एलआय सी न्यू जीवन आनंद

Reshma
By Reshma
3 Min Read
एलआय सी न्यू जीवन आनंद

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

परिपक्वतेचा लाभ घेतल्यानंतरही आयुष्यभर जोखिम संरक्षण

एलआयसी ची ‘न्यू जीवन आनंद’ योजना दि. ८ जानेवारी २०१४ पासून सुरु झाली आहे. या योजनेत हयातीत व हयातीनंतरचा विमा असे दुहेरी संरक्षण विमेदाराला मिळते.

परिपक्वता लाभ(Maturity Benefit)

पोलिसीच्या मुदती अखेर विमेधारकास मूळ विमा रक्कम, जमा असलेला बोनस आणी अंतिम ( अतिरिक्त) बोनस (देय असल्यास) दिला जाईल.

मृत्यूलाभ (Death Benefit)

 • पोलिसीच्या मुदती दरम्यान विमेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला ‘हमी विमा रक्कम’, मृत्यूच्या वर्षापर्यंत जमा झालेला बोनस तसेच देय असल्यास अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल.
 • यामध्ये ‘हमी विमा रक्कम’ म्हणजे मूळ विमा रकमेच्या १२५% किंवा वार्षिक हप्त्याच्या दहापट यापैकी जास्त असलेली रक्कम.
 • वरील मृत्यूलाभाची एकूण रक्कम भरलेल्या सर्व हप्त्याच्या ( टक्स व ज्यादा हप्ते वगळून) एकूण रकमेच्या १०५% पेक्षा कमी असणार नाही.
 • पोलिसीची मुदत संपल्यानंतर विमेदाराचा मृत्यू झाल्यास वारसाला मूळ विमा रक्कम देण्यात येईल.

Lek Ladki Yojana Maharashtra: लेक लाडकी योजना – आता आपल्या लाडक्या लेकी होणार लक्षाधीश

पात्रता अटी

 • सुरुवातीचे किमान वय : १८ वर्षे पूर्ण
 • सुरवातीचे कमाल वय : ५० वर्ष जवळच्या जन्मतारखेस
 • मुदतीअखेर कमाल वय : ७५ वर्ष जवळच्या जन्मतारखेस
 • किमान पोलिसी मुदत : १५ वर्ष
 • कमाल पोलिसी मुदत : ३५ वर्ष
 • किमान मूळ विमा रक्कम : अमर्यादित (रु ५०००/- च्या पटीत)

हप्ता भरण्याचे पर्याय(Mode of premium payment)

वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही, दरमहा (पगारातून किंवा इसीएस द्वारा)

हप्त्यात मिळणारी सवलत (Rebates)

हप्त्या प्रकारावर सूट (Mode Rebates)

 • वार्षिक – तक्त्यातील हप्त्यावर २%
 • अर्धवार्षिक – तक्त्यातील हप्त्यावर १%

ब) मोठ्या विमा रकमेवर मिळणारी सूट (High SA Rebates)

मूळ विमा रक्कम ( रु.)                      दर हजारी विमा रकमेवर सूट (रु.)

१,००,००० ते १,९५,०००                              नाही

२,००,००० ते ४,९५,०००                              १.५०

५,००,००० ते ९.९५.०००                              २.५०

१०,००,००० व त्यापुढे                                ३.००

अपघाती फायदा

दर हजारी रु. १ ज्यादा हप्ता भरून अपघाती फायदा घेण्याचा पर्याय उपलब्ध.

पुनरुज्जीवन (Revivals)

बंद पडलेली पोलिसी , मुदतीदरम्यान थकलेले हप्ते व्याजासहित भरून परत सुरु करता येईल. परंतु पोलिसी बंद झाल्याच्या तारखेपासून २ वर्षाच्या आत सुरु करणे आवश्यक आहे.

कर्ज (Loan)

तीन वर्षाचे हप्ते भरल्यानंतर नियमानुसार कर्ज मिळण्याची सुविधा

आयकरात सवलत (Income Tax Benefit)

आयकर कायद्याच्या तरतुदीनुसार सेक्शन ८०(C) व सेक्शन १० (१०) (D) नुसार आयकरात सवलत मिळेल.

एल आय सी  पोलिसी बद्दल अधिक माहिती साठी एल आय सी च्या  खालील अधिकृत पेज वर माहिती पहा

https://licindia.in/

 

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.