खास महिलांसाठी वाचनात आलेला सुंदर व उपयुक्त संदेश ✍✍ ‘Healthy WOMEN’….

‘अष्टभुजा नारायणी’
या अवस्थेचा अनुभव जर आपल्याला रोज सकाळी घेता आला तर खरंच किती बरं होईल!

धावणारं घड्याळ आणि रेंगाळणारे घरातले यांचा तोल साधायला जरा तरी मदत होईल.

अष्टावधानी या शाळेत वाचलेल्या शब्दाचा अर्थ आपण दिवसाच्या पहिल्याच प्रहरात घेत असतो.

साफसफाई,स्वयंपाक, आवराआवरी,दिवसभराचे कामांचे नियोजन अश्या एकाच वेळी अनेक आघाड्यांवर आपण लढत असतो.

हात, पाय, मेंदू, तोंड आणि हो आपलं मनसुद्धा या वेळी प्रचंड व्यस्त असतं.

पहाटे पाच वाजायच्या आसपास सुरु झालेलं हे शरीराचं यंत्र रात्री बारा वाजेपर्यंत आई, बायको, सून, मुलगी, बहीण, भावजय याच जोडीला जबाबदार कर्मचारी अशा आखलेल्या परिघात वेगवेगळ्या अपेक्षांच्या ओझ्याचा पिंगा घालत नाचत असतं.

………..आणि अचानक महिला दिन किंवा women’s day येतो आणि सगळ्यांना या गोष्टीचा साक्षात्कार होतो.

या दिवसापुरते स्त्रीच्या समर्पणाचे, त्यागाचे गोडवे गायले जातात.

स्त्रीच्या कष्टांची, तिच्या परिश्रमाची, तिच्या संघर्षाची, तिच्या जिद्दीची जाणीव सगळ्यांना होते.

पण वर्षानुवर्षे या चक्रातून जाणाऱ्या तिच्या शरीराला मात्र ही जाणीव हळूहळू रोज व्हायला लागलेली असते.

वाढत जाणारे वजन, दुखणारे गुडघे, पित्ताचा त्रास, कंबरदुखी, पाळीचा त्रास, कमी हिमोग्लोबिन, दम लागणे, टाचा प्रचंड दुखणे, रात्री झोप न येणे, अनामिक दडपण जाणवणे, केस गळणे, भेगा पडणे, त्वचा कोरडी कोरडी होत जाणे अशा असंख्य तक्रारी शरीरात मुक्कामी येऊ लागतात.

या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते पण खरंच यासाठी वेळ कुठून आणायचा? हाच यक्षप्रश्न सुटत नसतो.

या सगळ्या fire fighting lifestyle मध्ये जर आपलं निरोगीपण टिकलं तर आणि तरच या अष्टभुजा नारायणीचा वरदहस्त मिळून Super woman होता येईल!

Energy boosting:

पाव किलो खारीक पावडर, पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी cerelac तयार करता येईल.

दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही energy level maintain ठेवता येईल.

बस्स पांच मिनिटंवाला नाश्ता with देशी अंदाज:

नाश्ता compulsory प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात, तुपसाखर पोळी, लोणी-साखर पोळी, राजगिरा लाही व दुध, लाह्यांचे पीठ व ताक, नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी, पुलाव, थालीपीठ, उपमा, शेवई उपमा यासारखा अस्सल देशी menu नक्की करायचा.

ओट्स, कॉर्नफ्लेक्स, packed juices, बेकरी पदार्थ, शिळे पदार्थ, मॅगी यांना ठामपणे “NO” म्हणायचे.

किचन क्लिनिक:

फोडणी करतांना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास दूर सरतील.

एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू हे combination आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे anaemia ला bye bye
ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की पचनाच्या तक्रारी चक्क गायब.

कणकेत चिमूटभर चुना add करून, कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा भरपूर वापरून हाडांना strong ठेवता येईल.

Fitness मंत्र :

सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठी देऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास. दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून टाचदुखी ला कायमचा निरोप देऊया.

==============
सगळ्यांना आपण आनंदी ठेवतोच पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मित्र-मैत्रिणी शोधून खूप हसूया.

आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना, मनाच्या खॊल कप्प्यात दडलेल्या आवडीला या निमित्ताने वर काढूया. स्वतःची ओळख घडवून आणत, निरामयतेच्या वाटेने जाता जाता “फिरुनी नवे जन्मेन मी” हे promise स्वतःशीच करूया !

AdminGuest Postखास महिलांसाठी वाचनात आलेला सुंदर व उपयुक्त संदेश ✍✍ 'Healthy WOMEN'....
खास महिलांसाठी वाचनात आलेला सुंदर व उपयुक्त संदेश ✍✍ 'Healthy WOMEN'.... 'अष्टभुजा नारायणी' या अवस्थेचा अनुभव जर आपल्याला रोज सकाळी घेता आला तर खरंच किती बरं होईल! धावणारं घड्याळ आणि रेंगाळणारे घरातले यांचा तोल साधायला जरा तरी मदत होईल. अष्टावधानी या शाळेत वाचलेल्या शब्दाचा अर्थ आपण दिवसाच्या पहिल्याच प्रहरात घेत असतो. साफसफाई,स्वयंपाक, आवराआवरी,दिवसभराचे कामांचे...
Ejanseva.com is Free Informative blog portal for all Indians. People can submit articles, content to us. We check & unique useful post publish with your name as author.
Topics - Current Affairs | Social | Politics | Agriculture | Sports | Educations | Festivals | Historical | Online Internet and many more useful
Like, Share, Follow, Subscribe, Contribute & Get Rewarded from Ejanseva Submit Article Now