कोणत्याही व्यक्तीला बचत खाते पतसंस्था /सहकारी बँक / राष्ट्रीयीकरण बँक येथे सुरु करता येते.एका व्यक्तीला एक बँकेत एकच सेव्हिंग खाते उघडता येते.शासकीय योजनांचा जेव्हा लाभ घ्यायचा असतो तेव्हा राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक असते.उदा.सबसिडी / घरातील चे अनुदान / विद्यार्थांना मिळणारी शिष्यवृत्ती.

सेव्हिंग खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • बँक खाते उघडण्यासाठी बँकेतील अर्ज.
 • विद्यार्थांनसाठी बोनाफाईड.
 • ओळख व पत्याचा पुरावा उदा.मतदानकार्ड / रेशनकार्ड.
 • दोन रंगीत फोटो.
 • पॅन कार्ड क्रमांक / फॉर्म नं ६० किंवा ६१
 • संबंधित बँकेत बचत खाते सुरु असलेल्या परिचयातील व्यक्तींची सही.
 • दोघांच्या नावावर अथवा दोघांपेकी जास्त व्यक्तीच्या नाव वरील संयुक्त खाते:-

या खात्यावर व्यवहार दोघांपेकी एक / दोघांच्या / दोघांपेक्षा अधिक व्यक्तीच्या सहीने करता येते.

 • सही न करता येणाऱ्या व्यक्तीचे खाते:-

ज्या व्यक्तीला सही करता येत नाही त्या व्यक्तीला खाते सुरु करताना किंवा त्यावरील व्यवहार सुरु करताना बँकेत समक्ष हजर राहून पुरुषाचा डाव्या हाताचा अंगठा व स्रियांचा उजव्या हाताचा अंगठा निशाणी द्वारे व्यवहार करता येतो.

 • अंध व्यक्तीचे खाते:-

सामान्य अटींच्या पुर्तेतेनंतर स्वत: अथवा विश्वासपात्र व्यक्तीसमवेत संयुक्त खाते उघडता येते. अंध व्यक्तीस शाखा व्यवस्थापक बँकेच्या अटी नियम वाचून व समजून देतील त्यानंतर खाते उघडावे.

 • आज्ञानाचे खाते:-

अज्ञान व्यक्तीचे खाते त्याच्या जन्मतारखेचा अधिकृत दाखला सादर करून सुरु करता येईल.अज्ञान व्यक्तीच्या खातेवरील व्यवहाराची जबाबदारी हि त्याचे आई / वडील अथवा पालकांची राहील.व्यवहारासाठी खाते सुरु करते वेळी असलेले पालक यांच्या सहीनेच होतील.जेव्हा अज्ञान व्यक्ती सज्ञान होईल तेव्हा सज्ञान व्यक्ती बँकेच्या योग्य निर्देशांचे पालन करून स्वत: व्यवहार करू शकेल.

—————————————————————————————————————————————-

नवीन करंट / चालू खाते सुरु करणे.

कोणत्याही व्यक्तीला करंट खाते चालू करता येत नाही.व्यवसाय,संस्था,कंपनी,वृत्तपत्र इ.साठी असलेले खाते आहे.करंट खातेवरील जास्तीत जास्त व्यवहार हे चेक द्वारे होतात.करंट खात्यावर होणारया व्यवहाराचा अहवाल बँकेद्वारे प्रती माह प्राप्त करता येतो.म्हणून बरयाच वेळा पास बुकाची आवश्यकता नसते.करंट खाते सुरु करण्यासाठी व किमान शिल्लक हि २ हजार पासून १० हजार रुपये ठेवावी लागते.त्यापेक्षा कमी झाल्यास सदर बँक दंड आकारू शकते.

करंट खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

 • व्यवसाय परवाना / शॉप अधिनियम लायसेन्स कागदपत्रे.
 • शॉप अधिनियम नसल्यास संबंधित व्यवसाय नोंदणीकृत असल्या बाबत पुरावा.
 • व्यवसाय यांचा प्रोप्रायटरनावाने शिक्का ज्यात संबंधित फर्मचे नाव असते.
 • खाते उघडण्यासाठी करंट खाते असलेल्या व्यक्तीची प्रोप्रा.शिक्क्यासह ओळख.
 • व्यवसाय मालकाचे पॅन कार्ड मतदान ओळखपत्र.

—————————————————————————————————————————————————–

     चेक संबंधी माहिती

 • नवीन नियमानुसार कोणत्याही चेकची मुदत हि फक्त तीन महिनेच असते.
 • तीन महिन्यानंतर बँकेत दिलेला चेक पास होत नाही.
 • चेक वर खाडाखोड झाल्यास जेथे खाडाखोड झाली तेथे खातेदाराची सही असावी.
 • चेक हरविल्यास त्याची कल्पना संबंधित बँकेला तातडीने द्यावी.व पेमेंट स्टॅम्प करावे.
 • चेकच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्याला दोन तिरप्या रेषा असतील तो चेक ज्या नावाने दिलेला असतो त्या नावाच्या बँक खातेवरच जमा करता येतो.
 • पोस्ट डेटेड चेकची मुदत लिहलेला दिनाकानंतर लागू पडते.
 • लोन / कर्ज घेते वेळी सर्व बँका चेकच्या माध्यामातून लोन देतात.
 • कर,इन्शुरन्स,जमीन खरेदी,वाहन खरेदीसाठी,मोठ्या प्रमाणित आर्थिक व्यवहार चेक ने करणे हितावह असते.
 • एखाद्या व्यक्तीकडून चेक घेताना किंवा देताना त्याच्या पुढे व पाठीमागे नाव / शिक्का सह स्वाक्षरी असावी.