६९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन

Reshma
By Reshma
3 Min Read
भारतीय स्वातंत्र्य दिन

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

भारतात सर्वत्र ६९ वा स्वातंत्र दिन साजरा होत आहे.  त्या निमित्ताने आपना सर्वाना स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्या.

भारतीय स्वातंत्र्यदिवस प्रतिवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते.

तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. माणूस असो वा देश असो स्वातंत्र्या सारखे दुसरे सुख नाही. हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यामार्गांचे ध्येय एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य! अनेकांनी भिन्न भिन्न मार्गाने व अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळविले गेले आहे.

आपल्या पिढीचा स्वतंत्र्य भारतात जन्म झाला आहे. आता भारताचे स्वातंत्र्य टिकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे ते केलेच पाहिजे! त्यासाठी १५ ऑगष्ट हा दिवस आपण पवित्र सणा सारखा साजरा केला पाहिजे. आजच्या दिवशी आपण काही चांगले निश्चय करून देश हिताचे काम करायची शपथ घेतली पाहिजे. ध्वजवंदन करताना त्या पवित्र ध्वजाच्या साक्षीने हि शपथ घ्यायची असते

महाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच – आजच करा नोदणी !

आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून १५ ऑगष्ट १९४७ ला स्वातंत्र्याच्या पवित्र्यतेचे श्रेय मिळाले. आपल्या पिढीतल्या कोणत्याही दृष्टीने १९४७ हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय. या ऐतिहासिक सालाच्या पवित्र घटनाच्या पावन स्मृती आपण कायम ठेवल्याच पाहिजेत. आणि कर्तव्य बुद्धीने आपण दरवर्षी १५ ऑगष्ट्ला ,स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो.

भारतीय राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी, अंगिकारला गेला. भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत ज्यामुळे त्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. स्वातंत्र देशासाठी राष्ट्रागीत,राष्ट्रागान, राष्ट्रचध्वज, राष्ट्रीय बोधचिन्ह खूप महत्त्वाची असतात. त्याशिवाय देशाचे अस्तित्व नसते.

   राष्ट्रध्वज: तिरंगी ध्वज – तिरंग्यातील तीन रंग आणि अशोक चक्र

   ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्याीत आली आहे.

– वरच्या भागात गडद केशरी रंग आहे या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
– मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
– खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निष्ठा व समृध्दी,चा बोध होतो.
– अशोक चक्र हा कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणा-या जगाचं सूचन करतो.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *