Rajmata Jijabai Information In Marathi: राजमाता जिजाबाई जयंती पुण्यतिथी शुभेच्छा स्टेट्स मराठी माहिती

राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास जयंती पुण्यतिथी, इतिहासातील योगदान इथपासून ते महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज घडविणे या व इतर अनेक ऐतिहासिक घटनांची इत्यंभूत मराठी माहिती येथे पाहा.

Reshma
By Reshma
9 Min Read
राजमाता जिजाऊ जयंती स्टेटस शुभेच्छा मराठी माहिती

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

राजमाता जिजाबाई जयंती (rajmata jijabai jayanti) हा केवळ स्मरणाचा दिवस नसून शौर्य, त्याग आणि राष्ट्र उभारणीच्या तत्त्वांना समर्पित उत्सव आहे. १२ जाने हा दिवस भारताचा इतिहास आणि सांस्कृतिक जडणघडण घडवण्यात राजमाता जिजाऊ यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची एक मार्मिक आठवण आहे. आणि त्याच आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण राजमाता जिजाऊ (Rajmata Jijabai Information In Marathi) यांच्याबद्दल सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

राजमाता जिजाबाई (जिजाऊ) जयंती

Rajmata Jijabai (Jijau) Jayanti: राजमाता जिजाबाई शहाजी भोसले असे जिजाऊंचे संपूर्ण नाव होय. जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म १२ जानेवारी इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे भुईकोट राजवाड्यामध्ये झाला. म्हणूनच १२ जानेवारी ह्या त्यांच्या जन्मदिवसी राजमाता जिजाबाई जयंती साजरी केली जाते.

आपल्या कृती आणि शिकवणींद्वारे, आजही जिजामाता खूप व्यक्तींना प्रेरणा देतात. या त्यांच्या जयंती दिवशी, जिजाऊंना स्मरण करण्यासाठी विविध कार्यक्रम, वेगवेगळी शिबिरे, गरीब गरजू लोकांना विविध वस्तूंचे वाटप, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे जिजाऊंचे योगदान पुढील पिढ्यांसाठी स्मरणात राहील आणि असे सोहळे पुढेही साजरे केले जातील.

राजमाता जिजाबाईं बद्दल माहिती:

Information about Rajmata Jijabai: राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. त्यांना स्वराज्यजननी, राजमाता, वीरमाता, आऊसाहेब, मासाहेब, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

जिजाऊ ह्या स्वराज्यवादी विचारधारणेच्या महान स्री होत्या. गुलामगिरीची त्यांना खूप चीड होती, हिंदुवर मुघलांकडून होणारे अत्याचार थांबवण्यासाठी, तसेच हिंदवी साम्राज्य स्थापन करण्यासाठी त्यांना नेहमी वाटायचे कि, त्यांच्या पोटी असा पुत्र जन्मावा कि ज्याच्या नावाचा झेंडा त्रिलोकात पसरावा. त्यानंतर जिजाऊंनी १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी शिवनेरी गडावर सूर्यास्ताच्या वेळी छत्रपती शिवराय म्हणजेच साक्षात महादेवाचा अवतार छत्रपती शिवाजी राजेंना जन्म दिला.

जिजाऊ यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी होते. जिजामाता ह्या एक योद्धा होत्या म्हणूनच त्यांनी प्रत्येक संकटाला शूरपणे लढा दिला. वेळ प्रसंगी त्या रणांगणात उतरण्यासाठी तयार असायच्या. त्यांची स्वत:ची अशी विचारसरणी होती. जिजाऊंचे देश व धर्मावर अत्यंत प्रेम होते. त्यांनी हेच धडे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना दिले.

मराठी साम्राज्य स्थापन करण्यामागे जिजाऊंचा मोठा हातभार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभारातील प्रत्येक गोष्ट जिजाऊंच्या मार्गदर्शनाने केली. स्वराज्य मिळवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी त्याचा छावा म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून पूर्ण करुन घेतले. आणि म्हणूनच त्यांना स्वराज्यजननी असे संबोधले जाते.

जिजाऊचा शहाजीराजे सोबतचा जीवनप्रवास

Jijabai’s life with Shahajiraje in Marathi: जिजाबाई आणि शाहजीराजे यांचा विवाह बालवयातच झाला होता. लग्नानंतर शहाजीराजे मोठे झाल्यावर विजापूर दरबारात मुत्सद्दी सेनानी होते. विजापूरला शहाजीराजे यांनी अनेक युद्धे जिंकली त्यामुळे विजापूरच्या सुलतानाने त्यांना अनेक जहागिरी चे बक्षीस दिले. जहागीर असलेल्या शिवनेरी किल्ल्याचाही भेटवस्तूंमध्ये समावेश आहे. जिजाबाई इथे मुलांसह राहत होत्या. जिजाबाईंना एकूण आठ मुले होती, सहा मुली आणि दोन मुले. छत्रपती शिवाजी महाराज हे त्या पुत्रांपैकी एक होते.

प्रख्यात मराठा सेनापती शहाजीराजे भोसले यांच्याशी झालेल्या त्यांच्या विवाहाने शौर्य, रणनीती आणि दृढनिश्चयाने गुंफलेल्या जीवनाची घडी बसवली. तथापि, शिवाजी महाराजांच्या आईच्या भूमिकेमुळे जिजाऊंचे नाव इतिहासात कोरले गेले.

हे देखील वाचा : Savitribai Jyotirao Phule Jayanti Punyatithi: सावित्रीबाई फुले जयंती व पुण्यतिथी स्टेट्स शुभेच्छा संपूर्ण मराठी माहिती

राजमाता जिजाबाईंचा शिवाजी महाराजांवरील प्रभाव व संस्कार

Rajmata Jijabai’s influence and culture on Shivaji Maharaj: शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व आणि महत्त्वाकांक्षा घडवण्यात जिजामातांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. स्वराज्य स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवबांना आवश्यक शिक्षण आणि प्रशिक्षण मिळावे याची जबाबदारी जिजामातांनी स्वतःवर घेतली. आणि महाराजांना मराठा साम्राज्याची स्थापना करण्यास प्रोत्साहित केले.

भावनिक आणि नैतिक समर्थनाव्यतिरिक्त, जिजामातांनी शिवाजी महाराजांना विशेषतः आव्हानात्मक काळात धोरणात्मक मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांच्या अनेक लष्करी मोहिमांमध्ये जिजामाता यांचा सल्ला आणि त्यांची हुशारी महत्त्वपूर्ण होती.

शिवाजी महाराजांच्या जीवनावर आणि कारकिर्दीवर जिजामाता यांचा प्रभाव खोलवर होता. महाराजांना भारतातील सर्वात प्रसिद्ध योद्धा आणि रणनीतीकार बनवण्यात त्यांचा अटळ पाठिंबा, मार्गदर्शन आणि शिकवणींनी महत्त्वाची भूमिका होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे संगोपण जिजाबाई यांनीच केले. त्यामुळे शिवाजी महाराजांमध्ये जे काही गुण, कौशल्य आहे ते सगळे जिजाबाईंच्या शिक्षणामुळे आणि संस्कारामुळेच. जिजाबाईंनी महाराजांना राजनीती शिकवली त्यांना लहानपणापासून महाभारत, रामायण यांच्या कथा सांगून त्यांच्यामध्ये ध्येय, धाडस, देशप्रेम, धर्मप्रेम निर्माण केलं.

जिजामाता यांचे स्थान खूप उच्च आहे. जिजाबाई या केवळ शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या तर त्यांच्या जीवनावर आणि कारकिर्दीवर त्या वीरमातेचा महत्त्वपूर्ण प्रभाव होता. त्यांच्या शिकवणी, मूल्ये आणि मार्गदर्शनाने मराठा साम्राज्याचा पाया आणि शिवाजी महाराजांचा वारसा घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

राजमाता जिजाबाई (जिजाऊ) पुण्यतिथी

Rajmata jijabai (jijau) punyatithi: राजमाता जिजाबाईं यांचे  १७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते. १७ जून या दिवशी राजमाता जिजाबाई (जिजाऊ) यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

शहाजी राजांच्या निधनानंतर जिजाऊ सती होण्यासाठी निघाल्या होत्या, तेव्हाच छत्रपती शिवाजीं महाराजांनी त्यांना अडविले आणि म्हणाले की, आऊसाहेब आपण जर सती झाल्या तर धर्माचे पालन तर होईल परंतु राजधर्माचा अस्त होईल म्हणून आपण असं करू नका. आपल्याला राज्यधर्मासाठी जगायचे आहे आणि आम्हाला अजून मार्गदर्शन करायचे आहे. त्यांचे असं म्हणणे ऐकून आऊसाहेबांनी सती न होण्याचा निर्णय घेतला, आणि जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे मार्गदर्शन करत राहिल्या.

दरवर्षी, राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीच्या पवित्र प्रसंगी, महाराष्ट्र आणि भारतभरातील जनता राजमाता जिजाऊ यांना आदरांजली वाहण्यासाठी एकत्र येतात. हा दिवस मराठा साम्राज्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची एक मार्मिक आठवण करून देतो. या दिवसाचे स्मरण करताना, आपण जिजामातेच्या जीवनातून प्रेरणा घेऊया आणि त्यांच्या साहस, दृढनिश्चय आणि राष्ट्र उभारणीच्या मूल्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करूयात.

हे सुद्धा वाचा : Margashirsha 2023: मार्गशीर्ष महिना महत्व गुरुवार व्रतकथा मराठी माहिती

राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील साहित्य

राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, ती पुढीलप्रमाणे –

साहित्य ( पुस्तके - लेख - काव्य - ग्रंथ - चित्रपट )लेखक / कवी / इतर
जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह)कवयित्री - मेधा टिळेकर
जेधे शकावलीश्री सर्जेराव जेधे
शिवभारत ( अणुपुराण ) कवींद्र परमानंद
जिजाऊडॉ प्रतिमा इंगोले
जिजाईमंदा खापरे
गाऊ जिजाऊस आम्हीइंद्रजीत भालेराव
जिजाऊ ( मदर ऑफ आल गुरुज )प्रा.नामदेवराव जाधव
राजमाता जिजाऊ ( चित्रपट )दिग्दर्शक - यशवंत भालकर
स्वराज्यजननी जिजामाता ( मालिका )निर्माते : अमोल कोल्हे

जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी महाराजांवरील चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते.

परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले.

राजमाता जिजाबाई जयंती स्टेट्स शुभेच्छा

Rajmata Jijabai Jayanti Status shubhechha:
१)
जिजाऊंसारखे भाग्य हर एक आईला मिळूदेत,
महाराष्ट्राच्या घराघरात शिवराय घडू देत
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मानाचा मुजरा

राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्या स्टेट्स
राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्या स्टेट्स

२:

त्रिवार असावा मानाचा मुजरा, त्या मातेला
जिने घडविला राजा रयतेचा
रचली स्वराज्याची गाथा, दैवत असे ती राजमाता
जिजाऊ जयंती निमित्त मनाचा मुजरा

राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा
राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा

३:

शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या
राजमाता जिजाऊ जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

४:

जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभु छावा,
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा.
जिजाऊ तुम्ही नसतता तर,
नसते लढले मावळे,
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे.

राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा
राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा

राजमाता जिजाबाई (जिजाऊ) एक प्रेरणास्थान

Rajmata Jijabai (Jijau) An inspiration: जिजामाता जयंती आपल्याला अशा स्त्रीचे जीवन आणि वारसा जपवणूक करण्याची संधी देते की, ज्यांच्या उदात्त भावनेने आणि अटल समर्पणाने भारतीय इतिहासाच्या वाटचालीला आकार दिला. १२ जाने हा शुभ दिवस साजरा करताना, आपण जिजामातेच्या जीवनातून राष्ट्धर्म वाढविणे, जपणे याची प्रेरणा घेऊया. तसेच त्यांच्या तील संस्काररुपी शिकवण, देश प्रेम, एक निष्ठता आणि दूर दृष्टीकोन इत्यादी मूल्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करूयात.

मित्रानो तुम्हाला हा लेख आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करून त्यांना राजमाता जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा ( rajmata jijau jayantichya shubhechya) पाठवा.

हे देखील जरूर बघा : 2024 Marathi Festivals Holidays Calendar: २०२४ मधील सण उत्सव हॉलिडे मराठी कैलेंडर

धन्यवाद.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *