एलआय सी जीवन आरोग्य पोलिसी

Reshma
By Reshma
5 Min Read
एलआयसी ची जीवन आरोग्य

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

एलआयसी ची जीवन आरोग्य-नॉन – लिंक्द हेल्थ इन्शुरन्स प्लान (PLAN NO. 904)

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वैद्यकीय खर्चावर मात करण्यासाठी LIC  ची एक आरोग्य संपन्न योजना

विशेष आकर्षण

 • शेअर बाजाराशी निगडीत नसणारी – अद्वितिय योजना जी देते वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत “जोखीम व आरोग्य” असे दुहेरी संरक्षण
 • स्वतःसाठी (मुख्य विमित व्यक्ती – Principal Insured-PI) व अवलंबून असणाऱ्या पालकांसाठीतसेच सासू सासऱ्यासाठी एकाच पोलिसीत संरक्षण उपलब्ध.
 • सूचित समाविष्ट असलेल्या किंवा नसलेल्या शस्त्रक्रियांसाठी आरोग्य लाभ उपलब्ध.
 • मिळणारा लाभ हा प्रत्यक्ष खर्चावर अवलंबून नसेल.
 • दवाखान्यात ७ दिवसांवर अडमिट असल्यास पहिल्या काही दिवसांचा खर्चही मिळू शकेल.
 • “हॉस्पिटल कॅश बेनेफिट” ची मर्यादा जशी वाढेल तशी अधिकाधिक सूट मिळू शकेल.
 • आयकर कायदा कलम 80D नुसार भरलेल्या हप्त्यामधून रु. २५,०००/- पर्यंत सवलत. (पालक समाविष्ट असतील तर ही सवलत रु.३०,०००/- पर्यंत मिळू शकेल.)

 

योजनेची वैशिष्ट्ये

 • पात्र वय – मुख्य विमित व्यक्ती व पती पत्नीसाठी १८ ते ६५ वर्ष. अवलंबून असणाऱ्या पालकांसाठी – १८ ते ७५ वर्षे, लहान मुलांसाठी ३ महिने पूर्ण ते १७ वर्षे
 • हप्ते भरण्याची पद्धत – वार्षिक व सहामाही हप्त्या प्रकारासाठी सवलत उपलब्ध.
 • विमा हप्त्याला ३ वर्षाची हमी राहील व आपोआप नूतनीकरण सुविधा उपलब्ध राहील.

अद्वितीय लाभ

 • हॉस्पिटल कॅश बेनिफिट (HCB)
 • मोठ्या शस्त्रक्रियांसाठी लाभ – मेजर सर्जिकल बेनिफिट(MCB)
 • अन्य शस्त्रक्रियांसाठी लाभ – अदर सर्जिकल बेनिफिट(OCB)
 • रूग्णवाहिका आकार लाभ – अम्ब्युलंस चार्जेस बेनिफिट
 • टर्म अश्युरन्स रायडर (मृत्यू लाभ) (Optional)
 • ICU बेनिफिट
 • नो क्लेम बेनिफिट
 • डे केअर प्रोसिजर बेनिफिट (DCPB)
 • त्वरित रोख रक्कम मिळण्याची सुविधा – क्विक कॅश फसीलिटी (अटी लागू)
 • हप्ते माफीचा पर्याय – प्रिमियम वेव्हर बेनिफिट (PWB)
 • अपघाती लाभ – अक्सीदेत बेनिफिट रायडर (AB)(Optional)
 • हॉस्पिटल कॅश बेनिफिट – रु. १००० ते रु. ४०००/- प्रति दिवशी (विमाधारकाने स्वतः लाभाची रक्कम निवडायची असून, ती १०००/- रु. च्या पटीत असणे आवश्यक)
 • अतिदक्षता विभागात दाखल असल्यास – वर नमूद लाभाच्या दुप्पट लाभ मिळू शकेल.
 • वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत, मात्र संपुर्ण पोलिसी मुदतीत प्रत्येक सदस्यासाठी जास्तीतजास्त ७२० दिवसापर्यंत लाभ मिळू शकेल.
 • लहान मुलांसाठी सदर लाभ, वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत उपलब्ध राहील.
 • सदर लाभाची रक्कम, दरवर्षी मूळ लाभाच्या ५% याप्रमाणे वाढत जाईल. मात्र अशी वाढ मूळ लाभ रकमेच्या जास्तीतजास्त ५०% पर्यंत वाढू शकेल.

आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती

 

ब) मोठ्या शस्त्रक्रियेसाठी लाभ – सूचित समाविष्ट १४० शस्त्रक्रियांसाठी

– सदर लाभाची रक्कम ही हॉस्पिटल कॅश बेनिफिटच्या १०० पट इतकी असेल.

– सदर लाभाची रक्कम, दरवर्षी ५% या दराने वाढू शकेल. मात्र अशी वाढ, मूळ लाभाच्या जास्तीतजास्त ५०% पर्यंत वाढू शकेल.

– संपूर्ण पोलिसी मुदतीत – मोठ्या शस्त्रक्रिया लाभाच्या जास्तीतजास्त – ८ पट लाभ मिळू शकेल. (दरवर्षी एक MSB लाभ याप्रमाणे)

– हा लाभ लहान मुलांसाठी वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत व इतरांसाठी वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत उपलब्ध राहील.

क) डे केअर प्रोसिजर बेनिफिट – १४० प्रकारच्या “डे केअर प्रोसिजर्स” साठी . लागू असणाऱ्या प्रतिदिवशी लाभाच्या ५ पट याप्रमाणे लाभ मिळू शकेल. असा लाभ एका वर्षासाठी जास्तीतजास्त ३ पट व संपूर्ण पोलिसी मुदतीत -२४ पट इतका मिळू शकेल.

ड) अदर सर्जिकल बेनिफिट – मोठ्या शस्त्रक्रियांसाठी सूचित समाविष्ट नसणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी हा लाभ उपलब्ध राहील. या अंतर्गत लागू असणारया प्रतीदिवशी लाभाच्या २ पट लाभ मिळू शकेल. एका वर्षात जास्तीतजास्त ४५ व संपूर्ण  पोलिसी  मुदतीत ३६० दिवसांसाठी लाभ मिळू शकेल. (१ ल्या वर्षासाठी १५ दिवस)

इ) त्वरीत रोकड सुविधा (क्विक कॅश फसिलीटी) – सर्व विमित व्यक्तींसंदर्भात हा लाभ लागू राहील. कॅटेगरी १ व २ च्या मोठ्या शस्त्रक्रियांसाठी अडव्हांस स्वरूपात, ला लाभ दिला जाईल. अडव्हांस ची रक्कम, पात्र मोठ्या शस्त्रक्रिया लाभाच्या ५०% पर्यंत असू शकेल.

क) रुग्णवाहिका आकार – कॅटेगरी १ व २ अंतर्गत सूचित मोठ्या शस्त्रक्रियांसाठी, प्रत्येक विमा व्यक्तीसाठी प्रत्येक वर्षी रु. १०००/- याप्रमाणे लाभ मिळू शकेल.

ग) हप्ते माफीचा लाभ – कॅटेगरी १ व २ अंतर्गत सूचित केलेल्या मोठ्या शस्त्रक्रियासंदर्भात, १ वर्षाचे हप्ते माफ होऊ शकतील.

ह) टर्म अश्युरन्स रायडर – जादा हप्ता भरून, मोठ्या शस्त्रक्रिया लाभ, मृत्यू लाभ मिळू शकेल.

ग) अपघाती लाभ – जादा हप्ता भरून, जास्तीतजास्त, मूळ मोठ्या शस्त्रक्रिया लाभाइतकी रक्कम अपघाती लाभ म्हणून मिळू शकेल.

ज) नो क्लेम बेनिफिट – आपोआप नूतनीकरणाच्या दोन तारखामधील कालावधीत, कुठल्याही विमित व्यक्तीसंदर्भातील, कुठलाही दावा आला नसेल तर, सर्व विमित व्यक्तीसाठी , IDB च्या ५% इतकी रक्कम, पुढील नूतनीकरण तारखेपासून ADB मध्ये मिळवली जाईल.

एल आय सी  पोलिसी बद्दल अधिक माहिती साठी एल आय सी च्या  खालील अधिकृत पेज वर माहिती पहा

https://licindia.in/lic-s-jeevan-arogya-plan-no.-903-uin-no.-512n266v01-

 

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.