अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी

Reshma
By Reshma
3 Min Read
अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी:

१.अपंग व्यक्तीसाठी आरक्षण अधिनियम १९९५ अन्वये राज्य शासनाच्या सर्वच विभागातील सेवेसाठी लागू आहे.

२.अपंग व्यक्तीसाठी आरक्षणाचा लाभ मिळण्याची पात्रता उमेदवारांसाठी किमान ४० टक्के अपंगत्व असावे.

३.अपंग व्यक्तींसाठी असलेले आरक्षण हे ३ टक्के राहील.

४.अपंग व्यक्तीसाठी शासनाच्या प्रत्येक विभागातील गट-अ,गट-ब,गट-क,व गट-ड या वर्गातील पदांकरिता आरक्षण लागू राहील.

५.अपंग व्यक्तीसाठी असलेले आरक्षण हे केवळ सरळसेवा भरती करता आहे.

६.अपंग व्यक्ती शासनाच्या पदांवर सेवा करित असेल तर पदोन्नतीसाठी आरक्षणाचा लाभ घेता येत नाही.

७.परंतु शासन परिपत्रक ०५.०३.२००२ अन्वये आरक्षणाचा लाभ घेता येईल.

अ.गट-ड मधून गट-ड मध्ये.

ब.गट-ड मधून गट-क मध्ये.

क.गट-क मधून गट-क मध्ये.

८.अपंग व्यक्तींसाठी ठेवावयाचे आरक्षण समांतर आरक्षण असून ते ५२ टक्के सामाजिक आरक्षण व खुल्या प्रवर्गातील असलेले ४८ टक्के प्रमाण यामध्ये अंतर्भूत आहे.

९.अपंगासाठी ठेवण्यात आलेल्या आरक्षणाचा आदेशात अपंगाच्या व्याख्येनुसार नमूद करण्यात आलेले अपंगत्वाचे प्रमाण / प्रकार विचारात घेतले जातात.

१०.अपंग व्यक्तीची निवड एखाद्या पदावर झाल्यानंतर अशा उमेदवाराला नियुक्ती पूर्वी शासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ वैद्यक मंडळाने तो उमेदवार संबंधित पदावर काम करू शकेल असे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते.

११.अपंग व्यक्तींना शासकीय सेवेतील नोकरी अर्ज करण्यासाठी सरसकट ४५ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे.म्हणजेच वय वर्ष ४५ पर्यंत शासकीय सेवेसाठी अपंग व्यक्ती अर्ज करू शकतात.

१२.अपंग व्यक्तींसाठी आरक्षण ठेवण्यात आलेल्या पदांसाठी योग्य उमेदवार न मिळाल्यास सदर पदे पुढील वर्षांसाठी रिक्त ठेवण्यात यावे.

१३.सलग तीन वर्षे प्रतीक्षा करूनही पात्र अपंग व्यक्ती सेवेसाठी मिळाले नाही तर संबंधित पद आरक्षण मुक्त करून अपंग उमेदवारा व्यतिरिक्त उमेदवार निवडून भरावे.

१४.सलग तीन वर्ष पात्र अपंग व्यक्ती सेवेत येण्यासाठी प्रतीक्षा करणे अध नियमान्वये बंधनकारक आहे.

महाराष्ट्र शासन विविध उपयुक्त संकेतस्थळ यादी

अपंग आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र:-

१.प्रमाणपत्रावर वैद्यकीय मंडळाचे अध्यक्ष व दोन सदस्य अशा तीन अधिकार्यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

२.अपंगत्वाच्या प्रमाणपत्रात असलेल्या शब्दाव्यतिरिक्त इतर कोणतेही शब्द अभिप्राय मुद्दे नमूद नसावे.

३.कित्येक वेळा अपंगत्व हे कालांतराने बरे होणारे किंवा कमी होणारे असते म्हणून अशा उमेदवारांना प्रमाणपत्र देते वेळी त्या प्रमाणपत्रामध्ये फेर प्रमाणपत्र केव्हा प्राप्त करावयाचे आहे?या बाबत सूचना नमूद असावी.

४.अपंग आरक्षणाचा लाभ घेऊन निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती करण्यापूर्वी वैद्यकिय अधिकारी यांना सदर उमेदवाराची नियुक्ती हि अपंग आरक्षण द्वारे अंध/अस्थिव्यंग/मूकबधिर या प्रवर्गात झालेली आहे.तरी सदर उमेदवाराची वैद्यकीय तपासणी ही सर्वसाधारण उमेद्वारांसारखी करण्यात यावी.

५.गहाळ झालेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी नवीन नियमानुसार निर्गमित करण्यात आलेले प्रमाणपत्र देण्यात येते.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
25 Reviews
 • Avatar of विनोद सरोदेविनोद सरोदे says:

  अपंग व्यक्तीची निवड एखाद्या पदावर झाल्यानंतर अशा उमेदवाराला नियुक्ती पूर्वी शासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ वैद्यक मंडळाने तो उमेदवार संबंधित पदावर काम करू शकेल असे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. सदरचे अपंग प्रमाणपत्र कशा स्वरूपात असते त्याची पीडीएफ फॉरमॅट अपलोड करावा

  Reply
 • Avatar of इकबाल ईनामदारइकबाल ईनामदार says:

  अपंगाचा दाखला असलेने कीती ठके टंयक़स माफ होते

  Reply
 • Avatar of usha ashok saganeusha ashok sagane says:

  मी (अपंग) सरकारी नाेकरीला करते मला माझा इछे नुसार बदली पाहीजे तयावर मला उपाय सांगा

  Reply
 • Avatar of Ajay jarwalAjay jarwal says:

  अपंग असुनही अ.जमाती अपंग सवंर्गात सरळसेवेने नियुक्ति झाल्यास फायदा कोनता?अ
  अपंग का अ जमाती
  उत्तर द्या प्लिज अर्जेंट आहे

  Reply
 • Avatar of सुरेश दौलत पाटील उल्हास नगरसुरेश दौलत पाटील उल्हास नगर says:

  अपंगाना पूर्वी प्रमाणे पेन्शन लागू करावे व अपंगासाठी घरकुलसाठी मोहिम राबवावी

  Reply
  • Avatar of खाडे अभिजितखाडे अभिजित says:

   अपंग म्हणून नियुक्ती असल्यास जातीचा प्रवर्ग खुला समजण्यात येतो

   Reply
   • Avatar of अजय जारवालअजय जारवाल says:

    सर कोणत्या शासन निर्णयानुसार व परिपत्रका नुसार दिनांक

    Reply
 • Avatar of datta bhosaledatta bhosale says:

  Mala sarkari paheje mi dahavi paas ahe

  Reply
 • Avatar of sudeshsudesh says:

  Sir may apang hu. Mera education MA.BED.DED hai. Ham ne socha ki apang reservation me job lagega isliye ye course kiye lekin abhi tak berojgar hai .please hamari madt kare.

  Reply
 • Avatar of Rohan katharRohan kathar says:

  अपंगांचे 3% आरक्षन प्रायवेट क्षेत्रात लागु आहे का

  Reply
  • Avatar of अर्जुन पळसकरअर्जुन पळसकर says:

   नाही

   Reply
   • Avatar of अर्जुन पळसकरअर्जुन पळसकर says:

    का नाही

    Reply
    • Avatar of अर्जुन पळसकरअर्जुन पळसकर says:

     घरकुल

     Reply
 • Avatar of संभाजी हरिभाऊ खाटीकसंभाजी हरिभाऊ खाटीक says:

  मला घरकुल फार्म नाही
  मी अपंग आहेत.

  Reply
 • Avatar of Shivaji doulu patilShivaji doulu patil says:

  अपंगाच्या बदली बाबत मार्गदर्शन हवे

  Reply
 • Avatar of राजेश रेवतकरराजेश रेवतकर says:

  अपंग असुनही इमाव सवंर्गात सरळसेवेने नियुक्ति झाल्यास फायदा कोनता?

  Reply
  • Avatar of khemeshwarikhemeshwari says:

   कोणता फायदा ते सांगा

   Reply
 • Avatar of राजेश रेवतकरराजेश रेवतकर says:

  सेवेत असताना अपंगत्व आल्यास काय तरतूद आहे

  Reply
  • Avatar of padmnath n kolhepadmnath n kolhe says:

   anukampa sathi kay tatud aahe

   Reply
   • Avatar of PADMNATHPADMNATH says:

    UTTAR

    Reply
  • Avatar of खाडे अभिजितखाडे अभिजित says:

   इतर आपंगा प्रमाणे फायदे मिळतील फक्त 40% चे वरती अपंगत्व असणे गरजेचे आहे. सोबत प्रमाणपत्र गरजेचे आहे

   Reply
 • Avatar of Dipak GosaviDipak Gosavi says:

  मी नोकरी मूकबधिर 10 वर्षे झाली. 9423850144

  Reply
 • Avatar of चंद्रमौली औलेला नांदेड.चंद्रमौली औलेला नांदेड. says:

  अपंगाना विशेष बाब म्‍हणून बंद झालेला शासनाचे पूर्वीप्रमाणे पेन्‍शन योजना चालू करावे

  Reply
 • Avatar of चंद्रमौली औलेला नांदेड.चंद्रमौली औलेला नांदेड. says:

  अपंगांना (बेरोजगार आणि नौकरदार) यांना शासनामार्फत कंवा महाडा या शासन संसथेमार्फत घरकुल योजनेे लाभ देण्‍यात यावे.

  Reply
 • Avatar of kailaskailas says:

  कैलास रामा खर्डे विनोद रामा खर्डे पुनम रामा खर्डे तीन अपंग मदत करा मो. ९५२७६६१८३० रा. तेलगांव ता. माजलगांव जिल्हा बीड ३२५३२२५४८७३

  Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *