वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे.

लागणारी कागदपत्रे :-

१. विहीत नमुन्यातील अर्ज

२. अर्जावर रु. १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प.

३. शहरात सलग १० वर्षे रहात असलेबाबत तलाठी यांचा दाखला व १० वर्षे महाराष्ट्रातील रहिवास सिध्द करणारे इतर पुरावे –

उदा – मालमत्ता कर पावत्या / विज देयके (लाईट बिल) / ७/१२ उतारा / मनपाकडील फोटोपास/भाडे करार (अर्जदार भाडयाने रहात असल्यास घरमालकाचे रु.१००/- चे स्टॅम्प पेपरवर नागरी सुविधा केंद्र येथे केलेले संमतीपत्र सादर करावे व घरमालकाचे नावे असलेली विज देयके सादर करावीत.)

४. महाराष्ट्रात सलग १० वर्षे वास्तव्य असलेबाबतचे पालकांचे स्वयं घोषणापत्र किंवा सज्ञान अर्जदाराच्या बाबतीत अर्जदाराचे स्वयं घोषणापत्र.

५. अर्जदार व अर्जदारांचे वडील यांचा शाळा सोडल्याचा दाखला (ज्यामध्ये जन्म स्थळाचे ठिकाण व जन्मतारीख आवश्यक) किंवा ग्रामपंचायत/नगरपालिका/ महानगरपालिका यांचेकडील जन्म नोंदवहीचा उतारा किंवा सेवानोंद पुस्तकातील जन्मस्थळाचा उल्लेख असलेल्या पानाची प्रमाणित प्रत.

६. जर अर्जदार हे परराज्यातील असतील तर वीस वर्षापासुनचे महाराष्ट्रातील वास्तव्याबाबत महसुली पुरावा (मालमत्तेचे कार्ड, जमीन असेल तर ७/१२, खरेदी खत, कर पावत्या) सादर करणे आवश्यक

७. विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास

  1. विवाहानंतरचे पुरावे म्हणुन पतीचा शाळा सोडल्याचा दाखला व पतीकडील रहिवासाचे पुरावे
  2. विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला किंवा राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल किंवा लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला

८. ज्या व्यक्तीस दाखला आवश्यक आहे त्यांचे किंवा त्यांचे वडीलांचे जन्मस्थळ भारताबाहेरील असेल तर त्यांचे पास पोर्टचे सर्व पानांच्या झेरॉक्स प्रती नागरिक सुविधा केंद्र येथे साक्षांकित केलेले सादर करावे.

९. दहावी उत्तीर्ण असल्यास सनदेची साक्षांकित झेरॉक्स प्रत अथवा सनद.

 

न्युज अपडेट
वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे. लागणारी कागदपत्रे :- १. विहीत नमुन्यातील अर्ज २. अर्जावर रु. १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प. ३. शहरात सलग १० वर्षे रहात असलेबाबत तलाठी यांचा दाखला व १० वर्षे महाराष्ट्रातील रहिवास सिध्द करणारे इतर पुरावे – उदा – मालमत्ता कर पावत्या / विज देयके (लाईट बिल) / ७/१२...
Ejanseva.com is Free Informative blog portal for all Indians. People can submit articles, content to us. We check & unique useful post publish with your name as author.
Topics - Current Affairs | Social | Politics | Agriculture | Sports | Educations | Festivals | Historical | Online Internet and many more useful
Like, Share, Follow, Subscribe, Contribute & Get Rewarded from Ejanseva Submit Article Now