गोकुळाष्टमीचा उत्सव

Reshma
By Reshma
2 Min Read
गोकुळाष्टमीचा उत्सव

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.
या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव म्हणतात. तसेच `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या नामाचा जप उपासना मनोभावे केल्यास श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.

गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्याळ दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. गोविंदा रात्री १२.४०ला कृष्णजन्मोत्सव साजरा झाला की सूर ऐकू येतात ते…गोSSSविंदा रे गोSSSपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा,
घरात नाही पाणी घागर, उतानी रे गोपाळा…
आला रे आला, गोविंदा आला..Dahihandi

आपले सगळेच सण आनंद, उत्साह, प्रेमाचा संदेश देणारे… प्रत्येकाची मजा वेगळी, साज वेगळा… मग गोपाळकाल्याचा सणही त्याला कसा अपवाद असणार. एकजूटीचा संदेश देणारा हा खेळ बघायला खूप मजा येते…

वेगवेगळे खाद्यपदार्थ , दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला’ होय. श्रीकृष्णाने गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्याे एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्याद दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. दहीहंडी हे जीवाचे प्रतिक आहे. दहीहंडी फोडणे, हे जिवाने देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीत स्थिर होणे, या अर्थाने आहे आणि दिव्य चव हे आनंदाचे प्रतीक आहे

.
काला’ म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्याु घटनांचे एकत्रीकरण. गोपाळकाला’ हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.

हरतालिका आरती

काल्यातील प्रमुख घटक
पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीाचे निदर्शक आहेत.
पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्तीणचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्याो मातृभक्तीतचे प्रतीक
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीाचे प्रतीक
ताक : गोपींच्या विरोधभक्तीधचे प्रतीक
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीतचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *