Pradhan Mantri Pik Vima Scheme: आता १ रुपयात भरा पीक विमा अर्ज- कसा करायचा अर्ज जाणून घ्या संपूर्ण माहिती

तुम्ही पीक विमा अर्ज भरला का? अवकाळी ग्रस्तांसाठी शासनाची मदत जाहीर.

Reshma
By Reshma
10 Min Read
प्रधानमंत्री पीक विमा योजना

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

आता १ रुपयात भरा पीक विमा अर्ज. कसा करायचा अर्ज येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती.
शेतकऱ्यांकरता देशात कायमच नवनविन योजना राबवल्या जातात आणि यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना. याअंतर्गत पाऊस, दुष्काळ किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाल्यास त्यांना आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळेच या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढण्याचे आवाहन सरकार करत आहे.

महाराष्ट्रात २०१६ च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ पुढच्या ३ वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.

पीक विमा अर्ज नवीन बदल

याआधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या २%, रबी हंगामासाठी १.५% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या ५ % एवढा हप्ता भरावा लागायचा.

ही रक्कम, ७००, १०००,२००० पर्यंत प्रतिहेक्टरी जायची. आता शेतकरी १ रुपया भरुन योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. शेतकरी हप्त्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे.

कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. याशिवाय भाडेतत्त्वार शेती करणारे शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

खरिप हंगामातील भात (धान), खरिप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भूईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरिप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.

तर रबी हंगामातील गहू, रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग, रबी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे उद्देश

  • शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेतीमध्ये रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सरुवात करण्यात आली आहे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महत्त्वाची सूचना – तुम्ही स्वत: पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा CSC (नागरी सुविधा केंद्र )   सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्ही सीएससी केंद्र चालकाला १ रुपयाशिवाय अधिक पैसे देण्याची गरज नाही.

कारण पीक विमा योजनेच्या प्रत्येक अर्जासाठी विमा कंपनी सीएससी केंद्र चालकाला ४० रुपये देणार असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे. तसेच तुमच्या शेतमालाचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास तुम्हाला ७२ तासांच्या आत ती माहिती विमा कंपनी द्यायची आहे.

त्यानंतर विमा कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर पीक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र आहात का हे ठरवलं जाईल.

पीक विमा ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्द्त

पीक विमा योजनेत तुम्ही स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी सगळ्यात आधी pmfby.gov.in हि वेबसाईट सर्च करायची आहे. त्यानंतर ती प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट ओपन करायची आहे. आता Farmer Application या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर Guest Farmer या पर्यायावर क्लिक करायचं आहे.आता आपल्याला नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करायची आहे.त्यासाठी इथं सुरुवातीला शेतकऱ्याची माहिती टाकायची आहे. यात शेतकऱ्याचं पूर्ण नाव, रिलेशनशिपमध्ये अर्जदार कुणाचा मुलगा, मुलगी, पत्नी आहे ते निवडायचं आहे. मग पती किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे.

मोबाईल नंबर टाकून verify वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक captcha कोड दाखवला जाईल. तो टाकून Get OTP क्लिक करायचं आहे.

मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून Submit वर क्लिक करायचं आहे.

 

शेतकऱ्याची संपूर्ण माहिती
शेतकऱ्याची संपूर्ण माहिती वरील प्रमाणे अर्ज भरा.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

त्यांनतर पुढे आपल्याला व्हेरिफिरेशन SUCCESS झाले आहे असे दिसेल. नंतर वय, जात किंवा प्रवर्ग, लिंग निवडायचं आहे.

पुढे FARMER TYPE मध्ये शेतकऱ्याचा प्रकार अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आहे का ते निवडायचं आहे. मग FARMER CATEGARY मध्ये अर्जदार जमिनीचा मालक आहे की भाडेपट्टा करार आहे, ते निवडायचं आहे.

नंतर पुढे आपल्याला  पत्त्याविषयीची माहिती भरायची आहे. त्यामध्ये आत तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडायचं आहे. पुढे सविस्तर संपूर्ण  पत्ता टाकून, पिन कोड टाकायचा आहे.

 

शेतकऱ्याचा संपूर्ण रहिवाशी पत्ता
शेतकऱ्याचा संपूर्ण रहिवाशी पत्ता अर्ज वरील प्रमाणे भरा.

त्यानंतर  Farmer ID मध्ये UID निवडायचं आहे. पुढे आधार नंबर अचूकपणे टाकायचा आहे आणि Verify वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर स्क्रीनवर व्हेरिफिकेशन SUCCESS झाल्याचा मेसेज दिसेल.

पुढे बँक खात्याचा तपशील भरायचा आहे. बँकेचा IFSC कोड माहिती असेल तर yes आणि नसेल तर no या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

मग राज्य, जिल्हा, बँकेचं नाव, शाखा निवडायची आहे. शाखा निवडली की त्यासमोर IFSC कोड आपोआप आलेला दिसेल.

पुढे बँक खात्याचा नंबर टाकायचा आहे. तो पुन्हा एकदा टाकून कन्फम करायचा आहे.

खाली दिलेला captcha कोड टाकून Create User पर्यायावर क्लिक करायचं आहे.

यानंतर तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला दाखवली जाईल, ती व्यवस्थित वाचून Next वर क्लिक करायचं आहे.

पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्यांचा तपशील दिलेला दिसेल. त्यापैकी एक खाते तुम्हाला निवडायचे आहे आणि Next वरती क्लिक करायचं आहे.

आता पीक विमा योजना आणि क्षेत्रासंबंधीची माहिती भरायची आहे.

इथं राज्य महाराष्ट्र आहे, समोर योजनेचं नाव प्रधानमंत्री फसल बिमा योजना निवडायचं आहे, त्यानंतर तिथं खरिप सिझन आणि वर्ष २०२३ आपोआप येईल.

 

शेतकऱ्याची माहिती
शेतकऱ्याची माहिती वरील प्रमाणे भरा.

Land Details यामध्ये शेतीची व पिकांची माहिती द्यायची आहे. वर्तुळावर क्लिक करून तुम्ही खालील माहिती भरू शकता.

जर तुम्ही मूग, सोयाबीन, कापूस असं एकापेक्षा जास्त पिकांसाठी विमा भरणार असाल तर MIX CROPPING ला YES करायचं आहे. पण, एकाच पिकाचा विमा भरणार असाल तर NO करुन एक पीक निवडायचं आहे.

पुढे पेरणीची दिनांक निवडायची आहे. नंतर खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाकायचा आहे. पुढच्या Verify पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग स्क्रीनवर तुमच्या नावावर किती क्षेत्र आहे, याची माहिती दाखवली जाईल.

इथल्या वर्तुळावर क्लिक करुन तुमचं क्षेत्र आधीच INSURED आहे की नाही ते बघायचं आहे. मग SUBMIT वर क्लिक करायचं आहे.

इथं तुम्ही INSURED AREA मध्ये तुम्हाला जेवढ्या क्षेत्राचा विमा उतरावयाचा आहे, तेवढे लिहू शकता. त्यानुसार विम्याची रक्कम कमी-जास्त होते.

पुढे त्या क्षेत्रासाठी तुम्हाला किती हप्ता भरावा लागेल, ते FARMER SHARES मध्ये दाखवलं जाईल. आता इथं कितीही रक्कम दिसत असली तरी शेवटी पेमेंट करताना तुम्हाला १ रुपयाच भरावा लागणार आहे. इथल्या NEXT पर्यायावर क्लिक करायचं आहे.

 

शेतकरी कागदपत्रे
शेतकरी कागदपत्रे वरीलप्रमाणे अपलोड करा.

आता पुढे तुम्हाला बाकीची कागदपत्रं अपलोड करायची आहेत.

सुरुवातीला बँक पासबुक फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर नुकताच काढलेला डिजिटल सहीचा सातबारा उतारा आणि ८-अ उतारा, एकाच पीडीएफ फाईलमध्ये घेऊन अपलोड करायचा आहे.

शेवटी पीकपेऱ्याचं घोषणापत्र अपलोड करायचं आहे. हे घोषणापत्र साधारण खालील दिलेल्या नमुना फोटो प्रमाणे असावे.  अशा आशयाचं पत्र साध्या कागदावर लिहून ते अपलोड करायचं आहे.

 

स्वयंघोषणापत्र
स्वयंघोषणापत्र वरील नमुन्याप्रमाणे असावे.

हे ही वाचा – आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती

तिन्ही फोटो अपलोड करुन झाले की तिन्हीसमोरच्या upload पर्यायावर क्लिक करायचं आहे, मग तिथं तिन्ही फोटो अपलोड करण्यात आले, असं SUCCESS म्हणून दाखवलं जातं.

Next वर क्लिक केलं की, शेतकऱ्याची , बँक खात्याची आणि पिकाची माहिती दाखवली जाईल. किती प्रीमियम भरायचा ते दाखवलं जाईल, इथं SUBMIT वर क्लिक करायचं आहे.

शेतकरी बँक माहिती
शेतकरी बँक माहिती

यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जाईल. यात तुमचा अर्ज क्रमांक, विम्याची रक्कम याची माहिती नमूद केलेली असेल.

आता पेमेंट करायचं आहे. इथं तुम्हाला १ रुपयाचं पेमेंट करायचं आहे. हे पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, QR कोड वापरुन करू शकता. पेमेंट झालं की शेतकरी अर्जाची पावती तुम्हाला तिथं येईल.

इथं खाली असलेल्या Print Policy Receipt पर्यायावर क्लिक करून पीक विमा योजनेत सहभागाची पावती तुम्हाला डाऊनलोड करता येईल. अशाप्रकारे तुम्ही देखील फक्त १ रुपयात स्वत:हून पीक विमा योजनेसाठी अर्ज करू शकता किंवा नजीकच्या सीएससी केंद्रावर (नागरी सुविधा केंद्र ) जाऊन अर्ज करू शकता.

पीक विमा लाभ मिळविण्याबाबत महत्वाची सूचना

जर तुमचे पीक कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झाले असेल, तर तुम्हाला किसान पीक विमा  ॲपद्वारे ७२ तासांच्या आत त्याची माहिती द्यावी लागेल.  विमा कंपन्यांच्या फोन नंबरवर कॉल करूनही तुम्ही तुमच्या वाया गेलेल्या पिकाची माहिती देऊ शकता. हे केल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाते आणि त्यानंतर प्रक्रिया सुरू होते.
हे हि वाचा – महाराष्ट्र शासन विविध उपयुक्त संकेतस्थळ यादी

नमस्कार, सदर माहिती हि काही पुस्तके, वृत्तपत्रे, वेबसाईट तसेच सोशिअल मिडिया माध्यमाद्वारे प्रकाशित केलेली , वाचनात आलेली आहे. अधिक माहिती साठी तुम्ही गावातील सीएससी केंद्राला (नागरी सुविधा केंद्र ) भेटून अधिक माहिती घेवू शकता. यामागील मुख्य हेतू हा आहे कि सर्व शेतकरी वर्गापर्यंत माहिती पोहचावी आणि याचा लाभ माझ्या शेतकरी बंधू भगिनींना मिळावा.धन्यवाद.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *