अदिवासीने धारण केलेली जमीन दुसऱ्या बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस परवानगी देणेबाबतचा प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त यांचेकडेस सादर करणे प्रक्रियेचे स्वरूप :-

१. तहसीलदार यांचा जमीन विक्री करणारा व खरेदी करणारा यांचे जबाबीसह विक्री परवानगीकामी शिफारस असलेबाबत अहवाल

२. ७/१२ वरील सर्व सहधारक अथवा त्यांचे जनरल मुखत्यार यांचा विक्री परवानगी कामी अर्ज आवश्यक असतो. जनरल मुख्यरपत्रकासह

३. अर्जदार हे विक्री करावयाचे क्षेत्र आदिवासी म्हणून धारण करीत असणे आवश्यक आहे .

४. आदिवासी व्यक्तीने मालकी धारण करतेवेळी असलेले मूळ धारक व ७/१२ वरील आजचे धारक यांचे अनुषंगाने जमीन सर्व वारसांचे नावे आलेली असणे अथवा विहित मार्गने वारसांची नावे कमी झालेली असणे आवश्यक आहे.

५. जमीन रिग्रेट वेळी असलेले मूळ धारक व ७/१२ वरील आजचे धारक यांचे अनुषंगाने जमीन सर्व वारसांचे नावे कमी झालेली असणे आवश्यक आहे.

६. जमीनीची यापूर्वीची हस्तांतरणे सक्षम अधिकारी यांचे परवानगी शिवाय झालेली नसावीत.

७. विक्री करावयाचे क्षेत्र मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडनेस प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करणे याबाबत अधिनियम १९४७ अन्वये किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसावे. म्हणजेच ते बागायत क्षेत्राकरिता ०.२० हे आर व जिरायत क्षेत्राकरिता ०.४० हे आर पेक्षा कमी नसावे.

८. जमीन विक्री करणारे व्यक्तीचे सामुदायिक / संयुक्त खाते असलेस गाव नमुना ८ -अ वरील संमती असणे आवश्यक आहे.

९. जमीन विक्री करणार व्यक्तीचे वारसांचे संमतीपत्र आवश्यक आहे.

१०. एकत्रीकरण योजनेचा उतारा तपासणे

११. जमीन विक्री करणार यांचे आवश्यक कागदपत्र यामध्ये विहित केलेप्रमाणे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

१२. जमीन खरेदी करणार यांचे आवश्यक कागदपत्र यामध्ये विहित प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

१३. चालू बाजारमूल्यदर तक्त्यानुसार संबंधित दुय्यम निबंधक यांचेकडील मूल्यांकन आणि तहसीलदार यांचेकडील विहित सूचीतील मूल्यांकन आणि तहसीलदार यांचेकडील विहित सूचीतील मूल्यांकन यापैकी जास्त असलेल्या मूल्यांकनाचे आधारे नजराणा रक्कम आकारणे आवश्यक आहे.

१४. जमीन खरेदी करणार व्यक्ती शेतकरी किंवा शेतमजूर आहे का हे पहिले जाते.

१५. जमीन खरेदी करणार बिगर आदिवासी यांचा अर्ज आवश्यक आहे

१६. जमीन ज्या अकृषिक प्रयोजनासाठी खरेदी करणार आहे तो अकृषिक वापर संबंधित जमिनीत अनुज्ञेय असलेबाबत सहाय्यक संचालक नगर रचना यांचा अभिप्राय आवश्यक आहे

१७. चालू बाजार मूल्यदरानुसार आदिवासी व्यक्तीस मिळणारा जमिनीचा मोबदला योग्य असावा.

अ. आवश्यक कागदपत्रे :-

१. जमीन खरेदी बाबतचे अकृषिक प्रयोजन नमूद असलेला, जमीन खरेदी कामी आदिवासी धारकास देणेत येणारी मोबदल्याची रक्कम नमूद असणारा खरेदीदाराचा अर्ज

२. जमिन अतिरिक्त घोषित झाले पासूनचे गट / सर्व्हे नंबरचे ७/१२ व त्यावरील फेरफार प्रमाणित प्रत

३. एकत्रीकरणाचा उतारा – उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा

४. अर्जदार यांचे वारसांचे जमीन विक्री संमतीपत्र

५. खाते उतारा ८-अ प्रमाणे सहधारकांचे संमतीपत्र

६. जमीन विक्री करणार यांचे प्रतिज्ञापत्र

७. विक्री करावयाच्या जमिनीबाबत दावा न्यायप्रविष्ट नाही प्रतिज्ञापत्र

८. जमीन विक्री केल्यांनतर भूमिहीन होत नाही प्रतिज्ञापत्र

९. भूमिहीन होत असल्यास पुन्हा शासनाकडे जमीन मागणी करणार नाही या बाबतचे प्रतिज्ञापत्र

१०. मालकी हक्क अर्जदाराचा आहे व त्याबाबत भविष्यात काही वाद उद्भवल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार याची राहील प्रतिज्ञापत्र.

११. शासनाने विहित केलेली नजराणा रक्कम भरणेस तयार आहे

१२. भूसंपादन, पुर्नवसन प्रस्ताव सुरु नाही बाबतचे प्रतिदनपत्र

१३. जमीन खरेदी करणार यांचे जमीन खरेदी नंतर कमाल मर्यादेपेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही असे प्रतिदनपत्र

१४. जमीन आहे त्या शर्तीवर घेणेस तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र

१५ जमीन विक्री करणार यांचे मालकी हक्काची खात्री केलेली असून त्याबाबत भविष्यात वाद उद्भवलेल्यास जबाबदारी खरेदी करणार यांची राहील असे प्रतिज्ञापत्र .

१६. जमीन खरेदी करणार हे शेतकरी असलेबाबत ७/१२ उतार किंवा शेतमजूर असलेबाबत संबंधित तहसीलदार यांचा दाखला

१७. जमिनीचे संबंधित दुय्यम निबंधक यांचे कडील चालू बाजारमूल्यदर तक्त्यानुसार मूल्यांकन

१८. छाननी अंती आवश्यक अन्य कागदपत्रे

१९. जमिनीचे वापराचे अकृषिक प्रयोजन नमूद केलेले असावे

२०. जमीन ज्या अकृषिक वापरासाठी खरेदी करणार आहे तो अकृषिक वापर संबंधित जमिनीत अनुज्ञेय असलेबाबत सहायक संचालक, नगर रचना यांचे अभिप्राय.

ब. निर्णय घेणारे अधिकारी :-

अदिवासीने धारण केलेली जमीन दुसऱ्या बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस परवानगी देणेबाबतचा प्रस्ताव मा.विभागीय आयुक्त यांचेकडेस सादर करणे निर्णय अपर जिल्हा अधिकारी आहेत.

क. शासन निर्णय :-

१. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६-१

२. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ खंड २ परिपत्रक क्र. ३ परिच्छेद ७८ – ड

३. महाराष्ट्र जमीन महसूल जनजातीच्या व्यक्तींना जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरण करणे नियम १९७५ चे नमुने अ ची नोटीस प्रसिद्ध करणे

४. महाराष्ट्र जमीन महसूल व वनविभाग क्र. आदिवासी / १०७९/ ३३८५६ / क्र ९ दि. ०४/०३/१९८२

५. ४. महाराष्ट्र जमीन महसूल क्र. एलएनडी /१०८३/ २७९२५ /सीआर / ३६७१ / ग – ६ दि. ०८/०९/१९८३

सामान्यबिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस
अदिवासीने धारण केलेली जमीन दुसऱ्या बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस परवानगी देणेबाबतचा प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त यांचेकडेस सादर करणे प्रक्रियेचे स्वरूप :- १. तहसीलदार यांचा जमीन विक्री करणारा व खरेदी करणारा यांचे जबाबीसह विक्री परवानगीकामी शिफारस असलेबाबत अहवाल २. ७/१२ वरील सर्व सहधारक अथवा त्यांचे जनरल मुखत्यार यांचा विक्री परवानगी...
Ejanseva.com is Free Informative blog portal for all Indians. People can submit articles, content to us. We check & unique useful post publish with your name as author.
Topics - Current Affairs | Social | Politics | Agriculture | Sports | Educations | Festivals | Historical | Online Internet and many more useful
Like, Share, Follow, Subscribe, Contribute & Get Rewarded from Ejanseva Submit Article Now