Ayodhya Ram Mandir Inauguration 2024: अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मराठी माहिती

22 जानेवारीला होणार ऐतिहासिक सोहळा,देशभरात होणार दिवाळी साजरी, 16-22 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे नियोजन, अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या संपूर्ण वेळापत्रकाविषयी माहिती सविस्तर जाणून घेऊयात.

Reshma
By Reshma
10 Min Read
अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठासोहळा २०२४

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

अयोध्या राम मंदिर उद्घाटनाची ( Ram Mandir Inauguration 2024) तयारी जोरदार सुरु झाली असून, अयोध्या नगरी प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सह अनेक मान्यवर व साधुसंत, सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहेत. या दिवशी पुन्हा एकदा देशभरात दिवाळी साजरी होणार असून दि.२४ जानेवारी २०२४ पासून राम मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

अयोध्येतील राम मंदिरासाठी पाच शतकांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपणार आहे. भगवान श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ram Mandir PranPratishtha 2024) ऐतिहासिक सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ पासून वैदिक विधींना सुरुवात होत आहे.

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा मुहूर्त

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha 2024 Muhurat: वार सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२:२९ ते १२:३० शुभ मुहूर्तावर राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल.

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा वेळापत्रक

Ayodhya Ram Mandir Inauguration 2024 Full Schedule: १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान राम मंदिरा मध्ये वेग वेगळे धार्मिक विधी होणार आहे, या सर्व पूजा विधी व इतर कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

१६ जानेवारी २०२४रामलल्लाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधी सुरू होतील.
१७ जानेवारी २०२४रामलल्लाची मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.
१८ जानेवारी २०२४अभिषेक विधीला सुरूवात होईल. तसेच मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मर्तिक पूजा होतील.
१९ जानेवारी २०२४या दिवशी श्री राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे.
२० जानेवारी २०२४भगवान श्री राम मंदिराचे गर्भगृह वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेले गंगाजल (पाणी) असलेले ८१ कलशांनी पवित्र केले जाणार, नंतर वास्तुशांती विधी होणार आहे.
२१ जानेवारी २०२४यज्ञविधी,विशेष पूजा,हवन,रामलल्लाला १२५ कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येणार.
२२ जानेवारी २०२४या शुभ दिवशी दुपारी १२:२९ ते १२:३० पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ  असेल, मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा होणार आहे.

अयोध्या राम मंदिर इतिहास

Ayodhya Ram Mandir History: हिंदू धर्मातील श्री विष्णूंचे अवतार असलेले भगवान श्री राम यांचे अयोध्या हे जन्मगाव आहे. भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शरयू नदीच्या काठावर वसलेले अयोध्या हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हिंदू धर्मातील राम जन्मभूमीच्या पावन जागेवर बांधलेले हे राम मंदिर आहे.

सन १५२८ ते १५२९ या काळात मुघल सम्राट बाबरने, प्राचीन आणि भव्य राम मंदिर तोडून राम जन्म भूमीवर मशीद बांधली होती. हीच ती बाबरी मशीद, साधारण १५३० ते ६ डिसेंबर १९९२ पर्यंत ही मशीद अस्तित्वात होती. ६ डिसेंबर ला अयोध्येमध्ये जवळपास २ लाख कारसेवक पोहचून बाबरी मशीद पाडली गेली. यामध्ये अनेक कार सेवकांना मृत्यू आला तर काहीना अपंगत्व आले.

या सर्व घडामोडी मध्ये कायदेशीर कारवाई सुरु होऊन अनेक नेते, सहभागी कारसेवक यांवर केसेस दाखल झाल्या. हिंदू समाजाच्या सदस्यांनी ती जागा श्रीरामचंद्र यांचे जन्मस्थान असल्याचा दावा केला. नंतर त्या जागेवरून निर्मोही आखाडा हिंदू धर्म समाज आणि वक्फ बोर्ड मुस्लीम संघटना यांमध्ये  वाद विवाद होऊन कोर्टामध्ये कायदेशीर लढाई चालू झाली.

९ नोव्हेंबर २०१९ रोजी सुप्रिम कोर्टाने २.७७ एकर जमिन भगवान श्री रामाचे जन्मस्थान असल्याची मान्यता दिली. आणि राममंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामजन्मभूमीचे भूमिपूजन करण्यात आले आणि राम मंदिर बांधकामाला सुरुवात झाली.

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामजन्मभूमीचे भूमिपूजन
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामजन्मभूमीचे भूमिपूजन

यामुळेच मागील ५०० वर्षापासून प्रलंबित असेलला रामजन्मभूमी वाद निकाली निघून आता पुन्हा नव्याने अतिभव्य श्रीराम मंदिर अयोध्येमध्ये उभारले जात आहे. आणि त्याचा हा सोहळा ‘ न भूतो न भविष्यती ‘ अशा रीतीने साजरा होताना दिसत आहे.

अयोध्या राम मंदिर संरचना व वैशिष्ट्ये

Ayodhya Ram Temple Structure: अयोध्या राम मंदिरात ज्या राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, ती मूर्ती कर्नाटक मधील अरुण योगीराज या मूर्तीकाराने घडविली आहे. अशी मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी अधिकृत घोषणा केली. अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला विविध पारंपारिक वाद्यांचे कार्यक्रम होणार आहे.

सुमारे ५०० वर्षानंतर भगवान श्री राम यांचे अयोध्या येथे राम मंदिर बनणार आहे. प्रभू श्री राम आणि माता सीता यांची मूर्ती शालिग्राम दगडामध्ये बनविण्यात आली आहे. हा दगड नेपाळ येथून मागविण्यात आला आहे. राम लल्लाची मूर्ती ५ फुट उंच आणि पांढरया संगमरवराची असेल. तसेच मंदिराच्या बांधकामासाठी वापरला जाणारा लाल व पांढरा दगड राजस्थान मधून आणला असून तो दगड हजारो वर्षे टिकतो असे म्हटले जाते.

राम मंदिर हे नागर शैलीतील बनलेले असून देशभरातील अनेक प्राचीन ऐतिहासिक मंदिरांचा अभ्यास करून बांधणार आहे. हे राम मंदिर १००० वर्षांपर्यंत टिकणारे आहे असे सांगितले जाते. राम मंदिराच्या बांधकामासाठी सिमेंट,स्टील यांचा वापर न करता कोणार्क मंदिरासारखी श्री राम मंदिराची रचना असणार आहे.

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच प्रभू रामांच्या मंदिरात दुपारी १२ वाजता भगवान श्री रामांच्या चरणावर सूर्यकिरणे पडेल असे तंत्रज्ञान वापरले आहे. राम मंदिराचे बांधकाम हे एल एंड टी (लार्सन अँड टुब्रो) कंपनी आणि टाटा समूह (TCEL) द्वारे करण्यात आले असून, राम मंदिरासाठी १८०० कोटी पेक्षा अधिक खर्च असणार आहे.

राम मंदिर हे ३६० फुट लांब, २३५ फुट रुंद आणि १६१ फुट उंच आहे. वास्तुविशारद चंद्रकांत भाई सोमपूर यांनी मंदिराची रचना केली आहे. मंदिराचे गर्भगृह अष्टकोनी आकाराचे असून संरचनेचा परीघ गोलाकार आहे. सूर्यकिरण राम लल्लाची मूर्तीवर पडू शकतील याकरिता तीन मजल्यांच्या मंदिरात मध्यभागी गर्भगृह आहे. मंदिरात पाच घुमट व १६१ फुट उंचीचा एक बुरुंज आहे. मंदिरा मध्ये एकूण ३६० खांब आहेत.

राम मंदिरातील घंटा – मंदिरातील घंटा ही २१०० किलो वजनाची असून ती सावित्री ट्रेडर्स (जलेसर,एटा) यांनी बनविली आहे. या घंटेचा आकार ६ फुट उंच आणि ५ फुट रुंद असून घंटा बांधण्यासाठी २१ लाख रु. खर्च येणार असल्याचे सांगितले जाते. तसेच अजून १० इतर लहान घंटा बसविणार आहेत कि, ज्या १०० किग्रॅम, २५० किग्रॅम, ५०० किग्रॅम वजनांच्या आहेत. ह्या सर्व घंटा पितळ आणि अन्य धातूंपासून बनवल्या आहेत.

राम मंदिरातील महाकाय उदबत्ती – सर्वात विशेष म्हणजे अयोध्येतील या भव्यदिव्य सोहळ्यासाठी  १०८ फुटी महाकाय उदबत्ती गुजरात मधून आणण्यात आली. या उदबत्तीचा सुगंध ५० किलोमीटर पर्यंत पसरू शकतो, असा दावा उदबत्ती बनवणाऱ्या निर्मात्याने केला आहे.

अयोध्या राम मंदिर कन्स्ट्रक्शन फोटोज
अयोध्या राम मंदिर कन्स्ट्रक्शन फोटोज

 

अयोध्या राम मंदिराचा प्रसाद कसा बुक करायचा?

खादी ऑरगॅनिक किंवा राम मंदिराच्या https://srjbtkshetra.org अधिकृत वेबसाइटला भेट देवून भगवान श्री रामभक्त मोफत प्रसाद ऑनलाइन बुक करू शकतात. अगदी अलीकडेच ही प्रसाद बुकिंग सेवा बंद करण्यात आली आहे, अशी माहिती खादी ऑरगॅनिक वेबसाईट कडून देण्यात आली आहे.

अयोध्या राम मंदिर मुख्य पुजारी

Ayodhya Ram Temple Pujari: आचार्य सत्येंद्र दास हे प्रभू श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. त्यांचे वय ८३ असून गेल्या ३१ वर्षांपासून ते श्री राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून सेवा करतात. आचार्य दास हे १९९२  मध्ये बाबरी मशीद पाडण्यापूर्वी ९ महिने श्री रामलल्लाची पुजारी म्हणून पूजा करत होते.

श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम दिनी राम मंदिरात होणाऱ्या पूजेसाठी पुजाऱ्याचीही निवड करण्यात आली आहे. पुजार्यांच्या निवडीसाठी औपचारिक अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी ३००० पंडितांनी अर्ज केले होते, यातून २०० पुजारी मुलाखतीसाठी उपस्थित राहिले त्यामधून फक्त ५० पंडितांची निवड केली. यामध्ये मोहित पांडे याचे नाव पुढे येवून त्याची पुजारी म्हणून निवड झाली आहे.

Ayodhya Ram Temple Pujari
Ayodhya Ram Temple Pujari

भगवान श्री रामललाच्या पूजेसाठी नेमलेल्या पुजार्‍यांसाठी काही निकष ठरवण्यात आले होते, त्यात रामनंदीय परंपरेचा अभ्यासक असणे आवश्यक होते. याशिवाय राम मंदिरात पूजा करणार्‍या पंडिताला वेद, शास्त्र आणि संस्कृत इत्यादी विषयातही निपुण असणे आवश्यक होते. हे सर्व निकष मोहित पांडे यांनी पार करून, ते इतर पंडितापेक्षा सरस ठरले. आणि त्यांची नेमणूक राम मंदिरात पुजारी म्हणून झाली. मोहित पांडे हा गाझियाबाद, उत्तर प्रदेशचा आहे.

अयोध्या रामजन्मभूमी मंदिर ट्रस्ट कमिटी

Ayodhya Ramjanmabhoomi Temple Trust Committee Members: ५ फेब्रुवारी २०२० रोजी भारत सरकार मार्फत अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माणासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्यात पुढील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कमिटी मेंबर नावेपदभार
पद्मश्री श्री.के.पारासरणसंस्थापक विश्वस्त सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील
महंत नृत्य गोपाळ दास जी महाराजअध्यक्ष
श्री चंपत रायसरचिटणीस
स्वामी गोविंद देव गिरीजी महाराजखजिनदार
स्वामी वासुदेवानंद सरस्वतीजी महाराजसदस्य
स्वामी विश्वप्रशांततीर्थ जी महाराजसदस्य
युगपुरुष परमानंद गिरीजी महाराजसदस्य
महंत दिनेंद्र दाजी जीसदस्य
श्री विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रसदस्य
डॉ.अनिल मिश्रसदस्य
मि. कामेश्वर चौपालसदस्य
श्री.ज्ञानेश कुमारIAS
श्री अवनीश अवस्थीIAS
श्री नृपेंद्र मिश्राIAS
डी.एम. अयोध्याजिल्हा दंडाधिकारी अयोध्या

प्रभू श्रीराम यांच्या जीवनावरील साहित्य आणि कलाकृती

भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हटले जाते. प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर सर्वप्रथम ऋषी वाल्मिकी यांनी संस्कृत मध्ये रामायण हे महाकाव्य रचले. पुढे १६ व्या शतकात संत तुलसीदास यांनी रामचरितमानस रूपाने नव्याने ग्रंथ रचना केली. विशेषतः उत्तर भारतात रामलीला, भागवत कथा, तुलसी रामायण यांसारखे अनेक पौराणिक संगीत कथा कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जातात.

विविध ग्रंथ, काव्य, चित्रपट, मालिका तसेच धार्मिक मंदिरे, सण आणि उत्सव या मधून आज देखील राम नामाचा महिमा टिकून आहे. लवकरच पुढे 17 एप्रिल २०२४ ला रामनवमी हा सण साजरा होणार आहे.

येथे पाहा : 2024 Marathi Festivals Holidays Calendar: २०२४ मधील सण उत्सव हॉलिडे मराठी कैलेंडर

अनेकदा रामायण महाभारत या ऐतिहासिक घटना मधील संदर्भ, पात्रे यांविषयी प्रश्नचिन्हे उपस्थित केली गेली आहेत. पूर्वी दूरचित्रवाणी वर टेलीकास्ट झालेली रामायण ही मालिका किंवा अलीकडील रामसेतू हा चित्रपट असेल, या मधून प्रभू श्रीराम यांच्या जीवनावरील अनेक घटना प्रमाणा सहित सिद्ध करून झाल्या आहेत. यामुळेच आता नव्याने निर्माण झालेल्या अयोध्ये मधील भव्य राम मंदिर येथे प्रत्यक्ष प्रभू राम यांचे अस्तित्त्व पुन्हा अनुभवता येणार आहे.

समारोप

२२ जाने २०२४ रोजी अयोध्या नगरी मध्ये प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे, संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर हा ऐतिहासिक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याच्या आमंत्रण – निमंत्रण निमित्ताने अनेक जणांचे नाराजीनाट्य देखील आपल्याला पाहायला मिळाले असेल. आपण सर्व जन नक्कीच या सोहळया साठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसलो तरी आपआपल्या परीने घरी आपण हा सोहळा नक्कीच साजरा करू शकतो.

बोला सियावर रामचंद्र की जय || जय श्रीराम ||

धन्यवाद.

महाराष्ट्र मध्ये २० जानेवारी पासून मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र या संदर्भात होत आहे. यामुळे सर्वांचे या दोन्ही इवेन्ट कडे लक्ष लागून आहे.

हे देखील पाहा : Kunbi Maratha Records: कुणबी मराठा नोंदी जिल्हानिहाय यादी (Jan 24)

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
2 Reviews
  • Avatar of RohanRohan says:

    jay Shriram🙏

    Reply
  • Avatar of हनुमानहनुमान says:

    || जय श्रीराम ||

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *