उत्पन्नाचा दाखला

उत्पन्नाचा दाखल्याचा वापर हा जास्त प्रमाणात विद्यार्थी वर्गात होतो. शासनाच्या सवलती / शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करते वेळी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागतो.तो दोन प्रकारात असतो.१.एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. २.तीन वर्षांचा एकत्रित उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला. हा व्यक्ती ज्या ठिकाणी रहिवासी व्यवसाय अथवा नोकरी करत असेल त्या ठिकाणीच काढता येतो. उत्पन्नाचा दाखला हा केवळ १ वर्षांसाठीच वैध असतो.

         उत्पन्नाचा दाखला प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • कोर्ट फी स्टँप लावलेला विहित नमुन्यातील अर्ज व शपथपत्र
  • व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील असल्यास गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र
  • तलाठी व्यवसाय बाबत व उत्पन्ना बाबतचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड झेरॉक्स
  • व्यक्ती नोकरदार असल्यास पगारपत्रक
  • शालेय कामकाजासाठी विद्यार्थ्याला दाखला लागत असल्यास शाळा सोडल्याचा दाखल्याची झेरॉक्स अथवा शाळेय बोनाफाईड जोडावे.

———————————————————————————————————————-

सेवा योजना कार्यालयातील नोंदणी / एम्प्लोयमेंट ऑफीस

युवकांना रोजगार संधी देण्यासाठी शासनाच्या विविध नोकरीसाठी पात्र उमेदवार गुणवत्तेनुसार व नोंदणी जेष्ठतेनुसार सेवायोजना कार्यालयातून कॉल पाठविले जातात.सेवा योजन कार्यालयात नोंदणीसाठी तालुक्याच्या प्रत्येक शासकीय आय.टी.आय.मध्ये स्वतंत्र विभाग स्थापन केलेला आहे.नाव नोंदविण्यासाठी पुढील कागदपत्रे लागतात.

१. सेवा योजन कार्यालयात नोंदणी साठी उमेदवार वय १४ वर्षे पूर्ण असावे.

२.एस.एस.सी.मूळ गुणपत्रक व प्रमाणपत्रक सोबत शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स चालू अथवा शेवटची शैषणिक अर्हता,इतर कौशल्य शिक्षण,संगणक,टायपिंग,आय.टी.आय.इ.प्रशिक्षणाचे मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रत

३.सदर सेवायोजन नोंदणी हि ३ वर्षांसाठी ग्राह्य असते.त्यानंतर नूतनीकरण करावे.