कृषी पीक कर्ज विमा योजना

Reshma
By Reshma
16 Min Read
कृषी पीक कर्ज विमा योजना

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

भारतात पीक विमा कंपन्या:

भारतीय कृषि विमा कंपनी मर्या. (एआयसीआय) द्वारा प्रवर्तित:

१     साधारण विमा कंपनी (जीआयसी)

२    कृषि व ग्रामीण विकासाकरिता राष्ट्रीय बॅंक (नाबार्ड)

इतर चार विमा उपकंपन्या आहेत:

१     नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि..

२    न्यू इंडिया अशुअरन्स कंपनी लि.

३    ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि.

४    युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.

बीएएसआयएक्सच्या सहकार्याने आयसीआयसीआय लोम्बार्डने पहिल्यांदा हवामान विम्याची तरतूद केली आहे. इफ्को टोकीयोने अलिकडेच हवामान विमा व्यवसायामध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रीय कृषि विमा योजना (पीक विमा)

राष्ट्रीय कृषि विमा योजना (एनएआयएस) देशामध्ये रबी 1999-2000 पासून भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आली होती. आमच्या राज्यामध्ये ही योजना कृषि विभाग, कृषि विमा कंपनी (कार्यान्वयन एजंसी) आणि आर्थिक व सांख्यिकी संचालनालयाच्या गोवणूकी सोबत खरीप 2000 हंगामापासून सुरु करण्यात आली आहे. राज्यामध्ये ही योजना जिल्हा सहकारी केंद्रीय बॅंका, ग्रामीण बॅंका, वाणिज्यिक बॅंका व प्राथमिक कृषि सहकारी संस्थांच्या प्रत्यक्ष सहयोगाने व गोवणूकीने कार्यान्वित करण्यात आली आहे.

उद्दिष्टे:-

अवर्षण, चक्रीवादळ आणि कीटक व रोग इत्यादीचा आपात यामुळे पीक वाया गेले तर शेतक-यांकरिता एका वित्तीय आधाराच्या उपायाची तरतूद करणे.

पुढील हंगामाकरिता एका पीक अपयशानंतर एका शेतक-याची उधार पात्रता पूर्ववत करणे.

शेती मध्ये प्रगतिशील शेती करण्याचे उपयोजन, उच्च मूल्य निविष्टि व उच्चतम तंत्रशास्त्र अंगीकारण्याकरिता शेतक-यांना उत्तेजन देणे.

शेती उत्पन्नात स्थैर्य आणण्या करिता मदत करणे, मुख्यतः आपात वर्षांमध्ये.

पीक संरक्षण:-

खरीप 2008 दरम्याने, वीस पीके संरक्षित करण्यात येतील उदा. 1. भात, 2. जवार, 3. बाजरा, 4. मका, 5. काळा हरभरा, 6. हीरवा हरभरा, 7. लाल हरभरा, 8. सोयाबीन, 9. भुईमूग (आय), 10. भुईमूग (युआय), 11. सूर्यफूल, 12. एरंडेल, 13. ऊस (पी), 14. ऊस (आर), 15. कापूस (आय), 16. कापूस (युआय), 17. मिरची (आय), 18. मिरची (युआय), 19. केळी, 20. हळद.

रबी 2007-08 दरम्याने, अकरा पीके संरक्षित करण्यात आली होती उदा. 1. भात, 2. जवार (युआय), 3. मका, 4. हिरवा हरभरा, 5. काळा हरभरा, 6. भुईमूग, 7. सूर्यफूल, 8. मिरची, 9. कांदा, 10. आंबा, 11. बेंगाल हरभरा.

विम्याची रक्कम/संरक्षणाची मर्यादा :

विम्याची रक्कम (एसआय) विमा उतरलेल्या शेतक-यांच्या विकल्पावर विमा उतरलेल्या पीकाच्या सुरुवातीच्या उत्पन्नाच्या किंमती पर्यंत वाढविण्यात येईल. तथापि, एक शेतकरी वाणिज्यिक दरांवर विमा हप्त्याच्या भरण्यावर निश्चित केलेल्या क्षेत्राच्या सरासरी उत्पन्नाच्या 150% पर्यंत सुरुवातीच्या उत्पन्न स्तराच्या किंमतीच्या पुढे त्याच्या पीकाचा विमा उतरवू शकेल. ऋणको शेतक-यांच्या प्रकरणा मध्ये विम्याची रक्कम अग्रिम पीक कर्जाच्या रक्कमेच्या कमीत कमी समान असावी. अधिक, ऋणको शेतक-यांच्या प्रकरणा मध्ये, विमा प्रभार कर्ज प्राप्त करण्याच्या प्रयोजना करिता वित्त परिमाणाच्या अतिरिक्त असतील. पीक विमा संवितरण प्रक्रियांच्या प्रकरणां मध्ये आरबीआय / नाबार्डचे मार्गदर्शन बंधनकारक राहील.

विमा हप्त्याचे दर:

विमा हप्त्याचे दर बाजरा व गळित धान्यांकरिता 3.5%, इतर खरीप पिकां करिता 2.5%, गहू करिता 1.5% व इतर रबी पिकांकरिता 2% आहेत. जर विमागणितीय आधार सामग्रीच्या आधारावर तयार केलेले दर विहित दरापेक्षा कमी आहेत तर, निम्न दर लागू होईल. लहान व किरकोळ शेतक-याची व्याख्या खालील अनुसार राहीलः-

किरकोळ शेतकरी: 1 हेक्टर किंवा कमी (2.5 एकर) जमीन धारण करणारा एक शेतकरी.

ऋतुमानता अनुशासन:

१)  ऋणको शेतक-यांकरिता पालन करण्यात येणारे विस्तृत ऋतुमानता अनुशासन खालील अनुसार राहीलः

कार्यक्रम –  खरीप / रबी

कर्ज कालावधी –  एप्रिल ते सप्टेंबर / ऑक्टोबर ते मार्च

घोषणा स्वीकृति करिता कट-ऑफ तारीख –  नोव्हेंबर / मे

उत्पन्न आधार सामग्री स्वीकृतिकरिता कट-ऑफ तारीख –  जानेवारी / मार्च     जुलै / सप्टेंबर

२)   बिगर-ऋणको शेतक-यांच्या संबंधा मध्ये प्रस्ताव स्वीकृति करिता विस्तृत कट-ऑफ तारखा खालील अनुसार राहतील :-

१     खरीप हंगामः 31 जुलै

२    रबी हंगामः 31 डिसेंबर

तथापि, ऋतुमानता अनुशासनात फेरबदल करण्यात येईल, जर आणि जेथे राज्य / केंद्रशासित प्रदेश व भारत सरकार सोबत विचारविनिमयामध्ये आवश्यक आहे.

 संरक्षणाचे स्वरूप व क्षतिपूर्ति :-

राष्ट्रीय कृषि विमा योजना अंतर्गत भरपाई खालील सूत्रावर पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर आकारलेल्या सरासरी उत्पन्नाच्या आधारावर निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये निश्चित केलेल्या पिकांकरिता परिगणित करण्यात येईल.

आरंभ उत्पन्न – वास्तविक उत्पन्न

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –   X विम्याची रक्कम

आरंभ उत्पन्न (कर्ज मंजूर रक्कम)

जेथे:

आरंभ उत्पन्न = हमी प्राप्त उत्पन्न

वास्तविक उत्पन्न = निश्चित केलेल्या पीकाचे वर्तमान उत्पन्न

विम्याची रक्कम = मंजूर कर्ज

जेव्हा जेव्हा उत्पन्न नुकसान आढळेल, भरपाई रक्कम भारतीय कृषि विमा कंपनी मर्यादित द्वारे परिगणित करण्यात येईल, व ती संबंधित बॅंकां द्वारे पात्र ऋणकोंच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल. एका विशिष्ट विमा एककामध्ये, जर वास्तविक उत्पन्न आरंभ उत्पन्नापेक्षा (हमी प्राप्त) अधिक आहे, तर भरपाई शून्य राहील.

पीक विम्याकरिता अर्ज कसा करावा

प्रत्येक पीक हंगामाच्या सुरुवातीला, जीआयसी सोबत सल्लामसलत करुन राज्य सरकार /केंद्र शासित प्रदेश प्रशासन पीके अधिसूचित करेल व क्षेत्रे निश्चित करेल, जी हंगामा दरम्याने योजने अंतर्गत संरक्षित करण्यात येतील. विमा हप्त्या सोबत पीक विम्याचा मासिक पीक-अनुसार व क्षेत्र-अनुसार तपशील नोडल पॉइण्टला पाठवावा व विविध कर्ज संवितरण पॉइण्ट कडून अशा माहितीच्या प्राप्तिवर नोडल पॉइण्ट निश्चित कट-ऑफ तारखांनुसार मासिक आधारावर त्याची छाननी करेल व तो जीआयसीला पारेषित करेल. ऋणको शेतक-याने कर्जा सोबत, ज्याकरिता बॅंक त्याला खाली निर्दिष्ट रुपात घोषणा प्रपत्र भरायला व संबंधित दस्तऐवज प्रस्ताव प्रपत्राला संलग्न करायला भाग पाडेल, पीक विमा घ्यावा. बिगर-ऋणको शेतकरी, जो योजने मध्ये दाखल होण्याकरिता इच्छुक आहे, त्याने प्रस्ताव व एनएआयएसचे घोषणा प्रपत्र भरावे व ते वाणिज्यिक बॅंकेची ग्राम शाखा किंवा क्षेत्रीय ग्रामीण बॅंक किंवा सहकारी बॅंकेची पीएसीएस मध्ये विम्याच्या हप्त्या सोबत सादर करावे. प्रस्ताव स्वीकारताना विमा रक्कमेच्या तपशील, अधिकतम मर्यादा इत्यादीची पडताळणी करणे शाखा/पीएसीएसची जबाबदारी आहे. तपशील त्यानंतर एकत्रीकृत आहे व तो सरकारच्या अधिसूचने मध्ये विनिर्दिष्ट तारखांच्या पूर्वी जीआयसी राज्य स्तरीय पीक विमा विभागाला पुढील प्रेषणाकरिता संबंधित नोडल पॉइण्टना पाठवावा.

संलग्न करण्या करिता प्रपत्रेः

बिगर-ऋणको शेतक-या करिता प्रस्ताव प्रपत्र

ऋणको शेतक-याकरिता घोषणा प्रपत्र

बिगर-ऋणको शेतक-या करिता घोषणा प्रपत्र

कृषि विमा रक्कम / विमा हप्त्याची परिगणना :

विमा हप्त्याची रक्कम काही घटकांवर उदा. शेतक-याच्या जमीनीचा आकार, त्याची वित्तीय स्थिति, विमा उतरविण्यात आलेल्या पीकांची संख्या व विम्याच्या रक्कमेवर अवलंबून आहे. शेतकरी एक दावा प्रपत्र सादर करुन बॅंकांकडून दावा करु शकतील. दावा प्रतिनिधी पीकांना हानी पोचविणा-या कारणांच्या व्याप्तिचे विश्लेषण करतील. सर्वेक्षकाच्या अहवालावर आधारित, दावा एक महिन्याच्या आत शेतक-यांना देण्यात येईल.

कृषि विमा दाव्या करिता आवश्यक दस्तऐवज :

१         शेतक-याने पदनिर्देशित शाखा / पीएसीएस जवळ जाणे आवश्यक आहे व विहित स्वरुपामध्ये प्रस्ताव प्रपत्र सादर करावे.

२         शेतक-याने लागवडयोग्य जमीनीच्या कब्जाच्या संबंधामध्ये दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक आहे (पास बुक व उता-याची प्रत).

३         जमीन महसूल पावती संलग्न करावी.

शेतक-याने, जर आवश्यक असेल तर, क्षेत्र पेरणी पुष्टीकरण प्रमाणपत्र पुरवणे आवश्यक आहे.

दावा मान्यता व समझोता करिता प्रक्रिया:

१. विहित कट-ऑफ तारखांनुसार राज्य/केंद्र शासित प्रदेश सरकारांकडून एकदा उत्पन्न आधार सामग्री प्राप्त झाली, तर दावे आयए द्वारे तयार करण्यात व समझोता करण्यात येतील.

२. दावा तपशीलांसोबत दावा धनादेश व्यक्तिगत नोडल बॅंकांना प्रदान करण्यात येतील. बॅंक सामान्य लोकांच्या स्तरावर, आळीपाळीने, व्यक्तिगत शेतक-यांच्या खात्यांमध्ये जमा करेल व त्याच्या सूचना फलकावर लाभाधिका-यांचा तपशील प्रदर्शित करील.

३. स्थानिक घटनेच्या उदा. गारपीट, माती घसरणे, चक्रीवादळ व पूर इत्यादीच्या संदर्भामध्ये आयए, डीएसी/राज्य/केंद्रशासित प्रदेशांसोबत विचार विनिमय करुन व्यक्तिगत शेतकरी स्तरावर अशा हानिचा अंदाज करण्या करिता एक प्रक्रिया विकसित करेल. अशा दाव्यांचा समझोता आयए व विमेदार दरम्याने व्यक्तिगत आधारावर करण्यात येईल.

हवामान विमा योजनाः

हवामानाच्या लहरींमुळे होणा-या हानिकरिता विमा-अधिक पाऊस, पावसात तूट, सूर्यप्रकाशाची उणीव इ.

आरंभ करण्यात आलेल्या हवामान विमा योजना : वर्षा बीमा – २००५

व्याप्ति :

वर्षा बीमा तुटीच्या पावसामुळे पीक उत्पन्ना मध्ये अपेक्षित तुटीला संरक्षण देते. वर्षा बीमा शेतक-यांच्या सर्व प्रकारां करिता ऐच्छिक आहे. ज्यांना पावसाच्या अनिष्ट आपातामुळे वित्तीय रूपात नुकसान पोहचले आहे, ते योजने अंतर्गत विमा घेऊ शकतील. सुरुवातीपासून वर्षा बीमा शेतक-यांकरिता अर्थपूर्ण आहे, ज्यांच्या करिता राष्ट्रीय कृषि विमा योजना (एनएआयएस) ऐच्छिक आहे.

 विम्याचा कालावधी :

विमा लघु कालावधी पिकां करिता जून ते सप्टेंबर, मध्यम कालावधी पिकां करिता जून ते ऑक्टोबर व दीर्घ कालावधी पिकांकरिता जून ते नोव्हेंबर दरम्याने उपयोगात येतो. अधिक, हे कालावधी राज्य-विनिर्दिष्ट आहेत. पेरणी अपयश विकल्पाच्या प्रकरणामध्ये तो 15 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत आहे.

वर्षा बीमा कसा खरेदी कराल :

प्रस्ताव प्रपत्रे सर्व कर्ज संवितरण केंद्रावर उदा. सर्व सहकारी / वाणिज्यिक / ग्रामीण बॅंकांच्या पीएसी शाखांवर उपलब्ध आहेत. सामान्य लोकांच्या स्तरावर वर्षा बीमा अंतर्गत संरक्षण एनएआयएस, विशेषतः सहकारी क्षेत्र संस्था, रूपात ग्रामीण वित्त संस्थांच्या (आरएफआय) वर्तमान जाळ्या मार्फत बहुधा देण्यात येईल. तसेच एआयसी त्याच्या जाळ्याच्या उपलब्धतेच्या अधीन प्रत्यक्ष बाजार / विम्याची तरतूद करेल. ग्रामीण क्षेत्रांमध्ये कार्य करणा-या संस्था औपचारिक व अनौपचारिक संस्था उदा. एनजीओ, स्वयं मदत समूह (एसएचजी), शेतक-यांच्या समूहांचे जाळे वर्षा बीमाच्या बटवड्याकरिता उपयोगात आणता येऊ शकेल. वर्षा बीमा अंतर्गत विम्या करिता प्रस्तावित शेतक-यां जवळ आरएफआय शाखेमध्ये एक बॅंक खाते असणे आवश्यक आहे, जी त्याचे/तिचे विमा व्यवहार सुकर करेल.

विमा खरेदी कालावधी :

एक शेतकरी इतर विकल्पांकरिता 30 जून व पेरणी अपयश विकल्पा करिता फक्त 15 जून पर्यंत वर्षा बीमा खरेदी करु शकेल.

संरक्षण विकल्पः

विकल्प – I: मोसमी पर्जन्यमान विमा :

संपूर्ण हंगामा करिता साधारण पर्जन्यमानाकडून (मिमी. मध्ये) वास्तविक पर्जन्यमाना मध्ये 20% व अधिकच्या नकारात्मक विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. वास्तविक पर्जन्यमान जून ते नोव्हेंबर पर्यंत मासिक संचयी पर्जन्यमान आहे (लघु व मध्यम कालावधी पिकांकरिता जून ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर सोबत). पैसे पूर्णपणे देण्याची संरचना ह्या प्रकारे बनविण्यात आली आहे की, उत्पन्न पर्जन्यमानामध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध श्रेणीशी परस्पर संबंद्ध आहे. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम अधिकतम संभाव्य हानिच्या तदनुरुप अधिकतम पैसे पूर्णपणे देणे आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणांवर (टप्प्यां मध्ये) राहील, जे वास्तविक पर्जन्यमानामध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध प्रमाणांनुसार असेल.

विकल्प – II: पर्जन्यमान वितरण निर्देशांक :

संपूर्ण हंगामा करिता साधारण पर्जन्यमान निर्देशांका कडून वास्तविक पर्जन्यमान निर्देशांकामध्ये 20% व अधिकच्या प्रतिकूल विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. निर्देशांक हंगामा मध्ये साप्ताहिक पर्जन्यमाना करिता परस्पर संबंध वाढविण्याकरिता निर्माण करण्यात आलेला आहे. निदेशांक आयएमडी स्टेशन ते स्टेशन व पीक ते पीक पर्यंत कमी अधिक होतील. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम अधिकतम संभाव्य हानिच्या तदनुरुप अधिकतम पैसे पूर्णपणे देणे आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणावर (टप्प्यांमध्ये) राहील, जे वास्तविक पर्जन्यमान निर्देशांका मध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध प्रमाणांनुसार असेल.

विकल्प – III: पेरणी अपयश :

15 जून व 15 ऑगस्ट दरम्याने 40% पुढे साधारण पर्जन्यमान (मिमी. मध्ये) कडून वास्तविक पर्जन्यमाना मध्ये (मिमी. मध्ये) प्रतिकूल विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम पेरणी कालावधीच्या समाप्ती पर्यंत शेतक-या द्वारे केलेला अधिकतम निविष्ट खर्च आहे व ती पूर्व विनिर्दिष्ट आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणावर राहील, जे पर्जन्यमान विचलनांच्या विविध प्रमाणानुसार असेल. विम्याच्या रक्कमेच्या 100% अधिकतम पैसे पूर्णपणे देणे 80% व अधिकच्या विचलनांवर उपलब्ध आहे.

विम्याची रक्कम :

विम्याची रक्कम पूर्व-विनिर्दिष्ट आहे व साधारणपणे उत्पादन खर्च व उत्पादनाची किंमत दरम्याने आहे. पेरणी अपयश विकल्पाच्या प्रकरणा मध्ये, पेरणी कालावधी, जो पुन्हा पूर्व-विनिर्दिष्ट आहे, समाप्ती पर्यंत तो शेतक-या द्वारे केलेला अधिकतम निर्विष्ट खर्च आहे.

विमा हप्ता :

विमा हप्ता विकल्प ते विकल्प व पीक ते पीक पर्यंत कमी अधिक होईल विमा हप्त्याचे दर लाभ लक्षात घेऊन आशावादी आहेत, व 1% पासून सुरु होतात.

दावा भरण्याचे वेळापत्रक व प्रक्रिया:

दावे तयार करण्याची प्रक्रिया स्वयंचलित आहे अर्थात विमेदार शेतक-या द्वारे दाव्यांची सूचना किंवा गहाळ माहिती सादर करण्या करिता आवश्यकता नसेल. साधारणपणे दावे क्षतिपूर्ति कालावधीच्या समाप्ती पासून एका महिन्या मध्ये वास्तविक पर्जन्यमान आधार सामग्रीच्या आधारावर चुकता करण्यात येणार आहेत.

पीक विमा योजनेची एकंदरीत गरज, व्याप्ती, अंमलबजावणीत असणारी क्‍लिष्टता अशा अनेक कारणांमुळे पीक विमा योजना सध्यातरी सार्वजनिक पातळीवरच आहे. वैयक्तिक पातळीवर विमा योजना राबवणे अवघड असले, तरी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खरीप, रब्बी व बारमाही अशा पीक हंगामांतील सर्वच पिके अजूनही योजनेत समाविष्ट झालेली नाहीत, त्यामुळे उपलब्ध योजनेचाच लाभ घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील गोष्टींची दक्षता घ्यावी.

1) आपण करीत असलेल्या खरीप, रब्बी व बारमाही पिकांचा अंतर्भाव पीक विमा योजनेत आहे किंवा नाही याची प्रथम चौकशी करावी.

2) सदर पीक विमा योजनेसाठी पात्र असल्यास, त्वरित नजीकच्या बॅंकेत संपर्क साधून पीक कर्जाचा अर्ज देऊन कर्ज मंजूर करून घ्यावे व आपले पीक कर्ज विमा अंतर्गत समाविष्ट केल्याची खात्री करावी.

3) आपण पीक कर्ज घेत नसाल, तर बॅंकेत जाऊन योग्य ते फॉर्म भरून विमा हप्ता भरावा व योजनेत समाविष्ट केल्याची खात्री करावी.

4) विमा योजनेत समाविष्ट होण्यासाठी (कर्जदार किंवा बिगर कर्जदार) दिलेल्या मुदतीत सर्व बाबींची पूर्तता करावी, कारण ही मुदत निघून गेल्यावर योजनेत समाविष्ट होता येणार नाही.

5) विमा योजना सार्वजनिक पातळीवर ठरवलेल्या नुकसान भरपाईवर अवलंबून असते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानच विमा मंजुरीस पात्र असते. त्यामुळे ग्रामपंचायत, तालुका पंचायत अशा ठिकाणी चौकशी करावी. आणेवारी किती जाहीर होते, याकडे लक्ष ठेवावे.

6) आपण पीक कर्ज घेत असल्यास, ते त्वरित – वेळेवर भरून नवीन कर्ज वितरण विमा मुदतीतच करून घ्यावे, कारण या मुदतीनंतर घेतलेले कर्ज विमा करण्यास पात्र असणार नाही.

7) कर्ज वेळेवर भरले नाही, थकीत गेले, तर नवीन कर्ज मिळणार नाही. अशा परिस्थितीत जुने, थकीत कर्ज विम्यास पात्र राहणार नाही व नवीन कर्ज न मिळाल्यामुळे नवीन पीक विम्यास पात्र राहणार नाही. त्यामुळे पीक कर्ज वेळेवर भरावे. पीक कर्ज घेण्यात अडचण असेल, तर स्वतंत्रपणे विमा घ्यावा.

8) नैसर्गिक आपत्तीमुळे पीक आले नाही व सदर पीक विमा मंजुरीस पात्र झाल्यास, अशा कर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीक कर्ज घ्यावे व ते पीक विमा योजनेत समाविष्ट करावे. पुनर्गठन केलेल्या कर्जास तीन वार्षिक हप्ते मिळतील. त्यातील काही रक्कम विमा रकमेतून भरपाई होऊ शकेल. बाकी रक्कम स्वतःला भरावी लागेल. शक्‍य असल्यास असे कर्ज विम्याची वाट न पाहता भरावे म्हणजे व्याजाचा बोजा वाढणार नाही.

9) पीक विमासंदर्भात केल्या जाणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची कागदपत्रे, पोच जपून ठेवावी.

10) सध्याच्या विमा पद्धतीनुसार, वैयक्तिक स्तरावर पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळत नाही. तसेच, सरासरी उत्पादन घट व त्याप्रमाणे विमा मंजुरी होत असते, त्यामुळे प्रत्यक्ष नुकसान व भरपाई यांत फरक राहतो. म्हणून आपली परिस्थिती साथ देत असेल, तर कर्ज लवकरात लवकर भरावे. विमा मंजूर होऊन आल्यानंतर सदर रक्कम रोखीने परत मिळू शकते.

शेतकऱ्यांच्या माण्या, शासकीय धोरणे यानुसार पीक विमाबाबत वरचेवर बदल होत असतात, त्याची माहिती घेत राहणे महत्त्वाचे असते.

शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
1 Review
  • Avatar of Ramprasad Kisandas BairagiRamprasad Kisandas Bairagi says:

    हाऊ कॅन आय फिल इन्शुरन्स ऑनलाईन?
    Send the link for Buldhana district , maharashtra.

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *