आज सर्वत्र खेळांस भरपूर प्राधन्य दिले जाते. पूर्वी खेळ हा विषय फक्त एका मर्यादेपर्यंत होता परंतु अलीकडे खेळाकडे  करियर म्हणून पहिले जाते. क्रिकेट हा भारतामध्ये फारच लोकप्रिय खेळ आहे.  आजच्या बहुतेक तरुणांमध्ये क्रिकेट मध्ये खूप भविष्य आहे असे वाटते. प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रतेकजण धडपड करत आहे यामुळे इतर खूप चांगले खेळ दुर्लक्षित राहिले आहेत.

पूर्वीचे पारंपारिक खेळ –

विटीदांडू , खो-खो , हुतुतू (कब्बडी) , गोट्या गोट्या , लगोरी , आट्या-पाट्या, सुरपारंब्या, लपाछपी, भातुकली, कुस्ती आणि अजूनही भरपूर  काही

अलीकडील नवीन खेळ  –

क्रिकेट , बुद्धिबळ , हॉकी , टेबल टेनिस , फुटबाल , नेमबाजी , कराटे , मोबाईल गेम्स , कॉम्पुटर गेम्स , रेसलिंग , कार रेसिंग, मोटारसायकल रेसिंग आणि अजूनही भरपूर  काही

खेळामुळे खूप चांगला व्यायाम होतो त्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे अलीकडे घरामध्येच खूप खेळ उपलब्ध आहेत. कॉम्पुटर वर गेम्स खेळणे आणि आतातर मोबाईल हि खूप अत्यावश्यक गरज झाली आहे. मोबाईल मध्ये कॉम्पुटर वरील बहुतांश कामे होतात त्यामुळे आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल हा असतोच.

खेळाचे महत्व –

खेळ खेळण्यामुळे आरोग्य उत्तम राहते. आज ज्या खेळा मुले झटपट प्रसिद्धी व पैसा मिळेल तो खेळ प्रकार जास्त लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे खूप स्पर्धा निर्माण झाली आहे आणि तरुण पिढी हि  कोणत्याही मार्गाने यश मिळवण्यासाठी धडपड करते आहे.

सरकारी धोरण –  

क्रिकेट या खेळाकडून सरकारला आर्थिक उप्तन्न भरपूर प्रमाणात मिळत असले तरी त्यामुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष होत आहे.  सरकारने सगळ्या खेळांना समान महत्व देणे गरजेचे आहे.  गुणवंत खेळाडूंना सवलती आणि उत्तेजन देणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंस विशेष सवलती देणे आवश्यक आहे.  खेळाडू हे कालातंराने सरकारी सेवेमध्ये पण सामावून घेतले जातात.

सचिन तेंडूलकर, विश्वनाथन आनंद, मेरी कोम, पीटी उषा, ध्यानचंद, मिल्खासिंग, धनराज पिल्ले आणि अजून खूप व्यक्तींनी खेळासाठी संपुर्ण आयुष्य दिले आहे.

पुढे अजून भरपूर रंजक माहिती आपण पाहुया.