Makar Sankranti Information Marathi 2024: मकरसंक्रांती पूजाविधी मुहर्त महत्त्व शुभेच्छा स्टेट्स मराठी माहिती

२०२४ नव वर्षातील मकर संक्रांती हा सण नक्की १४ की १५ जानेवारी ला आहे ? हा सण शास्र शुद्ध पद्धतीने कसा साजरा करावा ? तसेच भोगी, मकर संक्रांत व किंक्रांत या विषयी संपूर्ण माहिती येथे पाहा.

Reshma
By Reshma
12 Min Read
मकरसंक्रांती पूजाविधी मुहर्त महत्त्व शुभेच्छा स्टेट्स मराठी माहिती

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

मंडळीनो, २०२४ ह्या नवीन वर्षातील आपला पहिला मराठी लोकप्रिय सण म्हणजे मकर संक्रांती (Makar Sankranti 2024). मकर संक्रांती हा सण जानेवारी महिन्यातील १४ किंवा १५ तारखेला येत असतो. ह्या वर्षी संक्रांती (Sankranti 2024) १५ जानेवारी २०२४ रोजी आली आहे. या लेखात पुढे आपण मकर संक्रांती बद्दल संपूर्ण माहिती (Makar Sankranti Full Information in Marathi) पाहणार आहोत.

मकर संक्रांती २०२४

Makar Sankranti 2024: मकर संक्रांती ह्या वर्षी १५ जानेवारी २०२४ साजरी होत असून, सूर्य धनु राशीतून बाहेर पडून पहाटे ०२:५४ वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे.

संक्राती फल

रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ शके १९४५ पौष शुक्ल ३ उत्तर रात्री २.४२ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे.

संक्राती पुण्यकाल

सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सकाळी ७ .१७ ते सायंकाळी ६ .२० मिनिटांपर्यंत आहे.

वाहन- घोडा

उपवाहन- सिंह

वस्र- ह्या वर्षी संक्रातीने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे. हळदीचा टिळा लावलेला आहे. ती वयाने वृद्ध असून बसलेली आहे. वासाकरिता दूर्वा घेतलेल्या आहे. चित्रांन्न भक्षण करीत आहे. जातीने ब्राह्मण आहे. भूषणार्थ सोने धारण केले आहे. वारनाव घोरा व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे.

संक्रातीचे फल

ह्या वर्षी संक्रातीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्राती ज्या ठिकाणावरून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल.

संक्रातीमध्ये वर्ज कामे

संक्रांतीला दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष-गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व काम विषयक सेवन ही कामे करू नयेत.

तसेच काळा रंग हा संक्रातीने परिधान केला आहे म्हणून काळ्या रंगाची वस्रे, वस्तू या दिवशी घालू नये.

मकर संक्रांती सण संपूर्ण माहिती आणि महत्व

(Marathi Information about Makar Sankranti): मकर संक्रांती हा दिवस खूप महत्वाचा आहे. या दिवशी सूर्य हा धनु राशीमधून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. मकर संक्रांतीला सूर्यदेव आणि शनी देव हे एकत्र येत असतात. संक्रांतीला दान देण्याला आणि गंगा स्नान करण्याला विशेष महत्त्व असते. पोंगल, उत्तरायण, लोहरी, माघ/भोगली बिहू, बैसाखी इ. नावांनी भारतात प्रत्येक राज्यात मकर संक्रांती साजरी केली जाते. संक्रांती नंतर रात्र लहान आणि दिवस मोठा होत जातो.

मकर संक्रांत हा सण उत्साह, आंनद, प्रेम, स्नेह,आपुलकीचा गोडवा वाढविणारा आहे. या दिवशी प्रत्येक जण एकमेकांना प्रेमाने तिळगुळ देवून, मोठ्यांचा आशीर्वाद घेतात. तसेच तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, happy makar sankranti अश्या शुभेच्छा देतात. या संक्रातीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी गोडाचे जेवण असते. विशेषत: महाराष्ट्रात पुरणपोळी हा गोड पदार्थ बनवला जातो.

२०२४ मधील पुढे येणारे महत्वाचे सण पाहा : 2024 Marathi Festivals Holidays Calendar: २०२४ मधील सण उत्सव हॉलिडे मराठी कैलेंडर

मकर संक्रातीचे महत्व प्रथा  (Significance of Makar Sankranti): देवी भगवतीने संक्रासुर नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी केला होता. म्हणून त्या दिवसापासूनच मकर संक्रांती हा सण साजरा करण्यात येतो. देवी मकर संक्रांतीला प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते, वेगवेगळ्या वस्तू परिधान करते. आपल्याकडे अशी प्रथा आहे कि, देवीने किंवा संक्रातीने ज्या रंगाची साडी नेसली आहे तो रंग वर्ज असतो म्हणजेच त्या रंगाची कपडे वस्तू संक्रातीला वापरायचे नाहीत.

मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात म्हणजेच थंडीच्या दिवसात असतो. संक्रांतीला तिळाचे (सफेद हावरी) फार महत्त्व आहे. या दिवसात अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी जास्तीत जास्त तीळ खाले जाते. म्हणूनच संक्रातीला प्रत्येक पदार्थ हा तिळाचा बनवलेला असतो. तसेच तिळाची वडी, चिक्की, लाडू, भाकरी, भाजी इ.पदार्थ बनवतात. या प्रमाणेच लोणी, मुगाची खिचडी, वांगी, पावटे, गाजर, वटाणा अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात केला जातो.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला

आपल्याकडे तीळ आणि गुळ यांचे मिश्रण म्हणजे ‘तिळगुळ’ बनवले जाते. तीळा प्रमाणेच गुळ देखील आरोग्यदायी आहे. तसेच सूर्याच्या उपासनेला या महिन्यात खूप महत्व आहे आणि नामस्मरण, जप, तप, व्रत करणे हे हि तितकेच महत्वाचे मानले जाते. तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ म्हणजे स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री. या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. त्यामुळे एकमेकांना तिळगुळ दिल्यास स्नेहाची गोडी वाढत जाते. या दिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवांना तीळ तांदूळ वाहतात.

मकर संक्रांती या दिवशी पतंगाला हि विशेष महत्व आहे. ठिकठिकाणी पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. या दिवशी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना सर्वत्र पाहायला मिळते. अलीकडे पतंग उडण्याची हि परंपरा कमी होताना दिसत आहे आणि त्याला देखील तसे कारण आहे. पतंगाने अनेक अपघात होतात. पतंगाची दोरी साठी नायलॉन धागा वापरला जातो. आणि त्या धाग्याने पक्ष्याचे आकाशात उडताना अपघात होतात. गाडीवरून जाताना लोकांचे अपघात या दोरीमुळे होतात. म्हणूनच पतंग उडवताना सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. नागपूर या शहरात खूप जास्त प्रमाणात पतंग उडविले जातात.

देवी पुराणातील श्लोक आणि त्याचा अर्थ :

श्लोक –  संक्रांतौ यानी दव्यकव्यानि मानवै़:! तनि नित्य ददात्यर्क:पुनजन्मनि जन्मनि!

अर्थ – मकरसंक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य-कव्य करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो.

मकर संक्रातीला द्यावयाचे दान

Donations to be given on Makar Sankranti: मकर संक्रांतीच्या पर्व काळात दाना ला खूप महत्व असल्याने या वर्षी नवीन भांडे, गाईला घास,अन्न, तिळपात्र, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, कपडे, घोडा, इ. यथाशक्ती दाने द्यावीत.
आधुनिक काळात सण साजरे करताना तरुण पिढीने आपल्या रूढी परंपरा समजून घेवून, सामाजिक एकोपा जपायला हवा. तसेच समाज्याप्रती देण्याची भावना (मदत ) जागरूक करायला हवी. म्हणजेच दान देण्याच्या गोष्टींमध्ये विद्यादान, रक्तदान, वस्रदान, नेत्रदान, अन्नदान, अवयवदान इ.गोष्टींचा समावेश असायला हवा.

मकर संक्रांती पूजाविधी पद्धत 

Makar Sankranti Puja: मकर संक्रांतीला गंगा स्नानाला खूप महत्व आहे. जर गंगा स्नान शक्य नसल्यास घरीच पाण्यात गंगाजल टाकून स्नान केले जाते. तसेच सकाळी सूर्य देवाला जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते आणि सूर्य चालीसा पठण केले जाते. वैवाहिक जीवनात सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळण्यासाठी सूर्य देवाची पूजा महत्वाची आहे.

मकर संक्रातीच्या दिवशी सुगडांची पुजा केली जाते. त्याला काही भागात खण असे म्हणतात. सुगड स्वच्छ धुवून घ्यावेत व त्यांना सगळीकडून हळदीकुंकूची बोटे लावून घ्यावी. त्याला पांढऱ्या दोऱ्याची ५ वेढे मारुन घ्यावे. सुगडात गव्हाच्या ओंब्या, मटार, घेवड्याच्या शेंगा, उसाचे तुकडे, हरभरा, बोरे इ. गोष्टी घालाव्यात.

एका पाटावर गणपती म्हणून सुपारी मांडावी व  फुले वाहून गणेशाची पूजा करावी. त्यानंतर दिव्यांची पूजा करावी. पाटावर ५ ठिकाणी थोड्या थोड्या अक्षदा ठेवाव्यात. त्यावर सुगड ठेवावी व त्यास हळदी- कुंकू, फुले वहावे. शेवटी आरती करून नैवद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर १ खण देव्हाऱ्यात ठेवावा, १ तुळशीत ठेवावा व राहिलेले विठ्ठल मंदिर,राम सीता मंदिरात ठेवावा. संक्रांत झाल्यानंतर सुगड आपल्या बाल्कनीत असलेल्या कुंड्यांमध्ये ठेवून त्यात पाणी भरून ठेवावे म्हणजे झाडांना व पक्षांना पाणी मिळते, हे देखील दान कर्म आहे.

किंक्रात माहिती

Krikrant Information: संक्रातीचा दुसरा दिवस किक्रांत म्हणून साजरा करतात. संक्रातीने मकर संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी किंकरा सुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किक्रांत म्हणून पाळला जातो. पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. या दिवशी आपण वादविवाद टाळावे.

भोगी माहिती

Bhogi Information: मकर संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी होय. भोगी या शब्दाचा अर्थ होतो आनंद घेणारा किंवा उपभोगणारा. या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून त्यात थोडं तीळ टाकून भाजी बनवली जाते. तसेच बाजरीच्या भाकरीला थोडं तीळ लावून ती भाकरी खाल्ली जाते.
या दिवशी आपल्याला सण साजरा करत आनंद उपयोगाचा असतो. भोगी या शब्दाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला वेगवेगळ्या सणाच्या दिवशी किंवा व्रत वैकल्यदिवशी जो नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्याला हिंदी मध्ये भोग असे म्हणतात. त्यामुळे अशा पद्धतीने भोगीचे दोन अर्थ होतात.

तिळवण हळदी कुंकू आणि बोरन्हाण माहिती

नवविवाहित वधूचे हळदी कुंकू विवाहा नंतरच्या प्रथम संक्रातीला करण्याची प्रथा आहे. मुलीला काळी साडी, हलव्याचे दागिने भेट दिली जाते तर जावयाला कपडे व इतर मानपान देऊन त्यांचे कौतुक मानपान केले जाते.

महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम – मकर संक्रांत हा महिलांचा अत्यंत आवडता सण. महिला या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. यादिवशी महिला नवीन साडी, बांगड्या, सौंदर्य प्रसाधने, वाण इ. मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. महिला भगिनी आपल्या शेजारच्या मैत्रिणी, नातेवाईक महिला यांना बोलवतात, आणि एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. महाराष्ट्रात अशा समारंभाला प्रत्येकीला काहीं तरी भेट वस्तू म्हणजेच वाण देण्याची प्रथा आहे.

बोरन्हाण हा कार्यक्रम लहान मुलांसाठी असतो. लहान बाळाला उत्तम आरोग्य मिळावे यासाठी बोरन्हाण केले जाते. बोरन्हाण हे एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंतच्या बालकाचे केले जाते. या दिवशी लहान बालकांनाही संक्रातीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अशा पद्धती दिसून येतात. लहान मुलांना बाळकृष्ण रुपात तयार करून त्यांचे औक्षण केले जाते. त्यानंतर बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, मुरमुरे हे सर्व साहित्य एकत्र करून ते लहान मुलांच्या डोक्यावर ओततात.

अलीकडे यामध्ये गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेटही घालतात. यालाच  बोरन्हान अथवा लूट असे म्हणतात. बोरन्हाण हे सोहळा संस्कारापैकी एक आहे. तिळवण, हळदीकुंकू, बोरन्हाण हे कार्यक्रम संक्रांती पासून रथ सप्तमी पर्यंत करता येतात.

मकर संक्रांती शुभेच्छा स्टेट्स बॅनर

Makar Sankranti Shubhechha Status Banner: पुर्वी च्या काळामध्ये लोकं आवर्जुन एकमेकाला तिळगुळ देण्यासाठी प्रत्यक्ष भेटत असत, परंतु अलीकडे सोशल मिडिया आणि Whatsap द्वारे च जास्तीत जास्त शुभेच्छा दिल्या जातात. त्यासाठी आपण आम्ही खाली दिलेल्या मकर संक्रांती शुभेच्छा स्टेट्स बॅनर फोटो चा वापर करू शकता.

१:

आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम,
गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या..
गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

२:

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा फोटो
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा फोटो

३:

तिळाची ऊब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोडवा यावा जीवनाला,
यशाची पतंग उडो गगना वरती,
तुम्हास आणि तुमच्या परिवारास शुभ संक्रांती..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

मकर संक्रांती शुभेच्छा स्टेट्स
मकर संक्रांती शुभेच्छा स्टेट्स

४:

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

मकर संक्रांती मराठी शुभेच्छा
मकर संक्रांती मराठी शुभेच्छा

५:

Just like the kites in the Sky, May your dreams soar high this Makar Sankranti.

मकर संक्रांती शुभेच्छा बॅनर
मकर संक्रांती शुभेच्छा बॅनर

ई जनसेवा वेब पोर्टल च्या रसिक वाचक, प्रेक्षक यांना पुनश्च: एकदा नववर्ष २०२४ आणि मकर संक्रांती च्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन या सणाविषयी असलेली माहितीपुर्ण पोस्ट येथे संपन्न करत आहोत.

आपणांस मकर संक्रांती वरील हि पोस्ट नक्कीच आवडली असणार याची आम्हांला खात्री आहे. तर मग या पोस्ट ला लगेच आपल्या मित्र परिवार मध्ये, whatsapp group status ला शेअर करा.

धन्यवाद.

हे देखील वाचा : Shark Tank Season 3 India: शार्क टँक इंडिया सिझन ३ मध्ये “ हे ” आहेत नवीन शार्क, शो कधी होणार सुरु!

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *