योजनेचे स्वरुप

(1) महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जन्म  झालेल्या प्रत्येक मुलींच्या नावे जन्मत: रु.21,200/-
मुलीच्या जन्माच्या एक वषाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवुन सदर मुलीस वयाची 18
वर्षे पूर्ण झाल्यानंतर  एकुण रु. 1 लाख इतकी रक्कम प्रदान करण्यात यावी. सदरची 1 लाख इतकी
रक्कम ही प्रचलित व्याजदरानुसार व 18 वर्षे कालावधीसाठी परिगणित करण्यात आली आहे.

(2) आयुर्विमा महामंडळामार्फत  राबविल्या  जाणारया केंद्र शासनाच्या आम आदमी योजनें अंतर्गत सदर
मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून (Corpus Rs.21,200/-) नाममात्र रु.100/- प्रतिवर्ष इतका हप्ता
जमा करुन सदर मुलीच्या कामवित्या पालकाचा विमा उतरवला जाईल. ज्यात पालकाचा मृत्यु / अपघात
अशी परीस्थिती ओढवल्यास खालीलप्रमाणे रक्कम देय होईल.

नैर्सगिक मृत्यु रुपये ३०,०००/-
अपघातामुळे मृत्यू रुपये ७५,०००/
दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव (अपघातामुळे) निकामी होणे रुपये ७५,०००/
एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी होणे रुपये ३७,५०० /-

(3) आम आदमी विमा योजनें अंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनें अंतर्गत सदर मुलीला रुपये 600/-
इतकी शिष्यवृत्ती प्रती 6 महिने, इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि इयत्ता बारावी मध्ये मुलगी शिकत
असताना दिली जाईल.

(4) विहित मुदतीपूवी (वयाची 18 वषे पूर्ण होण्यापूवी) मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाल्यास, या योजनेचा
फायदा तिच्या पालकांना होणार नसून, मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र
शासनाचे नावे असणारया Surplus अकाऊंट किंवा खात्यात जमा म्हणून दर्शविली जाईल.

(5) भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) महाराष्ट्र शासनाच्या नावे एक नवीन पोलिसी काढतील, ज्यामध्ये
प्रत्येक लाभार्थी मुलींसाठी स्वतंत्र खाते असून, Surplus खाते खालील परीस्थितीत कार्यरत करण्यात येईल.
1. जर वैयक्तिक मुलीच्या नावे असलेल्या एकत्रित निधी (Corpus) रु.1 लक्ष पेक्षा अधिक झाल्यास, जादाची रक्कम या खात्यात जमा होईल.
2. मुदतीपूवी विवाह अथवा मृत्यू झाल्यास, त्या तारखेला एकत्रित निधी (Corpus Surplus) खात्यावर जमा होईल.
3. Corpus रु.1 लक्ष पेक्षा कमी असल्यास, उर्वरित रक्कम Surplus खात्यातून जमा केली जाईल.

योजनेसाठी सर्वसाधारण अटी व शती

(1) सदर योजना सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मनारया  प्रत्येक मुलींसाठी कुटुंबातील फक्त दोन अपत्यापर्यंत लागू असेल.
(2) सदर मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
(3) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील.
(4) योजनेचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होणे आवश्यक राहील. तसेच तिने इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण होणे व 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत  अविवाहित असणे आवश्यक राहील.
(5) दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या, तर त्या दोन्ही मुली योजनेस पात्र असतील.
(6) एखाद्या परीवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय 0 ते 6 वर्षे (6 किंवा 6 वर्षापेक्षा कमी) इतके असावे.
(7) बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहील.
(8) उपरोक्तपणे मुददा क्र. 5 व 6 च्या तरतुदीन्वये एकाच मुलीला दोन लाभ मिळणार नाहीत याची दक्षता घेण्यात येईल.
(9) लाभार्थी कुटुंबात दोन अपत्यांच्या जन्मा नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.

 

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड पेज वर किंवा येथे क्लिक करा