Voter List Maharashtra 2024: महाराष्ट्र मतदार यादीत नाव शोधा

महाराष्ट्र मतदार यादीतील तुमचे नाव फक्त २ मिनिटात येथे शोधा.

Reshma
By Reshma
20 Min Read
महाराष्ट्र मतदार यादीत नाव शोधा

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

नमस्कार! चला तर मग मित्रांनो आपण “मतदान व निवडणुकीविषयी “काही माहिती जाणून घेऊयात. त्याआधी आजच आपले नाव महाराष्ट्र मतदान यादीत ( Voter List Maharashtra 2024) शोधूयात.

निवडणूक म्हणजे काय, मतदान म्हणजे काय, भारतात पहिली निवडणूक कधी झाली, मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे, आपण आपला लोकप्रतिनिधी कसा निवडून देऊ शकतो इ. सर्व माहिती आज आपण या लेखाद्वारे जाणून घेऊयात.

निवडणूक प्रक्रिया

Election process: निवडणूक ही लोकशाहीची प्रमुख प्रक्रिया आहे. ज्याद्वारे जनता आपला लोकप्रतिनिधी निवडून देते. निवडणुकांद्वारेच अद्ययावत लोकशाहीतील लोक विधिमंडळात विभिन्न पदांवर व्यक्तींची निवड करतात. प्रादेशिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही निवडणुकीद्वारे निवड केली जाते.

लोकसभा निवडणूक २०२४ भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात एप्रिल आणि मे २०२४ दरम्यान पुढील सार्वत्रिक निवडणूक होणे संभाव्य आहे.

१६ जुन २०२४ रोजी १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे.

परंतु लोकसभा निवडणूक कधी होणार आहे. याची उत्सुकता संपूर्ण भारतभर लागलेली आहे १६ एप्रिल पासून देशभरात लोकसभा निवडणुका सुरू होणार आहेत का ? असा जनतेला प्रश्न पडलेला आहे.

लोकसभा निवडणुकीची तारीख कशी ठरते?

How is the date of Lok Sabha election determined? भारताची निवडणूक आयोग ही एक स्थिर संवैधानिक संस्था आहे. निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानानुसार करण्यात आली.

भारतीय संविधानाच्या कलम ३२४ नुसार भारतात लोकसभा विधानसभा राज्यसभा निवडणुकीचे आयोजन भारतीय निवडणूक आयोग करते.

देशात स्वतंत्र आणि निपक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी भारतीय राज्यघटनेने कायमस्वरूपी आणि स्वतंत्र संस्थेची स्थापना केलेली आहे. भारताच्या लोकसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी ही आयोगावर आहे.

राज्यांमधील नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकांसाठी भारतीय राज्यघटने कडून स्वतंत्र राज्य निवड नुक आयोग दिला गेलेला आहे. भारतीय राज्यघटनेने ठरवून दिलेल्या काल मर्यादेतच निवडणुका घेणे ही निवडणूक आयोगाची मुख्य जबाबदारी आहे.

लोकसभा निवडणुकीची तारीख ठरवण्यातही आयोगाची प्रमुख भूमिका असते. प्रत्येक लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो. या पाच वर्षाचा कार्यकाळ संपविण्यापूर्वीच निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.

मतदानाच्या किती दिवस आधी निवडणुकीची घोषणा केल्या जाईल?

मागील चार लोकसभा निवडणुका (2019, 2014, 2009 आणि 2004) बघितल्यास, निवड आयोग ४० ते ५० दिवस आधी देशातील लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करत असते. म्हणजे, तेव्हापासून देशात आचारसंहिता लागू होते.

यंदा 2024 मध्ये निवडणुका कधी होणार?

elections 2024: यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. एप्रिल व मे महिन्यात सात चरणांमध्ये मतदान होण्याची शक्यता भासवलेली आहे.

२०१९ मध्ये ११ एप्रिल पासून निवडणुका पार पाडल्या होत्या. २०१४ मध्ये ७ एप्रिल २००९ मध्ये १६ एप्रिल २००४ मध्ये २० एप्रिल यादरम्यान निवडणुका पार पडल्या होत्या.

भारताच्या इतरत्र राज्यात कोणत्या चरणात मतदान होऊ शकतं हे आपण पाहूयात.

ज्या राज्यांचे क्षेत्रफळ हे मोठे आहे, व ज्या राज्यात जागा जास्त आहेत अशा राज्यात मतदान हे अनेक टप्प्यात होतं. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल यासारख्या राज्यात दोन ते तीन टप्प्यात मतदान होतं.

लहान राज्यात एक किंवा दोन टप्प्यात निवडणुका होतात. लहान राज्यात एक किंवा दोन टप्प्यात निवडणुका होतात. उदा. दिल्ली, अरुणाचलप्रदेश,त्रिपुरा.

मागील निवडणुकीच्या माहितीच्या आधारावर कोणत्या राज्यात कोणत्या टप्प्यात निवडणुका होऊ शकतात ते आपण बघूयात.

पहिले चरण- जम्मू आणि कश्मीर, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिजोरम, नगालँड, ओडिशा, सिक्किम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंडमान, लक्षद्वीप.

दुसरे चरण – आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तमिलनाडु, त्रिपुरा, यूपी, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी.

तिसरे चरण- आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव.

चौथा चरण- बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल.

पाचवे चरण – राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू और कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश.

सहावे चरण- बिहार, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली-एनसीआर.

सातवे चरण- उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, चंडीगढ़, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश.

लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी लागणार ?

When will the results of the Lok Sabha elections be announced? लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर त्याच दिवसांपासून देशात किंवा त्या राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येते.

१९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकी वेळी निवडणूक आयोगाने प्रथम सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना आचारसंहिता वितरित केली होती .

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य अथवा केंद्र सरकार कोणतीही घोषणा करू शकत नाही अथवा नवीन विधेयक सादर केले जाऊ शकत नाही.

राजकीय पक्ष व उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी सरकारी संसाधनांचा वापर करून शकणार नाहीत राजकीय पक्ष मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करू शकणार नाहीत .

आदर्श आचार संहिता नुसार कोणताही पक्ष किंवा उमेदवार परस्पर देश निर्माण करणारी किंवा दोन जाती आणि समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारी कोणती कृती वक्तव्य करू शकणार नाही.

मज्जिद, चर्च, मंदिरे किंवा इतर प्रार्थना स्थळे निवडणूक प्रचारासाठी व्यासपीठ म्हणून वापरता येऊ शकणार नाहीत.

मतदारांना लाच देणं, धमकावन या काळात केल्यास आचारसंहितेचा भंग मानला जाईल.

मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत प्रचार करण्यासही मनाई केल्या जाईल .जर कोणता उमेदवाराने या नियमाचे उल्लंघन केल्यास त्याचा नामांकन रद्द केला जाऊ शकतो, अटक झाल्यास सहजासहजी त्याला जामीन मिळणार नाही.

भारतीय लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया

Electoral Process of Indian Democracy: भारतीय लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेचा वेगवेगळ्या दर्जा आहे. परंतु मुख्यत्वे संविधानात संपूर्ण भारत देशासाठी एक लोकसभा आणि स्वतंत्र राज्यांसाठी स्वतंत्र विधानसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या पंधरा मध्ये कलम ३२४ ते कलम ३२९ पर्यंत निवडणुकांचे स्पष्टीकरण दिले आहे.

कलम ३२४ मध्ये असे सांगितलेले आहे की, निवडणुकीची देखरेख दिशा व नियंत्रण निवडणूक आयोगाकडे असेल. संविधानाने कलम ३२४ मध्ये निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याची जबाबदारी दिलेली आहे. १९८९ पर्यंत निवडणूक आयोग ही एक सदस्य संस्था होती.

परंतु १६ ऑक्टोंबर १९८९ रोजी माननीय राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे आणखी दोन निवडणूक आयुक्तांची निवडणूक करण्यात आली. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळ्या संख्येने प्रतिनिधींची निवड केली जाते.

तसेच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभेत वेगवेगळ्या संख्येने आमदारांची निवड केली जाते. नगरपालिका निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे व्यवस्थापित केल्या जातात.

तर लोकसभा व विधानसभा निवडणुका भारत निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली असतात ज्यामध्ये प्रौढ मतदार ते मतदानाद्वारे खासदार आणि आमदारांची निवड केली जाते. लोकसभा आणि विधानसभा या दोन्हींचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो.

सर्वप्रथम निवडणूक आयोग त्याच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करतो. अधिसूचना जारी झाल्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे तीन भाग असतात. नामांकन, निवडणूक आणि मतमोजणी निवडणुकीची अधिसूचना एक दिवस जारी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात येतो.

त्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी एक दिवस ठेवण्यात आला आहे. यामध्ये अन्य कारणांमुळे उमेदवारी अर्ज ही रद्द होऊ शकतात. त्यानंतर विचार विनिमय करून उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकतो.

१९९३ च्या विधानसभा निवडणुका आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काही विशिष्ट कारणांसाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु साधारणपणे दोन दिवसात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.

कधी कधी एखाद्या भागात फेर मतदानाची परिस्थिती उद्भवली की त्यासाठी स्वतंत्र दिवस निश्चित केला जातो. मतदानासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ साधारणपणे सकाळी ७ ते सायंकाळी ५ अशी आहे.

मतदान प्रक्रिया

Voting Process : मतदान करणे हा भारताच्या प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार व कर्तव्य आहे. मतदान ही एखाद्या समूहास विशिष्ट निवडणुकीसाठी मतप्रदर्शन करण्याची एक प्रक्रिया आहे. याचा वापर चर्चा, वादविवाद किंवा निवडणूक प्रचारांत करण्यात येतो.

भारतात लोकशाही राज्य प्रणाली उच्च पदावरच्या व्यक्तींसाठी निवडणूक घेऊन मतदान करण्यात येते. एखाद्या क्षेत्रातील अशा निवडणुकीसाठी ज्याला मतदान करण्यात येते तो “उमेदवार “असतो.

जो मतपत्रिकेद्वारे किंवा ठरवून दिलेल्या प्रक्रियेद्वारे मतदान करतो तो ‘मतदार’ ( voter) असतो. मतदारांनी केलेल्या मतांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची निवड करण्यात येते.

भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला वयाच्या १८ व्या वर्षी मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मतदान हे काही देशात मतदान केंद्रावर जाऊन करणे अनिवार्य असते.

तसेच काही देशात ते ऐच्छिक तर काही देशात ते अनिवार्य असते. मतदान नेहमी हे गुप्त असते कारण एखाद्या मतदाराने त्याची जाहीर वाच्यता करू नये यासाठी नेहमी गुप्त मतदान केले जाते.

भारतात पहिली निवडणूक कशी झाली होती?

How was the first election in India? भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही पद्धतीने सरकार स्थापन करण्यासाठी १९५१ साली भारतात पहिल्यांदा निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

ती निवडणूक कशी झाली असेल? त्या निवडणुकीसाठी कसा प्रचार केला गेला असेल? याची सविस्तर माहिती आपण पुढे बघुयात.

१९५१ साली आजच्यासारखे सोशल मीडिया, टीव्ही, जाहिरातींचा शोधवाटाही नव्हत्या. त्या काळात एवढे आधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध नव्हतं. ते प्रचार सभा, वृत्तपत्र, मासिक, फलक पत्र आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार होत असे.

पहिल्या निवडणुकीत देशातील ५४ राजकीय पक्ष सहभागी झाले होते. पहिली लोकसभा निवडणूक १९५१ साली झाली होती. देशभरात १८७४ उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. त्या काळात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट नव्हते .

१९५१-१९५२ साली बॅलन्स पेपरचा वापर निवडणुकीत करण्यात आला होता. मतपत्रिका व मतपेटीत टाकण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर वेगवेगळे बॉक्स ठेवण्यात आलेले होते.

कोणत्याही बॉक्समध्ये मत टाकण्याचा स्वातंत्र्य मतदाराला देण्यात आलं होतं. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा बॅलन्स पेपरचा वापर करण्यात यावा, अशी मागणी काही विरोधक मतदारांकडून करण्यात आली होती.

ईव्हीएम मशीन मध्ये घोळ असल्याने विरोधकांकडून वारंवार होणारी टीका व पुन्हा एकदा व्हीव्हीपॅट आणि बॅलन्स पेपर वर मतदान घेण्याची मागणी विरोध करत आहेत.

पहिल्या निवडणुकीबाबत या गोष्टी आहेत खास १९५१-१९५२ साली प्रत्येक मतदान केंद्रांसाठी स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची व्यवस्था करण्यात आली होती.

मतदाराला कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत बॉक्समध्ये टाकण्याचा स्वातंत्र्य होतं. कोणत्याही उमेदवाराला मत देण्याचे स्वातंत्र्य पहिल्या निवडणुकीत देण्यात आलेलं होतं.

महाराष्ट्र मतदार यादीत नाव असं नोंदवा

register the name in the election list maharashtra: निवडणूक ही ग्रामपंचायतीची असो किंवा विधानसभेची, लोकसभेची असो मतदान करायचं म्हटलं तर आपल्याकडे मतदान कार्ड म्हणजेच वोटर आयडी (voter id) असणे हे फार आवश्यक आहे.

आता आपण घरबसल्या अवघ्या पाच मिनिटांमध्ये मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकतो यासाठी आवश्यक प्रक्रिया काय आहे याची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूयात. How to Apply for Maharashtra Voter ID Card Online?

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला www.nvsp.in या वेबसाईटवर जावं लागेल.

तिथे National Voters Service Portal (https://voters.eci.gov.in/)ची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

त्या पेज वर New registration for general electors (Form 6) वर क्लिक करून तुम्ही नाव नोंदणी करू शकता.

चला तर मग आता आपण बघूया मतदान कसं करायचं?

 • मतदान करण्यासाठी किमान मतदाराचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले असावे.
 • मतदार म्हणून तुमची नोंदणी झालेली असावी आणि त्यानंतर तुम्ही मतदान केंद्रात जाऊन मतदान करू शकता.
 • मतदान केंद्रात केल्यावर तुम्हाला लहान लहान गटांमध्ये आत सोडल जाईल.
 • तुमचा नंबर आला की मतदान अधिकारी तुमचे मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक, या कागदपत्रांच्या आधारे तुमची ओळख तपासून बघणार.
 • त्यानंतर दुसरा एक अधिकारी तुमच्या बोटावर शाई लावणार.
 • आणि नंतर मतदारांच्या रजिस्टरमध्ये तुम्हाला सही करावी लागणार.
 • नंतर दुसरे मतदान अधिकारी तुम्हाला स्वाक्षरी केलेली मतदार स्लीप देणार.
 • त्यानंतर तिसरा मतदान अधिकारी तुमची मतदार स्लीप घेऊन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमच्या कंट्रोल युनिट वरील पॅलेट बटन दाबणार.
 • आता तुम्ही मतदान करायला तयार असणार आहात.
 • तुम्हाला प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी मतदान कप्प्याकडे जायला सांगितले जाईल.
 • तिथं तुम्हाला मतदान ईव्हीएम चे बॅलेटिंग युनिट दिसणार यावर तुमचे मत नोंदविले जाणार.

पीडीएफमध्ये मतदार यादीतील नाव कसे पहावे

How to View a Name in an Electoral Roll in PDF:

१. प्रथम, तुम्हाला सीईओ महाराष्ट्राच्या मतदार यादीच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

२. तुमच्या आधी, मुख्यपृष्ठ लोड होईल.

३. तुम्हाला मुख्यपृष्ठावरील PDF मतदार यादीवर https://ceo.maharashtra.gov.in/SearchList/ क्लिक करणे आवश्यक आहे.

४. तुम्हाला आता एक नवीन पृष्ठ दिले जाईल जिथे तुम्ही जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि भाग निवडणे आवश्यक आहे.

५. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड इनपुट करावा लागेल.

६. तुम्ही आता “पीडीएफ उघडा” निवडणे आवश्यक आहे.

७. आता तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर मतदार यादी दिसेल.

८. ती यादी तपासून तुमचे नाव शोधा. (voter search here)

मतदार यादीत नाव कसं शोधाल?

अधिक माहितीसाठी तुम्ही या https://www.nvsp.in/ वेबसाईट ला भेट.

महाराष्ट्राची मतदार यादी कशी तपासायची?

How to Check Voter List Maharashtra 2024? महाराष्ट्र मतदार यादीत नाव शोधा.

 • महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटला भेट द्या.
 • ‘मतदार यादीत नाव शोधा’ वर क्लिक करा.
 • तुम्हाला एक नवीन पृष्ठ दिसेल जेथे तुमचे नाव शोधू शकते.
 • ‘नावानुसार’ वर क्लिक करा.
 • तुमचा जिल्हा आणि विधानसभा निवडा.
 • आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
 • तुम्ही तुमचे ‘व्होटर आयडी’ कार्ड वापरून तुमचे नाव मतदार शोधू शकता.
 •  आता तुम्ही ‘जिल्हा’ निवडा व तुमचा EPIC क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.

महाराष्ट्रातील मतदार ओळखपत्राची स्थिती कशी तपासायची?

How to Check Voter ID Status in Maharashtra?

NVSP वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ऑनलाइन मतदार ओळखपत्राची स्थिती तपासू शकता. त्यानंतर, महाराष्ट्रातील मतदार ओळखपत्राची स्थिती (name in voter list maharashtra) जाणून घेण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:

 • ‘ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस’ निवडा.
 • निवडणूक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला प्राप्त झालेला तुमचा संदर्भ ओळखपत्र प्रविष्ट करा.
 • पुढे, ‘ट्रॅक स्टेटस’ https://www.bankbazaar.com/voter-id/status.html बटण निवडा.
 • याशिवाय, नोंदणी केल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राच्या मतदार यादीतील तुमचे नाव ऑनलाइन तपासू शकता. येथे पायऱ्या आहेत:
 • मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 • ‘मतदार यादीत नाव शोधा’ निवडा.
 • मतदार दोन पर्यायांद्वारे त्यांची नावे शोधू शकतात.
 • ‘नावानुसार’ निवडा.
 • तुमची ‘विधानसभा’ आणि ‘जिल्हा’ निवडा.
 • तुमचे नाव आणि सत्यापन कोड प्रदान करा.
 • शेवटी, ‘शोध’ बटणावर क्लिक करा.

अरे हो ! ईव्हीएम मशीन म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे माहिती नसल्यास तर मग EVM मशीन म्हणजे काय? हे जाणून घेऊयात :

ईव्हीएम मशीन मध्ये मतदारांचे नाव आणि त्यांचे निवडणूक चिन्ह असते. तिथेच एक बटन सुद्धा असते. उमेदवारांची नावे त्या मतदारसंघातील प्रचलित भाषा आणि विद्यांमध्ये लिहिलेले असते. अशिक्षित मतदारांना कळावं यासाठी प्रत्येक उमेदवारापुढे त्यांचे निवडणूक चिन्ह असते.

आताच्या उमेदवाराला मत द्यायचं असेल तर त्याच्या नावासमोरील निळे बटन दाबावे लागते. परंतु बटन काही काळ तसेच दाबून ठेवावे, अजून तुमचे मत नोंदविलेले नसते ज्या वेळेस तुम्हाला एक बीप (मशीनचा आवाज) ऐकू येतो.

आणि कंट्रोल युनिट मधला लाईट बंद होते, तेव्हा तुमचं मत ग्राह्य धरले जाते. मतदान अधिकाऱ्यांनी ईव्हीएम क्लोज बटन दाबले की मशीन पुढे नवीन मतं नोंदविणे थांबवेल.

मतदान यंत्रांशी छेडछाड होऊ नये यासाठी ते जुन्या पद्धतीने म्हणजे वेळाने सील केले जाते त्यानंतर त्यावर निवडणूक आयोगाकडून आलेले एक सुरक्षा पट्टी लावून सिरीयल नंबर लिहिला जातो मतमोजणीच्या वेळेस ते उघडले जाते.

मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतमोजणी सुरू करण्यापूर्वी कर्मचारी व एजंट स्वतः प्रत्येक ईव्हीएम मशीनची तपासणी करून घेतात. ही सर्व प्रक्रिया रिटर्न अधिकाराच्या देखरेखी खाली सुरू असते.

मतदान यंत्राशी काही छेडछाड झालेली नाही याची शाश्वती झाल्यावर रिटनिंग अधिकारी रिझल्ट बटन दाबतो. कंट्रोल युनिटमध्ये दाखवलेल्या प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या सर्व मतांची गोळा बेरीज केली जाते.

संपूर्ण समाधान झाल्यावर ते निकाल पत्रावर स्वाक्षरी घेऊन निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले जाते.त्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निकाल त्यांच्या वेबसाईटवर रियल टाईम प्रसिद्ध करतात.

मतदार यादीत नाव नोंदणी २०२४

Enrollment of Name in Electoral Roll 2024:

 • जर तुमचे नाव मतदार यादीत (voter list) नसेल तर फॉर्म नंबर सहा भरावा.
 • जर मतदान पहिल्यांदा करत असणार तर फॉर्म 6 भरावा आणि मतदार संघ बदलायचा असल्यास फॉर्म 6 भरावा.
 • https://www.nvsp.in/Forms/Forms/form6

मतदार पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे

मतदार पात्रता निकष खालीलप्रमाणे:

 • अर्जदाराचे कायमस्वरूपी महाराष्ट्रात वास्तव्य असणे आवश्यक आहे.
 • उमेदवाराने मतदान केलेल्या जिल्ह्यात रहाणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराला कोणत्याही कारणास्तव मतदान करण्यापासून रोखता येणार नाही.
 • उमेदवार हा मानसिकदृष्ट्या सुदृढ असावा.
 • अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.

फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे:

 • कलर फोटो
 • वयाचा पुरावा उदाहरणार्थ दहावीची मार्कशीट किंवा टीसी
 • तुमचा पत्ता असलेला पुरावा उदा. रेशन कार्ड ,इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन बिल ,लायसन, पासपोर्ट आधार कार्ड, पॅन कार्ड.
 • पासपोर्ट
 • पॅन कार्ड
 • वाहन चालविण्याचा परवाना
 • शिधापत्रिका
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
 • मोबाईल नंबर
 • हायस्कूल प्रमाणपत्र
 • जन्म प्रमाणपत्र

VVPAT मशीन म्हणजे काय?

एका विशिष्ट उमेदवाराला मतदार मतदान करतो. व्हीव्हीपॅट मशीनचा वापर मतदारांनी ज्या उमेदवाराला मत दिला आहे ते मग त्याच उमेदवाराला मिळाले आहे की नाही याची शहनिशा करण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो.

‘Voter Verifiable Paper Audit Trail’ म्हणजे VVPAT. EVM मशीन द्वारे मतदान केल्या जातं मात्र या यंत्रणेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास विविध द्वारे मतमोजणी केली जाऊ शकते .

NOTA (नोटा) म्हणजे काय ?

हे मतदान ईव्हीएम मशीनद्वारे होणार आहे ईव्हीएम मध्ये यावेळी उमेदवाराचा फोटो देखील असणार आहे जर यादीमध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर अशावेळी नोटाचा पर्याय निवडून निवडणूक आयोगाने दिला आहे.

तुमचं मतदान केंद्र कुठे आहे हे कसं ओळखाल?
https://www.nvsp.in/

https://electoralsearch.in/

मतदार यादीमध्ये नाव दुरुस्ती

जर तुम्ही तुमचे निवास बदलले असेल आणि तुम्हाला त्या निवासस्थानाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव नोंदवायचे असल्यास फॉर्म नंबर 6 भरावा. जर तुम्हाला कुणाच्या नावावर तुमची हरकत असल्यास फॉर्म 7 भरावा.

https://www.nvsp.in/Forms/Forms/form8

https://www.nvsp.in/Forms/Forms/form7

मतदान ओळखपत्र हरवलं असेल तर काय कराल?

मतदान ओळखपत्र हरवले असल्यास तर काय करा जर तुमचे मतदान ओळखपत्र हरविले असल्यास २५ रुपये भरून आणि पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची पोज पावती जोडून इलेक्शन रजिस्टर ऑफिस मध्ये नेऊन जमा करावी.

मतदार यादी कशी पाहायची?
https://ceo.maharashtra.gov.in/

उमेदवारांची कुंडली
https://panchayatelection.maharashtra.gov.in/

https://electoralsearch.in/

चला तर मग मित्रांनो यंदाच्या 2024 च्या निवडणुकीत आपण आपल्या सत्सक विवेक बुद्धीने योग्य उमेदवार निवडून देऊ. जर आपण योग्य उमेदवार निवडून दिला तर आपल्या देशामध्ये ज्या सामाजिक आणि आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होईल.उदाहरणार्थ बेरोजगारीची समस्या ही आज युवा वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला बघावयास मिळते.

आपल्या देशामध्ये युवक मतदार हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर त्यांच्या पोटापाण्याची सोय झाल्यास ते इतर वाईट मार्गाला लागणार नाहीत, काम धंदा नसल्यामुळे आज बरीच युवा पिढी व्यसनाच्या अधीन झाली आहे.

चला तर मग यावर्षी आपण मतदानाचा हक्क बजावूया व आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करूया!

हे पण वाचा : Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्र पोलीस भरती संपूर्ण माहिती

धन्यवाद!

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *