातील लोक समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराबाहेर लावतात, आणि तिची पूजा करून गुढीपाडवा साजरा करतात. असे मानले जाते की या परंपरेमुळे वर्षभर सुख, यश आणि समृद्धी मिळते.

गुढी पाडवा माहिती

Gudi Padwa 2024 Full Marathi Information: गुढीपाडवा (Gudi Padwa) हा सण दरवर्षी हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच चैत्र महिन्याच्या दिवशी साजरा केला जातो. या सणाला उगादी (ugadi 2024) असेही म्हणतात.

हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते. महाराष्ट्रातील हिंदू नववर्ष गुढीपाडवा म्हणून साजरे करतात. हा दिवस कापणीच्या दिवसाचे प्रतीक आहे.

या दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. तसेच लोक आपली घरे रांगोळी, फुलांच्या माळा इत्यादींनी सजवतात आणि अनेक प्रकारचे गोड पदार्थ तयार करतात.

गुढीपाडवा मुख्यतः महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार हा दिवस महाराष्ट्रातील लोकांसाठी नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

“गुढी पाडवा” हा वाक्य दोन शब्दांपासून तयार झाला आहे – गुढी म्हणजे ब्रह्माचा ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या तेजस्वी टप्प्याचा पहिला दिवस.

गुढीपाडवा हा हिंदू चंद्र सौर कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो सामान्यतः ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार मार्च आणि एप्रिल दरम्यान येतो.

पाडव्याच्या (Padwa 2024) दिवशी लोक नवीन कपडे खरेदी करून घालतात, इतरही खरेदी करतात. तसेच नवीन चांगल्या कामाची सुरुवात या शुभ दिवसापासूनच करतात.

काही लोक गाडी, सोने, घर खरेदी करतात तर कोणी या दिवशी घराची पायाभरणी, पूजा, दुकानांचे ओपनिंग, लग्न जुळवणे, लग्न करणे अशी शुभ कामे या पवित्र दिवशी करत असतात. शुभ मुहूर्तावर सुरु केलेली कामे यशस्वी होतात.

गुढीपाडव्याची तारीख वेळ आणि पुजा मुहूर्त

Gudi Padwa Date Time and Puja Muhurta:

गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त-

प्रतिपदा तिथी प्रारंभ – ८ एप्रिल २०२४ रात्री ११:५० वाजता
प्रतिपदा समाप्त होईल – ९ एप्रिल २०२४ रात्री ८:३० वाजता

गुढी पाडवा पूजन पद्धत-

१. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व प्रथम स्नान वगैरे सूर्योदयापूर्वी केले जाते.
२. यानंतर मुख्य दरवाजा आंब्याच्या पानांनी सजवला जातो.
३. यानंतर घराच्या एका भागात गुढी ठेवली जाते. आंब्याची पाने, फुले, कपडे इत्यादींनी सजवलेले असते.
४. यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करून गुढी उभारली जाते.
५. गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते.
६. दुपारी ४ वाजल्या नंतर गुढी ला नैवेद्य दाखवून उतरवले जाते.

गुढीपाडवा इतिहास

Gudi Padwa 2024 History: गुढीपाडव्याच्या अनेक कथा आणि पौराणिक संदर्भ आहेत. ब्रह्म पुराणात, पवित्र हिंदू धर्मग्रंथांपैकी एक, असा उल्लेख आहे की भगवान ब्रह्मदेवाने नैसर्गिक आपत्तीने सर्व लोक मरण पावल्यानंतर आणि वेळ थांबवल्यानंतर जगाची पुनर्रचना केली.

या दिवशी, ब्रह्मदेवाच्या प्रयत्नांनंतर, वेळ पुन्हा सुरू झाली. न्याय आणि सत्याचे युग सुरू झाले. या कारणास्तव या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते.

दुसरी कथा सांगते की १४ वर्षे वनवास भोगून भगवान श्रीराम सीता आणि लक्ष्मणा सोबत अयोध्येला परतले. रावणावर श्री रामांचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

म्हणून गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो, जसे की प्रभु श्री रामांनी रावणावर विजय मिळविल्यानंतर अयोध्येत विजय ध्वज (पुराणानुसार) फडकवला गेला.

तथापि, गुढीचे आणखी एक ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करून राज्यातील जनतेला मुघल राजवटीतून मुक्त केले असा इतिहास सांगतो.

महाराष्ट्रातील लोक या दिवशी गुढी उभारण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. असे मानले जाते कि, गुढी किंवा ध्वज घराच्या आवारात उभारल्याने घराला वाईट गोष्टीं पासून संरक्षण मिळते.

गुढी पाडवा महत्त्व

Significance of Gudi Padwa 2024: गुढीपाडव्याच्या दिवशी स्त्रिया आपले घर स्वच्छ करून घरासमोर रांगोळी काढतात. आणि सुंदर गुढी सजवतात. गुढी उभारणे हिंदू संस्कृतीमध्ये शुभ मानले जाते. महाराष्ट्र राज्यात पारंपारिक पद्धतीने गुढी उभारली जाते.

गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी वापरली जाते. त्यावर चांदीचा, तांब्याचा व पितळेचा यापैकी एक तांब्या उलटा काठीवर ठेवला जातो. सोबत भगव्या रंगाचे कापड, किंवा नवीन वस्र जसे साडी, मोठा कपड्याचा पीस वापरले जाते.

कडुलिंब किंवा आंब्याची पाने आणि फुले तसेच साखरेची गाठी काठीला बांधून गुढी सजवली जाते. आणि तिला घरावर सर्वात वरच्या जागी उभारली जाते. नंतर तिला गोड नैवद्य दाखवून तिची पूजा केली जाते.

घरोघरी प्रसाद म्हणून पाडव्याच्या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड, आमरस इ. असे खास गोड पदार्थ तयार करतात. या दिवशी विविध प्रकारचे पारंपारिक खाद्यपदार्थ, काही ठिकाणी विशेषत: मिठाई तयार केली जाते.

उगादी (कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), बिहू (आसाम) आणि पोइला बैशाख (पश्चिम बंगाल) या स्वरूपात भारताच्या इतर भागातही हा सण साजरा केला जातो.

२०२४ वर्षी सोमवती अमावास्या ८ एप्रिल ला आहे, या निमित्त जेजुरी गडावर भाविक दर्शनासाठी येत असतात. पुढे ९ एप्रिल ला गुढी पाडवा आणि लगेच ११ एप्रिल ला स्वामी समर्थ प्रकट दिन हे लागोपाठ महत्त्वाचे धार्मिक सण आले आहेत. सर्वत्र घरोघरी आनंदाचे वातावरण निर्मिती झाली आहे. सर्व हिंदू बांधव एकमेकांना गुढीपाडवा निमित्त शुभेच्छा देत आहेत.

गुढी पाडवा शुभेच्छा

Gudi Padwa 2024 Wishes:

१) नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! (gudi padwa marathi wishes 2024)

gudi padwa 2024 images

२)  वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा… (gudi padwa subhechhya marathi 2024)

gudi padwa wishes 2024

३) दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू, स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! (gudi padwa subhechhya 2024)

gudi padwa wishes in marathi 2024

४) सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना.. गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! (gudi padwa 2024)

गुढी पाडवा शुभेच्छा इमेजेस २०२४
गुढी पाडवा शुभेच्छा इमेजेस २०२४

५) उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…(padwa subhechhya marathi 2024)

गुढी पाडवा शुभेच्छा बॅनर २०२४
गुढी पाडवा शुभेच्छा बॅनर २०२४

६) निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी… नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी… गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…

७) जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा…

८) आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी… गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

९) येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

१०) शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी, तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे, आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे, सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

मित्रांनो, हिंदू संस्कृती नुसार आपण सर्वांनी गुढी पाडव्यापासूनच नवीन वर्षाची (marathi new year 2024) सुरुवात करायला हवी. तसेच नवीन वर्षांपासून नवीन संकल्प करायला हवे. यामुळे आपले संपूर्ण वर्ष आनंदाचे, सुखाचे आणि भरभराटीचे जाणार आहे.

या लेखात आपण गुढी पाडवा या मराठी सणाची संपूर्ण मराठी माहिती (gudi padwa marathi information 2024) पाहिली आहे. वर आपण गुढी पाडवा शुभेच्छा इमेजेस, बॅनर, बनविले आहेत तुम्ही ते नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासोबत शेअर करून त्यांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा (gudi padwa marathi wishes) देवू शकता.

धन्यवाद!

हे देखील वाचा: 2024 Marathi Festivals Holidays Calendar: २०२४ मधील सण उत्सव हॉलिडे मराठी कैलेंडर

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
2 Reviews
 • Avatar of राजेश पाटीलराजेश पाटील says:

  हिंदू धर्मातील नव वर्षाच्या गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान माहिती. धन्यवाद.

  Reply
  • Avatar of ReshmaReshma says:

   आभार.

   Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *