या वर्षीची चंपाषष्ठी ७ डिसेंबर २०२४ रोजी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात. Let’s checkout here champa shashti 2024 marathi full information.
चंपाषष्ठी मराठी माहिती
What is champa shashti ? Ans: मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशिर्ष शुद्ध षष्ठी हे खंडोबाला समर्पित केलेले सहा शुभ दिवस आहेत. मार्गशिर्ष शुद्ध षष्ठीला, ज्याला चंपाषष्ठी असेही म्हणतात.
मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्म दिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.
नवरात्रीत भक्त पाच दिवस उपवास करतात आणि सहाव्या दिवशी त्याची सांगता करतात. सहा दिवशी देवा पुढे नंदादिप ठेवतात. बेलाची पाने, दवणा आणि झेंडूची फुले देवाला खूप आवडतात म्हणून ती या सणाच्या दिवशी अर्पण करतात.
श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. चंपाषष्ठी उत्सव हा एक चैतन्यशील आणि आनंदी हिंदू सण आहे. तो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हा वार्षिक उत्सव भगवान कार्तिकेयच्या पूजेसाठी देखील प्रसिद्ध आहे, ज्याला भगवान मुरुगन किंवा सुब्रमण्य असेही म्हणतात.
या दिवशी भगवान कार्तिकेयाला चंपा पुष्प अर्पण केले जाते आणि षष्ठीतिथीमुळे या व्रताला चंपा षष्ठी असे नाव देण्यात आले आहे. आजच्या पूजेत वांगी अर्पण करण्याचीही परंपरा आहे, म्हणून या व्रताला बैगन छठ म्हणतात.
या दिवशी भगवान शंकराच्या खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते. चंपाषष्ठी हा मार्गशिर्ष हिंदू महिन्यातील सहाव्या दिवशी साजरा केला जातो, विशेषत: हा सण डिसेंबरमध्ये येतो.
खंडोबाच्या पूजेत भंडारा फार महत्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पावडर असते. म्हणून महाराष्ट्र राज्यात खंडोबा देवस्थान च्या ठिकाणी भंडारा उधळला जातो. जेजुरी या ठिकाणी सर्वत्र मंदिर परिसरात भंडारा असतो संपूर्ण मंदिर हळदीने पिवळे झालेले असते. म्हणून तर जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हंटले जाते.
खंडोबाचा चंपाषष्ठी नैवद्य आणि तळीभरण माहिती
(champa shashti naivedya) खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात ) कणकेचा रोडगा, भाकरी, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो.
तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात देवाचे टाक, विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण “सदानंदाचा येळकोट” किंवा “येळकोट येळकोट जय मल्हार” असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. तळी भरण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त लोक हात लावत असतात. त्यानंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.
दिवटी- बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधांत शांत (विझवावी) करावी. व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे.
हे देखील वाचा : कालभैरव जयंती 2023: भगवान कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी तिथी, महत्त्व आणि पूजाविधी
रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्टी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्व आहे. महाराष्ट्र राज्यात ह्या दिवशी खंडोबा देवस्थानाच्या ठिकाणी यात्रा असते. या दिवशी भक्त आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत खंडोबाला येत असतात. किमान वर्षातून एकदा तरी कुलदैवताचे दर्शन घेवून आर्शीर्वाद घ्यावा अशी श्रद्धा भाविकांची असते.
सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात. खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो.
चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन, वाघ्या-मुरळींस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ‘ वारी खंडोबाची ‘ म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.
लग्नकार्यांत तसेच लग्नानंतर जेव्हा आपण खंडोबाला जातो तेव्हा भक्त तळी भरणे, गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे, आरती करणे अशी पूर्वी पासूनची प्रचलीत प्रथा आहेत. गोंधळ घालण्याचे काम गोंधळी म्हणजेच त्यांना वाघ्या म्हणतात. त्यांच्या सोबत मुरुली त्यांना साथ देत असते म्हणजेच नाचत असते. त्यांना विशिष्ट रक्कम दक्षिणा म्हणून दिली जाते. तसेच देवाच्या प्रसादासाठी मदन ( गहू, बाजरी, तांदूळ, डाळ,तेल ,पीठ इ.) दिले जाते.
हे सुद्धा पाहा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आळंदी २०२३
खंडोबाची प्रसिद्ध १२ स्थाने
महाराष्ट्र राज्यात खंडोबाची प्रसिद्ध स्थाने
- कडे-कऱ्हे पठार, जेजुरी ( Kadepathar Jejuri )
- माळेगाव ( malegaon khandoba mandir )
- निमगाव ( nimgaon khandoba )
- सातारे (औरंगाबाद) ( satara khandoba mandir )
- नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद) ( naldurg khandoba mandir )
- पाली-पेंबर सातारा ( Pali khandoba mandir )
- शेंगुड (अहमदनगर) ( shegud khandoba mandir )
कर्नाटक राज्यात खंडोबाची प्रसिद्ध स्थाने
- मण्मैलार (बल्ळारी) (Mannamailar khandoba temple)
- मैलारपूर-पेंबर (बिदर) (mailarpur khandoba )
- मंगसूल्ली (बेळगाव) (Mangsuli Khandoba Temple )
- मैलारलिंग (धारवाड) (Mailara Linga Khandoba)
- देवरगुडू (धारवाड) (Devaragudda-Khandoba )
कुलदैवत खंडोबा – जेजुरीगड
जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरांत असणार्या राममंदिरांत एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्या ६३ ओर्या आहेत.
जेजुरी गडास सुमारे ३८५ पायरी असून या पायरी साठी ९ लाख दगडी वापरल्याचा उल्लेख ९ लाख पायरी म्हणून केला जातो. खंडोबाची राजधानी जेजुरीगड आहे. याच गडावर उमाजी नाईक तालीम , बाणाई मंदिर, हेगडीप्रधान मंदिर, यशवंतराव गडकोट दर्शन, मल्ल बगाड मुख्यमंदिर, गडकोटातील देवता, वसईच्या घंटा , खंडा, तुळजाभवानी मंदिर , कडेपठार, कार्तिकस्वामी, विनायक, फिरंगाई देवी, सटवाई, नागोबा इत्यादी देवांची ठिकाणे आहेंत.
खंडोबाची पूजा
खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रुपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्नसमारंभांतच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते. प्रथम देवाची स्वच्छता, घासपूस करुन पूजा करावी.
कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करताना फुले, गुलाल, व भंडार वहावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत. पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत.
नवरात्री पूजा
कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही |खंडोबाचा उत्सव असतो.
घटाची स्थापना,नंदादीप,मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे (एकभुक्त),शिवलिंगाचे दर्शन घेणे,ब्राह्मण-सुवासिनी तसेच वाघ्या आणी मुरळी यांना भोजन देणे असे शा दिवस केले जाते. चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात.खंडोबाची तळी भरून आरती करतात.
खंडोबा देवस्थान ऑफिशियल वेबसाईट – https://www.khandoba.com
आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे.
चंपाषष्ठी स्टेटस शुभेच्छा
आपणांस आपल्या सोशल मिडिया साठी किंवा Whatsapp status ला ( champa shashti status ) चंपाषष्ठी स्टेटस शुभेच्छा देण्या साठी खालील फोटो वापरू शकता. आधुनिक युगात अशा प्रकारचे स्टेटस ठेवून देखील देव देवतांना नमस्कार केला जातो.
मित्रांनो आपण आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच उपयोग करून चंपाषष्ठी ला मनोभावे आपले कुलदैवत श्री खंडोबा यांस नमन करून आपले कुलाचार योग्य पद्धतीने कराल याची आम्हांला खात्री आहे.
ही पोस्ट आपल्याला नक्की आवडली असणार आणि आपण आपल्या स्टेटस ला देखील ठेवली असणार तसेच ती आपल्या नातेवाईक मित्र परिवार यांस जरूर फोरवर्ड कराल. धन्यवाद.
हे देखील पाहा : Kunbi Maratha Records: कुणबी मराठा नोंदी जिल्हानिहाय यादी