navratri देवीची नऊ रूपे

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.

व्रत करण्याची पद्धत-
नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यांत कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.
अ. घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी.
आ. नवरात्रमहोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील मृत्तिका आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (पाच किंवा) सप्तधान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये होत.
इ. मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात.
ई. सप्तधान्ये आणि कलश (वरुण) स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी.
उ. नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते.

ऊ.अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रमहोत्सव साजरा करावा.

नवरात्रातील नऊ माळा
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.
पहिली माळ-शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ
दुसरी माळ-अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढर्याआ फुलांची माळ.
तिसरी माळ-निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.
चौथी माळ-केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
पाचवी माळ-बेल किंवा कुंकवाची वाहतात.
सहावी माळ-कर्दळीच्या फुलांची माळ.
सातवी माळ-झेंडू किंवा नारिंगीची फुले.
आठवी माळ-तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
नववी माळ-कुंकुमार्चनाची वाहतात.

इसवी सन २०१५ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग
पहिला दिवस (१३ ऑक्टोबर, मंगळवार) – प्रतिपदा : लाल
दुसरा दिवस (१४ ऑक्टोबर, बुधवार) – द्वितीया – निळा
तिसरा दिवस (१५ ऑक्टोबर, गुरुवार) – तृतीया – पिवळा
चौथा दिवस (१६ ऑक्टोबर, शुक्रवार) – चतुर्थी – हिरवा
पाचवा दिवस (१७ ऑक्टोबर, शनिवार) – पंचमी – करडा (ग्रे)
सहावा दिवस (१८ ऑक्टोबर, रविवार) – षष्ठी – केशरी
सातवा दिवस (१९ ऑक्टोबर, सोमवार) – सप्तमी – पांढरा
आठवा दिवस (२० ऑक्टोबर, मंगळवार) – अष्टमी – गुलाबी
नववा दिवस (२१ ऑक्टोबर, बुधवार) – नवमी – जांभळा

Adminसामान्यघटस्थापना,नवरात्रोत्सव
 देवीची नऊ रूपे प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी । तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।। पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच । सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।। नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः । उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।। १. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची...
Ejanseva.com is Free Informative blog portal for all Indians. People can submit articles, content to us. We check & unique useful post publish with your name as author.
Topics - Current Affairs | Social | Politics | Agriculture | Sports | Educations | Festivals | Historical | Online Internet and many more useful
Like, Share, Follow, Subscribe, Contribute & Get Rewarded from Ejanseva Submit Article Now