आंतरराष्ट्रीय योग दिवस – २१ जून

Devesha
By Devesha
10 Min Read
आंतरराष्ट्रीय योग दिवस - २१ जून

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. योग हि भारतातील ५००० वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

21june

सर्वांसाठी योग | Yoga for all (https://www.inmarathi.com/43923/why-yoga-day-celebrated-on-21-june/

योगाचे एक वैशिष्ट्य हे आहे कि तुम्ही युवक असा कि वयोवृध्द, निरोगी असा कि आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदाई आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो. वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सुक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो.

योग आपल्यासाठी कधीही नवीन नव्हता. आपण हे सर्व अगदी बालपणापासून करत आलो आहोत, मग ते पाठीचा कणा मजबूत करणारे मार्जारासन असो कि पचनशक्ती वाढवणारे पवनमुक्तासन असो. आपण शिशूंना दिवसभर काही न काही योग क्रिया करताना पाहतो. हरएक व्यक्तीला योगाचे वेगवेगळे महत्व आणि आवश्यकता आहे. योग प्रत्येकाच्या जीवनाची आदर्श दिशा ठरवण्यासाठी सहाय्य करायला दृढ संकल्प आहे.

योगाचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगभरात आता योगाचे धडे दिले जात आहेत. याचाच परिपाक म्हणून २१  जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून जगभर साजरा केला जात आहे. योगाच्या प्रचारामुळे योगा करणे सोपे आहे व त्याने रोग निवारण होऊ शकते, हे सामान्य माणसाच्या लक्षात येऊ लागले आहे. आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या काही योगासनांची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

योग ही जीवन जगण्याची कला आहे. त्यामुळे आत्मविश्वास तर वाढेल व आत्महत्या व नैराश्याचे प्रमाण कमी होईल. आपल्याला निरोगी आयुष्य तर लाभतेच पण व्यक्तीमत्व विकास व आध्यात्मिक शक्ती सुद्धा मिळते. धापवळीच्या जीवनात अनेकांना असंख्य आजारांचा सामना करावा लागत आहे. ह्दयविकाराने मृत्यु होण्याचे प्रमाण कधी नव्हे एवढे वाढले आहे. आपल्या देशात हृदयविकाराने दर 33 सेकंदाला 1 मृत्यू होत आहे. शिवाय आईवडिलांना असलेले ह्दयविकार, उच्च रक्तदाब, संधिवात, मधुमेह आदी विकार अनुवांशिकतेने मुलांनाही होण्याची शक्यता असते. यावर योगा हा एक चांगला उपाय आहे. प्राणायामामुळे अशा विकारांपासून दूर राहता येते.

सूर्य नमस्कार ( https://www.loksatta.com/desh-videsh-news/united-nations-to-declare-june-21-as-international-day-of-yoga-1050358/)

सुर्याला वंदन म्हणजे सूर्य नमस्कार. नियमीत सूर्य नमस्कार केल्यास पचनशक्ती सुधारते, लवचिकता वाढते, मासिक पाळीचे चक्र सुधारते, वजन घटवण्यास मदत व शरीर निरोगी होते.

 • प्रथम नमस्कार स्थितीत राहून श्वास घ्या व सोडून द्या.
 • नंतर दोन्ही हात उंच डोक्यावर घ्या. दोन्ही हातात 1 फूट अंतर ठेवा. शरीर जितके मागे वाकवता येईल तेवढे वाकवा. श्वास घेत मागे जाणे अपेक्षित आहे.
 • श्वास सोडत हात पुढे आणा. कमरेपासून पाठीमध्ये पूर्णपणे पुढे वाका. जेणेकरुन हनुवटी गुडघ्याच्या पुढे टेकवली जाईल. दोन्ही हात पायाच्या पंजाच्या बाजूला जमिनीवर असतील. पूर्ण स्थिती जमली नाही तरी सरावाने ती जमायला लागेल. गुडघे वाकवू नका.
 • श्वास घेऊन उजवा पाय पुढे न्या. दोन्ही हात, पायाचा पंजा एका सरळ रेषेत असतील. गुडघा वाकलेल्या स्थितीत असून उजव्या पंजाच्या पुढे जाणार याची काळजी घ्या. नजरसमोर असेल. डाव्या पायाचा गुडघा वाकवून जमिनीवर टेकवा.
 • मागील स्थितीमधून उजवा पाय मागे घ्या व डाव्या पायाच्या शेजारी ठेवा. श्वास रोखून ठेवलेला आहे. मान, नितंब, पाय, टाचा एक सरळ रेषेत असतील.
 • श्वास सोडून हात कोपऱ्यात वाकवून आठ अंग जमिनीला टेकतील अशी स्थिती असेल. कपाळ, दोन्ही हात, छाती, दोन्ही गुडघे, दोन्ही टाचा असे आठ अंग जमिनीला टेकलेले असतील. या स्थितीत नेहमी साधक चुकतात. अष्टांगदंडाची ही स्थिती आहे.
 • श्वास घेऊन हात कोपऱ्यातून सरळ ताठ करुन छाती वर उचला. गुडघे जमिनीवर टेकले असतील. बेंबीच्या खालचा भाग जमिनीवर टेकलेला असेल. मान मागे वाकवा. दृष्टी मागे असेल. हे भुंजगासन होय.
 • श्वास सोडून इंग्रजीतील ए अक्षराप्रमाणे शरीराचा आकार करा. गुडघे वाकवू नका. टाचा जमिनीला टेकवा.
 • ही स्थिती मागील स्थिती चारप्रमाणे असेल.
 • स्थिती तीनप्रमाणे असेल.
 • मागे वाका. स्थिती दोनप्रमाणे असेल.
 • नमस्कार स्थिती एकप्रमाणे असेल.
 • …………………………………………………………..

महाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच – आजच करा नोदणी !

प्राणायाम आणि ध्यान | Pranayama and Meditation

प्राणायाम  म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोश्वसाच्या योग्य तंत्रांचा सराव केल्यास रक्तामधील आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन ऊर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि योगासने हे एकमेकास पूरक आहेत. या दोन योगतत्वांचा मिलाफ झाल्याने शरीर आणि मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्म नियमन प्राप्त होते. प्राणायाम ही ध्यानाच्या गहऱ्या अनुभवाची तयारी असते.

योगात प्राणायामाचे फार महत्त्व आहे, याला योगाचे आठ अंगांमधून चवथा अंग असा देखील म्हटले जाते. हे फारच सोपे आणि फायदेशीर योगासन आहे. ज्याला कुठल्याही वयात, लिंग आणि वर्गाचा व्यक्ती आरामात करू शकतो. प्राणायाम करताना किंवा श्वास घेताना आपण तीन क्रिया करतो – पूरक, कुम्भक, रेचक. अर्थात श्वास घेणे, रोखणे आणि सोडणे. तर तुम्हाला प्राणायामाचे फायदे आणि प्रकार सांगत आहोत …

प्राणायामाचे फायदे:

प्राणायाम फारच फायदेशीर योगासन आहे, जो संपूर्ण शरीराला स्वस्थ बनवतो…

प्राणायाम फुफ्फुसाला स्वस्थ आणि मजबूत बनवतो, ज्याने त्याची क्षमता वाढते.

प्राणायाम रक्तचाप सामान्य करतो आणि हृदय संबंधी आजारांना दूर करण्यास मदत करतो.

प्राणायाम पचन क्रियेला दुरुस्त करतो.

प्राणायाम ऑक्सिजनच्या प्रचुरतेद्वारे रक्ताला घट्ट करतो आणि मस्तिष्कच्या क्रियांना उत्तम बनवतो.

प्राणायाम तणाव कमी करण्याचा सर्वात उत्तम साधन आहे.

प्राणायाम वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

प्राणायामाचे प्रकार:
१) सूर्यभेदन,२) चंद्रभेदन, ३) उज्जायी, ४) सित्कार,५) शितली ,६) भस्त्रिका, ७) भ्रमरी,८) दीर्घ श्वसन,९) अनुलोम विलोम, १०) नाडी शोधन.

१.सूर्यभेदन-

सुखदायक आसनावर बसून उजव्या नाकपुडीतून श्वास घेवून डाव्या नाकपुडीने बाहेर सोडा. हा सूर्यभेदन प्राणायाम आहे. हा प्राणायाम 10-15 मिनिटे करावा. वात रोगांचा जास्त त्रास असल्यास कुंभक करावा.

फायदे:

मस्तक प्रदेश शुद्ध होतो, संधीवात, वात रोगांवर रामबाण उपाय, पोटातील कृमी-दोष नाहीसे होतील, थंड प्रदेशात हा प्राणायाम केल्यास अंग गरम राहील. लठ्ठपणा कमी होईल, अन्नपचन सुधारेल.

२.चंद्रभेदन प्राणायाम-

डाव्या नागपुडीने श्वास आत घेवनू उजव्या नाकपुडीने श्वास आत सोडावा हा चंद्रभेदन प्राणायाम होय. हा प्राणायाम १०-१५ मिनिट करावा. हा प्राणायाम कुंभक केला तरी चालतो.

फायदे:

मेंदु शांत होतो, राग कमी होतो, शांत झोप लागेल. ताप आल्यावर हा प्राणायाम करावा, पित्तासाठी रामबाण उपाय, शरीराची दुर्गंधी नाहिशी करण्यासाठी हा प्राणायाम करावा, दमा कमी होईल.

३.शितली-

जीभ वाकवून तोंडाने श्वास आत ओढा व नाकाने बाहेर सोडा. हा प्राणायाम 10 ते 20 वेळा करावा. पित्ताचा जास्त त्रास असल्यास कुंभक करावा.

फायदे:

ताप व पित्तासाठी लाभदायक, जेवण कमी करुन शरीर जगवता येते.

४.सित्कार-

जीभ दातांच्या मागे लावा. सी-सी आवाज करत श्वास तोंडाने आत घ्या व नाकाने श्वास बाहेर सोडा. हा प्राणायाम 10-15 वेळा करावा.

फायदे:

या प्राणायामाने चंद्रभेदन व शितली प्राणायामाचे फायदे मिळतील. भूक, तहान, निद्रा यांचा त्रास होणार नाही, पिण्यास पाणी नसल्यास व फार तहान लागल्यास हा प्राणायाम करावा.

५.उज्जायी-

तोंड बंद करून दोन्ही नाकांनी घर्षण करत श्वास आत घ्या. या घर्षणाचे स्पंदन ह्दय, कंठ यापर्यंत अनुभव झाला पाहिजे. नाकाने हवा बाहेर सोडून द्या. चालतानासुद्धा हा प्राणायाम करु शकता.

फायदे:

कफ व कंठ रोग नाहिसे होतील.

६.भिस्त्रिका-

सुखकारक बसून दोन्ही नाकांनी श्वास वेगाने आत घ्या व वेगाने बाहेर सोडा. हा प्राणायाम करताना छातीमध्ये श्वास घेवून छाती फुगली पाहिजे. ही क्रिया लोहाराच्या भात्याप्रमाणे होईल. 15-30 मिनीटापर्यंत हा प्राणायाम करा.

फायदे:

वात, पित्त, कफ रोगांवर सर्वोत्तम प्राणायाम आहे, जठराग्नि प्रदिप्त होतो, भूक चांगली लागते. लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते, शरीरावर असणाऱ्या गाठी, चट्टे, कॅन्सर बरे होतील. टाचदुखी थांबेल, सोरायसीसवर उत्तम उपाय, त्वचा सतेज होते, त्वचेची कांती वाढेल, उत्साह वाढतो.

७.भ्रमरी-

हातांनी कान बंद करून पुरक करावा व नाकाने श्वास सोडत भुंग्यासारखा आवाज करत श्वास सोडत रेचक करा. हा प्राणायाम 15-20 वेळा करा.

फायदे:

मानसिक ताण कमी होईल, उत्साह वाढेल, दमा कमी होईल.

८.दीर्घ श्वसन-

सुखकारक बसून दोन्ही नाकाने आवाज न करता दीर्घ श्वास घ्या व दीर्घ श्वास सोडा. हा प्राणायाम करताना छाती फुगली पाहिजे. 15-20 मि. हा प्राणायाम करा.

फायदे:

दमा रोगावर रामबाण उपाय, उत्साह व चैतन्य वाढेल, हिमोग्लोबीन वाढेल, शरीराची त्वचा सतेज होईल सर्व रोगांवर फायदेशीर.

९.अनुलोम-विलोम प्राणायाम-

सुखकारक बसून डाव्या नाकपुडीने पूरक करा व उजव्या नाकपुडीने रेचक करा. उजव्या नाकपुडीने पुरक करा व डाव्या नाकपुडीने रेचक करा. हे झाले एक आवर्तन असे 80 आवर्तन हठयोगात करायला सांगितले आहे. रोज 15-20 मिनिटांनी हा प्राणायाम करावा. एक तासापर्यंत केला तरी चालतो.

फायदे:

दम्यासाठी उपयुक्त, स्टॅमिना वाढतो, उत्साह, तजेला वाढतो, दिवसभर ताजेतवाने वाटेल. सर्व रोगांवर उपयुक्त. संधीवात, गॅस, बद्धकोष्ठता, स्तनाच्या गाठी, अर्धशिशी यावर उपयुक्त, उच्च रक्तदाबावर रामबाण उपाय, मानसिक ताण कमी होईल.

१०.नाडीशोधन प्राणायाम-

हा प्राणायाममध्ये अनलोम-विलोम प्राणायाम करताना कुंभक करायचा आहे. कुंभक करताना यथाशक्ती सहनशिलतेने करावा.

फायदे:

शरीरशुद्धी होईल, लठ्ठपणा कमी होईल.

योग  दिवस निम्मित्त आपण  योगाचे मह्त्व ,प्राणायाम महत्व , फायदे, प्रकार पाहिलेच आहेत तर  आपण हि शारीरिक व मानसिक आरोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने, प्राणायाम करुया तसेच नियमित सूर्यनमस्कार करूया  या मुळे आपल्या  सर्वाना  निरोगी आयुष्य तर लाभेलच  पण व्यक्तीमत्व विकास होण्यास पण मदत होईल आणि दीर्घ कालीन स्वास्थ्य नक्कीच लाभेल.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article