जगभरात कोरोनाचा कहर – कधी संपेल हा कोरोना ?

Devesha
By Devesha
4 Min Read
जगभरात कोरोनाचा कहर,कधी संपेल हा कोरोना

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

सध्या चीनमध्ये उत्पत्ती झालेल्या कोरोना विषाणूच्या साथीने हाहाकार उडाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO – World Health Organization ) या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे अधिकृत नामकरण ‘COVID-19’ असे केले आहे. भारतामध्ये केरळमध्ये या कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला .

corona nw11

कोरोना व्हायरसपासून (COVID-19) कशी काळजी घ्यायची ?

 • स्वच्छ हात धुवा.

पाणी आणि साबणाने ४० सेकंद हात धुवा. जर तुम्ही अल्कोहोल असणारे हॅंड वाॅश वापरत असाल तर २० सेकंद पुरेसे आहेत. जर तुमचा हात अस्वच्छ असेल किंवा मातीमुळे खराब झाला असेल तर साबण आणि पाण्याचाच वापर करा.

 • हातरुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करा.

खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल ठेवा. रुमाल नसेल तर टिश्यू पेपरचा वापर करा. अन्यथा हाताच्या कोपराने तोंड झाका. टिश्यू पेपरचा वापर केल्यावर तो तात्काळ बंद कचरापेटीत फेकून द्या.

 • तोंड, नाक चेहरा, डोळे यांना स्पर्श करू नका.

कोरोना वायरस लोकांच्या थुंकीतून एखाद्या पृष्ठभागावर पडू शकतो. नकळत आपला हात त्या पृष्ठभागाला लागू शकतो. त्यामुळे तोंड, नाक चेहरा, डोळे यांना स्पर्श करू नका.

 • कमीत कमी तीन फुटाचे अंतर.

समोरच्या व्यक्ती सोबत बोलत असताना त्याच्यापासून कमीत कमी तीन फुटाचे अंतर ठेवा.

 • आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश.

कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा द्यायचा असेल तर आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे.यासाठी आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. यामध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते.

आंतरराष्ट्रीय योग दिवस -२१ जून

उपचार :

COVID-19 ने आजारी पडलेल्या बहुतेक लोकांना सौम्य ते मध्यम लक्षणे जाणवतात आणि विशेष उपचारांशिवाय बरे होतात.

 1. या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही.
 2. दृष्टोत्पत्तीस आलेल्या लक्षणांवर लाक्षणिक उपाययोजना करतात.
 3. गंभीर अवस्थेत रुग्णाला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्याची गरज पडू शकते.

वेड / व्यसन सोशिअल मिडीया चे !

मग मी काय करावं?

कोरोना विषाणूचा प्रसार खोकला किंवा शिंकेतून बाहेर पडणाऱ्या तुषारांमधून किंवा असे तुषार पडलेल्या जागी स्पर्श केलेला हात नाका-तोंडाला लागल्यानं होत असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आलं आहे.

तसंच गर्दीच्या ठिकाणी अशा संसर्गाचा धोका जास्त असल्याचं तज्ज्ञांनी वारंवार सांगितलं आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खालील गोष्टी नियमितपणे करा –

 • आजारी व्यक्तींच्या फार जवळ जाऊ नका.
 • हात न धुता तोंड, नाक, डोळे, कान यांना स्पर्श करू नका.
 • शिंकताना आणि खोकलताना टिशू पेपर वापरा. वापरून झाल्यावर तो कचरापेटीत टाकून हात स्वच्छ धुवा.
 • साबणाने नियमित हात धुवा.

मास्क वापरल्यामुळे खरंच कोरोना रोखता येता का, याबाबत WHO अजूनही खात्रीशीरपणे सांगू शकत नसल्याचं म्हणतंय. पण तोवर गर्दीच्या ठिकाणी जाणार असाल तर तो नक्कीच वापरा.

कोरोना संबधी माहितीसाठी भारत सरकार ची अधिकृत वेबसाईटhttps://www.mygov.in/covid-19

कोरोना व्हायरस हि सगळ्यात मोठी महामारी आहे.ह्याला आपल्या सर्वाना सामोरे जायचे आहे. बहुतेक लोकांचे स्थलांतर झाले आहे तर काही लोक अजूनहि  आप आपल्या गावी जात आहे.ह्या लोकडाऊन मध्ये खुप लोकांच्या नोकरया गेल्या तर कितेक लोकांचे व्यवसाय बंध पडले.खुप मोठ्या प्रमाणात सर्वांचे आर्थिक ,मानसिक, कौटुंबिक, तसेच इतरही नुकसान झाले.

महाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच – आजच करा नोदणी !

प्रत्येकाला एकमेकांच्या मदतीची , आधाराची गरज आहे.वयस्कर लोकांची काळजी घेणे सुदधा महत्चत्वाचे आहे. सरकार वर सुधा मोठ आर्थिक संकट आहे . त्यामुळे  सरकार ला प्रशासनाला सहकार्य करा.हे मोठ युद्ध आहे आपण सगळे नियम पाळून यामध्ये सहभागी व्होऊ यात .आपल्या सर्वाना परत एकदा नव्याने सुरुवात करायची आहे.ह्या निमित्तानेआपल्या सर्वाना  एक नवीन संधी पण मिळत आहे असे म्हणायला हरकत नाही.

चला तर मग सर्वांनी तयार व्हा, नव्या आशेने नव्या जोमाने नवीन संकल्प घेवून नवीन कामे शोधू ,उद्योग चालू करू,तसेच आधुनिक प्रकारे  शेती करू या.आपल्या समोर खुप सारे पर्याय आहेत .त्या योग्य मार्गांनी जावून आपले नवीन आयुष्य सुरु करूयात.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article