महिला,अपंग,दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती,आर्थिकस्थीति कमकुवत असलेल्या व्यक्ती महिला धोरण अंतर्गत स्त्रियांचा सामाजिक,मानसिक शारीरिक दर्जा सुधारणे,बाळ जिवित व सुरक्षित मातृत्वाच्याकार्यक्रमाचा प्रचार करणे,राष्ट्रिय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत छोट्या कुटुंबाचा स्वीकार होवून त्या अनुशंगाने वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने विविध योजना राबवितात.

योजनेचे स्वरूप व लाभार्थ्यासाठी निकष व अटी-

१.जननी सुरक्षा योजना-

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय मातृत्व लाभ योजनेच्या ऐवजी जननी सुरक्षा योजना सन २००५-२००६ पासून ग्रामीण भागात कार्यान्वित केली आहे.या अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थामध्ये होणारया प्रसूतीचे प्रमाण वाढविणे व मत मृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे असा आहे.

पात्रता-१.ग्रामीण भागातील सदर गर्भवती महिला अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीची असावी त्याव्यतिरिक्त २.गर्भवती महिला हि दारिद्र्य रेषेखालील असावी.३.सदर लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी १८ वर्षे असावे.४.सदर योजनेचा लाभ २ जिवंत अपत्यांपर्यंत देय राहील.

लाभाचे स्वरूप-:

१.ग्रामीण भागातील रहिवाशी लाभार्थीस संस्थेत प्रसूतीसाठी आल्यानंतर रु.७००/-एक रकमी प्रसुतीनंतर सात दिवसाचे आत देण्यात यावे.२.जननी सुरक्षा योजना लाभार्थींना संस्थेमध्येच प्रसूती करण्याविषयी सेर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येऊन परंतु अपवादात्मक स्थिती मध्ये प्रसूती झाल्यास जननी सुरक्षा योजनेचा लाभ रु.५००/- इतका देण्यात येते.३.लाभार्थीला द्यावयाचे अनुदान हे धनाकर्ष द्वारे वितरीत करण्यात येईल.४.या योजनेंतर्गत सिझेरियन शास्राक्रिया झालेल्या लाभार्थीला रु.१५००/- इतके अनुदान लाभार्थीने रुग्णालयामधील पावत्या दिल्यानंतरच पावत्यानुसार रक्कम देण्यात येईल.एकूण पावतीच्या रक्कमपैकी रु.१५००/-मर्यादेपर्यंत अथवा कमी देयक असेल तर तेवढे अनुदान लाभार्थीला देण्यात येईल.सदरची रक्कम संस्थेला न देता थेट लाभार्थीला देण्यात येते.