Mahatma Phule Information in Marathi: महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या त्यांचे सामाजिक कार्य व संपुर्ण माहिती

थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे जीवन आणि सामाजिक कार्य विचार सोशल मीडियावर शेअर करा.

Ajit
By Ajit
5 Min Read
Mahatma Jyotiba Phule complete Information in Marathi

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

Mahatma Jyotiba Phule complete Information in Marathi

दिनांक २८ नोव्हेंबर महात्मा जोतीराव फुले यांची पुण्यतिथी. यानिमित्ताने आपण त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवास, विचार आणि कार्य याविषयी अधिक जाणून घेवूयात. ज्योतीबा फुले यांचा जन्म दिनांक ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे पुर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. पुढे त्यांनी समाजासाठी खूप मोठे कार्य केले त्यामुळे त्यांना महात्मा हि उपाधी दिली गेली. त्यानंतर सर्वजण त्यांस महात्मा ज्योतिबा फुले असे संबोधू लागले.

पुणे या ठिकाणी जन्माला आलेले जोतीबा फुले यांचे कुटुंब हे पेशवे यांचे साठी फुले विक्री चे काम करत असे. त्याकाळी सामाजिक असमानता आणि इतर अनेक अप्र्कारची बंधने स्रीयांवर घातली गेली होती. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवेले जायचे. त्याकाळी बालविवाह,सतीची प्रथा यासारख्या अनिष्ट चालीरीती परंपरा यामुळे स्रियांना समाजात दुय्यम वागणूक मिळायची. या विरोधात महात्मा ज्योतिबा फुले यांनी आवज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले.

Mahatma Jyotiba Phule
Mahatma Jyotiba Phule

Mahatma Jyotiba Phule Biography

संपुर्ण नावज्योतिराव गोविंदराव फुले
जन्म११ एप्रिल १८२७
जन्म ठिकाण पुणे महाराष्ट भारत
मृत्यू28 नोव्हेंबर 1890 (वय 63)
शिक्षणस्कॉटिश मिशन हायस्कूल, पुणे
लेखनब्राम्हणांचे कसब (१८६९) शेतकऱ्यांचा आसूड (१८८३) गुलामगिरी (१८७३)
पत्नीसावित्रीबाई फुले
मुले1
आई-वडीलगोविंदराव फुले (वडील) चिमणाबाई फुले (आई)
उल्लेखनीय कार्य विभागनैतिकता , मानवतावाद , शिक्षण , सामाजिक सुधारणा

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे प्रेरणादायी विचार

सामाजिक विषमता, अशिक्षितपणा जुलमी राजवट इत्यादी अनेक प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना देखील त्यावेळी त्यांनी दूरदृष्टीने खूप प्रगल्भ असे विचार समाजासमोर मांडले. त्यापैकी आपण १० विचार खाली पाहुया.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे अजरामर झालेले विचार आणि कार्य याची माहिती समजन्यासाठी पुढील पिढीला अभ्यासक्रमात देखील समावेश करण्यात आले आहेत.

१)

विद्वेविना मती गेली, मती विना निती गेली,

नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले,

वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्वेने केले.

– महात्मा ज्योतिबा फुले

२) मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा, ज्योती म्हणे.

३) समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

४) नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

५) प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते.

६) केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे.

७) ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात.

८) भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसच आहे.

९) जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.

१०) जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे.

हे हि वाचा – Kunbi Maratha Records: कुणबी मराठा नोंदी जिल्हानिहाय यादी

महात्मा जोतिबा फुले यांचे सामाजिक कार्य

महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना इसवी सन २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली. बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे आणि त्यातून समाजातील विषमता दूर करणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा जोतीबा फुले हेच याचे संस्थापक, अध्यक्ष आणि खजिनदार होते. या द्वारे त्यांनी जातीभेद आणि चातुर्वर्णीय विरोध मोडून काढण्यास सुरुवात केली.

फुले दांपत्याचे पुतळे, औरंगाबाद
फुले दांपत्याचे पुतळे, औरंगाबाद

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यामध्ये त्यांची पत्नी सावित्रीबाई यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी स्त्री विभागाचे प्रातिनिधित्व केले. त्यांनी इतर १९ स्त्रियांना बरोबर घेवून हे कार्य पुढे चालू ठेवून त्यात मोलाची भर टाकली. महात्मा जोतीबा फुले यांनी प्रथम आपल्या पत्नीस शिक्षण देवून त्यांस इतर महिलांना मुलीना शिक्षण देण्यासाठी फुलेवाडा येथे कन्याशाळा काढून दिली. जोतीबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे कार्य दीनबंधू यांनी लेखन प्रकाशन करून महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली.

हे सुद्धा वाचा : Savitribai Jyotirao Phule Jayanti Punyatithi: सावित्रीबाई फुले जयंती व पुण्यतिथी स्टेट्स शुभेच्छा संपूर्ण मराठी माहिती

महात्मा फुले वाडा
महात्मा फुले वाडा

महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन प्रवास आणि सामाजिक योगदान महान होते. त्यांच्या पुण्यतिथी दिनी आपणा सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन व आदरांजली. पुणे येथील पूर्वीचा भिडे वाडा नुकताच पुणे महानगरपालिकेने ताब्यात घेवून जमीनदोस्त केला आहे. त्यामुळे आता येथून पुढे आपणास फुले वाडा फक्त जुन्या फोटोमध्ये पाहायला मिळेल. आपणास हि माहिती नक्कीच आवडली असणार आणि आपण हि माहिती सगळीकडे शेअर देखील कराल.

हे सुद्धा वाचा : Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिवस – परिनिर्वाण म्हणजे काय आणि डॉ. आंबेडकरांच्या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिवस का साजरा केला जातो?

धन्यवाद.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Ajit
By Ajit
Follow:
जय शिवराय. वेब डिझायनर आणि ब्लॉग कंटेंट क्रीयटर, सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग मधील अनुभव. समाज माध्यमांतील विविध विषयांवर उपयुक्त प्रगल्भ लिखाण काम करणे.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *