International Women’s Day 2024: जागतिक महिला दिन विशेष माहिती

आंतरराष्ट्रीय महिला दिन संपूर्ण मराठी माहिती येथे वाचा.

Reshma
By Reshma
8 Min Read
जागतिक महिला दिन विशेष माहिती

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day 2024) दरवर्षी 8 मार्च रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा सन्मान करणारा जागतिक दिवस आहे.

जागतिक महिला दिन विशेष माहिती

International Women’s Day 2024 Information (IWD): सर्व प्रथम महिला दिनाच्या (mahila din) सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा. ८ मार्च या दिवशी महिला दिन आणि महाशिवरात्री उत्सव हे दोन्ही एकाच दिवशी आले आहे. आणि या दिवशी जगभरात सुट्टी आहे. म्हणूनच ह्या वर्षी हे दोन्ही कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे होणार आहेत.

अधिक वाचा: Maha Shivaratri 2024: महाशिवरात्री महत्व व्रत उपवास पूजाविधी संपूर्ण माहिती

जगाच्या लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. त्या कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत. समाजाच्या प्रगतीत पुरुषांइतकाच महिलांचाही वाटा आहे, पण तरीही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांइतकी संधी आणि सन्मान मिळत नाही. आजही त्यांना समानतेच्या हक्कासाठी अनेक आघाड्यांवर लढावे लागत आहे.

समाज प्रगतीसाठी तसेच राजकारण, अर्थशास्र आणि सामाजिक क्षेत्रांसह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये महिलांचे सक्षमीकरण आणि लैंगिक समानता आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनापेक्षा चांगला दिवस नाही.

संपूर्ण इतिहासात महिलांचे समाजाप्रती  महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे आणि भविष्यातही आणखी मोठ्या योगदानाची शक्यता आहे, म्हणून आपण सर्वजण या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उपयोग महिलांना सक्षम करण्यासाठी, सर्वांसाठी एक चांगले भविष्य घडवण्यासाठी, महिलांना नेतृत्वाची भूमिका घेण्यास त्यांना प्रोत्साहित करू शकतो.

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना समान दर्जा मिळवून देणे, जेणेकरून त्या कोणत्याही अधिकारांपासून वंचित राहू नयेत. त्यांच्याशी कोणत्याही क्षेत्रात भेदभाव होता कामा नये.

जेव्हा महिलांना संधी उपलब्ध करून दिली गेली आणि महिला सक्षम झाल्या, तेव्हा महिलांनी स्वत:ला चांगले सिद्ध केले आहे. महिलांचे कर्तृत्व आणि त्याचा परिणाम आज असा आहे कि, महिला मोठया कंपनीत चांगल्या पदावर आहेत, तसेच काही महिला उद्योजिका आहेत, राजकारणात देखील महिला ‘राष्ट्रपती पद’ सुद्धा व्यवस्थित सांभाळत आहे.

अजूनही महिलांसाठी खूप काम करायचे आहे, अनेक बदल होऊनही महिलांना अजूनही शिक्षण, सन्मान आणि समानतेसाठी खूप संघर्ष करावा लागत आहे.

भारताच्या प्रसिद्ध असलेल्या महिला सरोजिनी नायडू यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी, महिलांच्या हक्कांबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि मोहिमा देखील आयोजित केल्या जातात.

महिला दिनाचा इतिहास

History of Women’s Day: जगभरातील अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन (Women’s Day 2024) साजरा केला जातो. राष्ट्रीय, जातीय, भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक किंवा राजकीय, विभाजनांचा विचार न करता महिलांना त्यांच्या कर्तृत्वासाठी ओळखले जाते असा हा दिवस आहे.

महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी ८ मार्च  (8 march) ही तारीख का निवडली गेली? आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात कशी झाली? हे आपण पुढे पाहूयात ?

आंतरराष्ट्रीय महिला दिनाची (aantarrastiy mahila din) उत्पत्ती २० व्या शतकाच्या सुरुवाती झाली, तेव्हा जगभरात महिलांच्या हक्कांच्या चळवळींना वेग आला होता.

सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाच्या घोषणेनुसार २८ फेब्रुवारी १९०९ रोजी अमेरिकेत पहिला राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम न्यूयॉर्कमध्ये १९०८ च्या गारमेंट कामगारांच्या संपाच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आला होता, जिथे महिलांनी कामाच्या परिस्थितीविरुद्ध निषेध केला.

१९१० मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या वर्किंग वुमनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या समर्थनासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाला महत्त्व प्राप्त झाले. अमेरिकन कार्यक्रमापासून प्रेरित होऊन, क्लारा झेटकिन या जर्मन समाजवादीने वार्षिक आंतरराष्ट्रीय महिला दिनाची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला.

हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आणि पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन १९ मार्च १९११ रोजी ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये महिलांना काम, मतदान आणि सार्वजनिक पद धारण करण्याच्या अधिकारांच्या मागणीसाठी रॅली आणि निदर्शनांसह साजरा करण्यात आला.

१९६० च्या दशकात एक मुक्ती चळवळ झाली आणि या प्रयत्नामुळे मतदान हक्क कायदा मंजूर झाला, ज्यामुळे सर्व महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.आता आपण सामाज्यामध्ये पूर्णतः समानता निर्माण करण्याच्या आशेने पुढे जात असताना दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो.

आंतरराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या समस्यांबद्दल जागरुकता वाढवणे आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मार्च मध्ये वेगवेगळे कला प्रदर्शन आणि विविध कार्यक्रमांसह साजरा केला जातो.

सर्व क्षेत्रातील महिलांच्या कर्तृत्वाची ओळख करून त्यांचा सन्मान करण्याची आणि जगभरातील लैंगिक समानता आणि महिलांचे अधिकार समजून सांगण्यासाठी हा दिवस आहे.

महिला दिनाचे महत्त्व

Significance of Women’s Day: लिंगभेदमुक्त एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी लैंगिक समानतेचा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. तसेच हा दिवस महिलांचे समान हक्क, हिंसा आणि महिलांवरील अत्याचार यासारख्या समस्यांचे निराकरण करतो.

आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा महिलांना सक्षम करण्यासाठी आहे. समाजात निर्माण होणारा प्रत्येक भेदभाव तो नष्ट करतो. या दिवशी समाजात सकारात्मकता पसरवण्यासाठी महिलांना समान अधिकार देण्याची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांच्या संघर्षाचा गौरव करण्यासोबतच  या दिवशी त्यांनी प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करायला हवी.

महिला दिन उत्सव

Women’s Day Celebration: जगभरात महिला दिनाचे सेलेब्रेशन जल्लोषात होते. अलीकडे महिलांना खूप आदर, सन्मान दिला जातो, म्हणूनच या दिवशी प्रत्येक घरोघरी सेलेब्रेशन केले जाते.

महिलांना या दिवशी आवडत्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी दिली जाते, तसेच त्यांना हाताने बनवलेल्या भेटवस्तू, महिला लेखकांनी लिहिलेली पुस्तके, इ. भेटवस्तू दिल्या जातात.

या दिवशी महिला स्वत:ला महिलांचे हक्क आणि लैंगिक समानतेबद्दल शिक्षित करू शकतात. त्याचबरोबर महिला आपल्या कुटुंबासोबत, मैत्रिणींसोबत आवडता चित्रपट पाहतात, मोठ्या मार्केटमध्ये, मॉलमध्ये शॉपिंग करतात.

मोठ्या सोसायटी मधील महिला, महिला बचत, तसेच इतर महिला संघटना, एकत्र येवून मोठा कार्यक्रम आयोजित करतात. त्यात महिलांचा सत्कार, महिलांसाठी गिफ्ट, महिलांचे खेळ ( उखाणे, संगीत, मंगळागौर स्पर्धा इ.) केक कटिंग, स्नेहभोजन, अशा प्रकारचे महिला सेलेब्रेशन करत असतात.

महिला ह्या परिपूर्ण आहेत, कारण त्यांच्यामध्ये निर्माण, पालनपोषण आणि परिवर्तन करण्याची शक्ती आहे. अनेक क्षेत्रामध्ये महिला अग्रस्थानी आहे. महिला ह्या मां दुर्गा, मां काली चा अवतार आहेत. त्या कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहतात.

महिला स्वत: कुटुंब संभाळून व्यवसाय, नोकरी, आणि इतर क्षेत्रात महत्वाच्या स्थानी आहेत. सध्या सोशिअल मिडिया या क्षेत्रात सुद्धा महिला प्रथम क्रमांकावर आहेत. बचत गट चालविणे, त्यामार्फत उद्योग सुरु करणे, तसेच स्वतंत्र व्यवसाय करणे अशी सर्व कामे महिला अगदी सहज करतात.

फ्रीलान्सर, युटूबर, ब्लॉगर अशा क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणावर काम करून पैसे कमवतात तसेच त्यांचा नाव लौकिक या माध्यमाद्वारे होतो. त्यांना ह्या क्षेत्रात अनेक कामे मिळू लागली आहे. त्या प्रत्येकीने आपले स्वप्न या माध्यमातून पैसे कमवून पूर्ण केले आहे.

आजच्या आधुनिक युगात महिलांची धावपळ खूप वाढली असून, महिलांमध्ये आरोग्याच्या तक्रारी सुद्धा वाढत आहे. म्हणून या दिवशी महिलांची मोफत आरोग्य तपासणी, महिलांसाठी आरोग्यविषयक मोफत सल्ले व मार्गदर्शन, औषधे, इ. दिली जातात.

तसेच मदत म्हणून गरीब गरजू महिलांना घरगुती वापराच्या इलेक्ट्रोनिक वस्तू, मशीन्स, शिलाई मशीन, पिठाची गिरणी, रेशनिंग साहित्य, कपडे, सेनेटरी नैपकिनस वाटप  इ. अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि पुढे ही महिलांच्या फायद्याचा विचार करून अशा वेगवेगळ्या नवीन संकल्पना अमलात आणल्या पाहिजेत.

धन्यवाद!

हे पण वाचा :  Free Education for Girl Child In Maharashtra 2024: मुलींना मोफत शिक्षण योजना संपूर्ण माहिती

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *