अलीकडे सोशिअल मिडीया चा वापर खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.शहरी लोकांन बरोबर गाव खेड्यातील लोकांचा हा वापर वाढत आहे. बहुतेक लोक स्मार्ट झाले आहेत. कधीकधी इच्छा असूनही सोशल मीडियापासून दूर राहणे शक्य होत नाही. सोशल मीडियाने मानवी जीवनात मोठी क्रांती आणली असली तरी त्याचे काही तोटे सुद्धा आहेत.

फेसबुक,ट्वीटर,इन्स्टा,युटूब,स्नपचाट हे प्रमुख माध्यम असून या बरोबरच टिकटोक,व व्हाट्सएप, ची सध्या क्रेझ आहे.तर आपण बघुयात यात किती प्रकारचे युझर्स आहे.आणि ते ह्या सर्व माध्यमांचा कसा वापर करतात. टाईमपास साठी कि अजून काही.सध्या तर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन गट प्रत्येक माध्यमात बघायला मिळतात.मग त्यातून होणारी चढाओढ सुरु होते.म्हणून मग यामुळे युझर्स आपला खुप जास्त वेळ कारण नसताना येथे घालवतात. आज आपण जाणून घेऊयात सोशल मीडियामुळे माणसाच्या मेंदूवर होणाऱ्या परिणामांविषयी.

आज जगातील अर्ध्याहून अधिक लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचले आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्या पाच ते दहा टक्के युझर्सनी सोशल मीडियावर घालवण्यात येणारा वेळ कमी करणे आपल्याला शक्य होत नसल्याचे मान्य केले आहे. अशा लोकांच्या डोक्याचे स्कॅन केले असता त्यांच्या मेंदूतील त्या भागात गडबड झाल्याचे आढळून आले जिथे ड्रग्सचे सेवन गेल्यामुळे गडबड होते. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे भावना, एकाग्रत आणि निर्णयांना नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागावर विपरित परिणाम होतो. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे वापरकर्त्याला एक खोटा आनंद मिळते. सोशल मीडियावर वाढत्या वापरामुळे एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची सवय अनेकांना लागली आहे. त्यामुळे मेंदू लक्ष भटकवणाऱ्या गोष्टींना ओळखण्याची क्षमता मेंदू गमावून बसतो. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे आपला फोन वाजलाय का, व्हायब्रेट झालाय का असा भास वारंवार होऊ लागतो. याला शास्त्रीय भाषेत फैंटम वाइब्रेशन सिंड्रोम म्हणतात.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे एककेंद्री वृत्ती वाढते. तसेच अशा व्यक्ती आपल्याच विश्वात गुंतून जातात.सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये सोशल मीडियावरील लाइक, कमेंट्सवरून आनंद मिळवण्याचे प्रमाण वाढते. सोशल मीडिया हे निःशंकपणे उपयोगी साधन आहे; पण तरीही याचं व्यसन तुम्हाला कधी लागतं हे कळण्या अगोदरच ते अंगवळणी पडलेलं असतं. अगदी सकाळी उठल्यावर अपडेट्स तपासण्यापासून ते रात्री झोपेच्या वेळी पोस्ट टाकण्यापर्यंत तुम्ही या माध्यमात गुंतलेले असता. एखाद्या अॅपपासून काही काळ दूर राहणंही आपल्याला जोखमीचं वाटत असेल, तर हेच संकेत आपल्या विवेकाला विश्रांतीची गरज असल्याचं सांगतात. सकाळी नोटिफिकेशन्स पाहणं आणि सोशल मीडिया प्राधान्यावर असणं यातला नेमका फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. तुमचं वैयक्तिक आयुष्य पोस्ट करावंसं वाटतं का? एखादा क्षण पूर्ण अनुभवण्याच्या आधी तो तुमच्या स्टोरीमध्ये येतो का? कुणाला तरी खूष करण्यासाठी तुम्ही हे करता का? तुम्ही तुमचा उपयोगी वेळ यात खर्ची घालत नाही ना? यातून तुम्ही काही मिळवता का? या आणि अशा अनेक प्रश्नांची सकारात्मक उत्तरं तुमच्याकडे असतील, तर तो तुमच्यासाठी चिंतेचा विषय असू शकतो, कारण वास्तविक वाटणारं हे माध्यम आपल्यासमोर नकळत अनेक आभास मांडतं.

सतत सोशल मीडियावर स्क्रोल करत राहणं म्हणजे तुमचा ताण अधिक वाढवून घ्यायची लक्षणं आहेत. केवळ कंटाळा येतो म्हणून आपण सोशल मीडियाचा वापर करत असू तर ते चूक आहे. तुमच्या रिकाम्या वेळेत काही अर्थपूर्ण काम करण्यात आपण स्वतःला गुंतवलं पाहिजे, जेणेकरून तो गरजेचा असलेला ब्रेकही आपोआप मिळतो.ऑफलाइन राहणं किंवा इंटरनेट नसणं याचा तुम्हाला तणाव वाटत असेल, तर तुमच्यात ‘फोमो’ची भीती निर्माण होत आहे. ही परिस्थिती तुम्हाला हा साक्षात्कार घडवते, की जग तुमच्यासाठी थांबलेलं नाही. अशा परिस्थितीत याची जाणीवही आपल्याला असायला हवी.आभासी जग खरं वाटतं म्हणून आपण इंटरनेट वापर वाढवत असू, तर त्यातून राग, द्वेष, असुरक्षितता निर्माण करणारी परिस्थितीही अगदी सहज उद्भवू शकते. सोशल मीडिया हे निव्वळ संवाद आणि मनोरंजनाचं माध्यम असावं, त्यातून काही गैर कधी घडत कामा नये, याची दक्षता घेणंही आवश्यक आहे. सोशल मीडियाचा अतिवापर हा केवळ मानसिकताच नव्हे, तर शारीरिक त्रासालाही कारणीभूत ठरू शकतो. फोनच्या अतिवापरामुळे हात दुखणं, मनगट दुखणं, डोळे जड होणं इत्यादी त्रास अंगी लागू शकतात. त्यामुळेच या माध्यमाचा मर्यादित वापर हा तब्येतीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

सोशल मीडियामुळे संवादाच्या, अनुभवाच्या अप्रत्यक्ष कक्षा विस्तारल्या आहेत. आपण जे अनुभव घेतलेले नाहीत ते अनुभव बघण्याची, वाचण्याची, समजून घेण्याची संधी सोशल मीडियामुळे मिळते आहे.https://www.lokmat.com/topics/tik-tok-app/page/2/

आरोग्यविषयक माहितीची देवाण-घेवाण:

सोशल मीडियामुळे संवादाच्या, अनुभवाच्या अप्रत्यक्ष कक्षा विस्तारल्या आहेत. आपण जे अनुभव घेतलेले नाहीत ते अनुभव बघण्याची, वाचण्याची, समजून घेण्याची संधी सोशल मीडियामुळे मिळते आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियामुळे अनेक मनोशारीरिक आजारांची माहिती तरुण पिढीला समजू लागली आहे. मनोशारीरिक समस्या काय असतात, त्या हाताळायच्या कशा, इतर रु ग्ण या समस्या कशा हाताळतात, मदत कुठे मिळू शकते अशा अनेक गोष्टींची माहिती आज सोशल मीडियामुळे सहज उपलब्ध आहे. यू-ट्युब सारख्या साइटवरून तर आजार, त्याच्या लक्षणांचे व्हिडीओ, डॉक्टरांशी थेट संवाद अशा अनेक गोष्टी आज उपलब्ध आहेत. इतकंच कशाला एखादं आॅपरेशन कसं केलं जातं याची माहिती हवी असेल तर त्याचे व्हिडीओज आज उपलब्ध आहेत. ज्यामुळे आरोग्य या विषयातले अज्ञान कमी व्हायला मदत मिळू शकते. विशेष म्हणजे अनेक आजारांसंदर्भात बोलण्याचा मोकळेपणा वाढतो आहे.

मानसिक आधार आणि कम्युनिटी बिल्डिंग:

आपल्यापेक्षा वेगळे मत मांडणाºया व्यक्तीवर टोकाची असभ्य टीका सोशल मीडियात जशी होते तसाच अनेकांना मानसिक आधारही मिळतो. हा आधार जसा ओळखीच्या व्यक्तींकडून मिळतो तसा तो अनोळखी व्यक्तींकडूनही मिळतो. प्रत्यक्ष व्यक्तींना न भेटताही अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मिळत असते. ही मदत समुपदेशन या स्वरूपाचीही असते किंवा नुसतेच ऐकून घेणे या स्वरूपाचीही असते. आजच्या काळात जिथे सोशल मीडियामुळे प्रत्येकाला मत मांडण्याचं प्रचंड स्वातंत्र्य मिळालं आहे तिथे कुणी कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. त्याच प्रमाणे याच माध्यमात फक्त ऐकून घेणारे, सल्ला देणारे, मानसिक आधार देणारे गट, व्यक्ती आणि संस्थाही आहेत. ही जमेची बाजू आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या प्रत्येक १० तरु णांपैकी सात जण तरी समस्येच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागतात. किंवा त्यांना मदत मिळते असं अभ्यासात दिसून आलं आहे. त्यातून काही डिजिटल कुटुंबंही बनत आहेत. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ग्रुप्स असतात. अनेक कम्युनिटीज चालतात. या माध्यमातून समविचारी लोक एकत्र येतात. सपोर्ट सिस्टिम्स बनतात. एलजीबीटी लोकांचे गट, कॅन्सरच्या रु ग्णांच्या कुटुंबीयांचे, स्तनांचा कर्करोग झालेल्या स्त्रियांचे, निराशेशी लढणाºया स्त्री-पुरु षांचे गट ही एक सकारात्मक बाजू आहे.

स्वत:ला शोधायला हक्काची मदत:

जसंजसं आपण तारु ण्यात पदार्पण करतो तशा अभिव्यक्ती आणि स्व-ओळख या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या बनतात. त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक असतात. सोशल मीडियात व्यक्त होण्यावर बंधन राहत नाही. कुणी व्यक्त व्हावे आणि कुणी नाही या पारंपरिक भूमिका सोशल मीडियाने पूर्णपणे बदलून टाकल्या. तरु णाईसाठीही सोशल मीडिया अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ बनले आहे. एखादा तरु ण कवी सोशल मीडियावर त्याच्या कविता पोस्ट करून त्यांच्या वाचकांपर्यंत सहज पोहचू शकतो. आपल्या पोस्ट्सना मिळणारे लाइक्स आणि ब्लॉग्सना मिळणारे फॉलोअर्स हुरूप वाढवणारे असतात. त्यातून स्व-प्रतिमा बळकट होतानाही दिसते. आपण जे काही लिहितोय, व्यक्त करतोय त्याची जबाबदारी घेण्याची वृत्तीपण आपोआप तयार होताना दिसते आहे.

नव्यानं नाती बांधली जातात तेव्हा…

वैयक्तिक, व्यावसायिक नाती तयार करण्याची, सांभाळण्याची आणि बळकट करण्याची संधी सोशल मीडियातून उपलब्ध होत आहेत. व्यावसायिक, सहकारी एकमेकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज संपर्कात राहू शकतात. वैयक्तिक नाती सांभाळण्यासाठी तर हल्ली सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. शाळेतल्या वर्ग मित्र-मैत्रिणींचा ग्रुप शाळा संपल्यावर कैक वर्षांनी व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकमुळे पुन्हा एकत्र येताना दिसतोय. नव्याने झालेल्या मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स सोशल मीडियामुळे एकमेकांच्या सहज संपर्कात राहू शकतात. निरनिराळ्या कारणांनी दुरावलेली नाती, कामामुळे एकमेकांपासून दूर असलेले कुटुंबीय या माध्यमामुळे सहज एकमेकांच्या संपर्कात राहतात. तुम्ही कुठल्या देशात राहतात, एकमेकांपासून किती लांब राहता याचा एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी पूर्वी जसा अडथळा होता तसा तो आज राहिलेला नाही, तो या माध्यमांच्यामुळे. प्रत्यक्ष संवादाला एक मोठा पर्याय म्हणून सोशल मीडियाकडे बघितले जाते. त्यातही व्हिडीओ कॉलिंगसारख्या व्यवस्था निर्माण झाल्यानं संवाद अधिक सुकर झाला. हा अभ्यासही म्हणतो की, माणसं चांगल्या अर्थानं जोडणं सोशल मीडियामुळे अधिक सहज शक्य झालं आहे.https://www.loksatta.com/coverstory-news/mobile-addiction-1510946/

आता इंटरनेट हे केवळ एक करमणुकीचे साधन राहिलेले नसून त्याद्वारे लाखो लोक आज पैसा कमवत आहेत.

कित्येक बिसनेस या इंटरनेटच्या भरवश्यावर चालत आहेत. इंटरनेट हा पैसे कमवण्याचा खूप चांगला मार्ग होतो आहे.इंटरनेट आता एक ग्लोबल प्लॅटफॉर्म झालंय ज्याच्या माध्यमातून तुम्ही लाखो-करोडो लोकांन्पर्यंत सहज पोहोचू शकता. यामुळे तुमचं नेटवर्क मजबूत होतं आणि त्यामुळे तुमच्या बिझनेसला चालना मिळते.ऑनलाईन पैसा कमविण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी काही पद्धती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांंच्या माध्यमातून तुम्ही देखील पैसे कमवू शकता.

१. ई-बुक लिहिणे :

ऑनलाईन पैसे कमविण्यात ई-बुक तुमची मदत करू शकते. आज जगातील कित्येक लेखक याच माध्यमातून पैसे कमवत आहेत. जर तुम्हाला लिहिण्याच छंद असेल आणि तुम्हाला हे वटत असेल की ते इतरांना आवडेल तर तुम्हाला ई-बुक नक्की लिहायला हवी.तुम्ही तुमची ई-बुक अमेझॉन किंडल आणि अॅपल आय-ट्युन्स कनेक्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर विकू शकता.तुम्हाला फक्त तुमच्या लिहिण्याच्या शैलीवर फोकस करायचा असतो आणि त्यानंतर तुमच्या  मार्केटिंगवर. जर हे तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि खूप पैसा कामवाल.सध्या तर लोक जास्तकरून ई-बुक वाचण्यालाच प्राथमिकता देतात त्यामुळे मार्केटिंगसाठी तुम्हाला काही खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाही.

२. ब्लॉगिंग :

हा इंटरनेटद्वारे पैसे कमविण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. आजच्या युगात दर दुसरी व्यक्ती ही स्वतःला ब्लॉगर मानते, कारण त्यांचा इंटरनेटवर ब्लॉग असतो. पण नुसताच ब्लॉग असल्याने काही होत नाही.जर तुम्हाला हे कळालं असेल की त्या ब्लॉगच्या भरवश्यावर तुम्ही जगू शकता आणि त्यासाठी तुम्ही मेहनत घेत असाल तरच तुम्ही एक ब्लॉगर आहात.जर तुम्ही तुमच्या ब्लॉग्स मुळे तुमच्या वाचकांना स्वतःच्या ब्लॉगवर येण्याकरिता आकर्षित करू शकत असाल, जर तुम्ही त्यांच्या फायद्याचं काही त्यांच्या समोर मांडू शकत असाल तर नक्कीच तुमच्या ब्लॉगद्वारे तुमच एक मोठं नेटवर्क तयार होऊ शकतं.ब्लॉग बनविण्याआधी हे सुनिश्चित करा की तुम्ही तुमच्या ब्लॉग वाचणाऱ्या वाचकांना तुमच्या ब्लॉगवर रोज खिळवून ठेवू शकाल.कारण हे इंटरनेटचं युग आहे. इथे दर सेकंदाला वाचक बदलतात.

३. ई-मेल मार्केटिंग :

ई-मेल मार्केटिंग हा तर इंटरनेटवरील व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे. ज्या लोकांना ऑनलाईन व्यवसाय करायचा आहे, त्यांना ईमेलद्वारे मजबूत नेटवर्किंग उभारण्याचं ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे.हो पण हे सुनिश्चित करून घ्याला की तुमचे सबस्क्रायबर डायरेक्टली तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगवर साईन इन करतील, त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल.

४. ऑनलाईन ट्युटोरिअल :

ऑनलाईन ट्युटोरिअल हे घर बसल्या काम करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.जर तुम्ही एखाद्या विषयात चांगले असाल किंवा तुम्ही काही असं करू शकत असाल जे इतरांना शिकायला आवडेल तर तुम्ही देखील ऑनलाईन ट्युटोरिअल सुरु करू शकता.

५. यूट्युब :

सध्याच्या पिढीला युट्युबचं जाम वेड लागलंय! प्रत्येकजण युट्युब चा चाहता झालाय…कधी गाणी, कधी फनी विडीओ आणि बरंच काही. त्यासोबतच तुम्ही तुमच्या बॉडीला परफेक्ट कसं बनवू शकता याच्या टिप्स, फिटनेस ट्युटोरिअल, जिम ट्युटोरिअल ज्यामध्ये ते स्वतःची आकर्षक बॉडी दाखवून तुम्ही देखील अशी बॉडी/पर्सनॅलिटी मिळवू शकता हे सांगतात. आपण मोठ्या इंटरेस्टने ते बघतो.जर तुम्ही लोकांना काहीतरी इंटरेस्टींग, एन्टरटेनिंग आणि कधी कधी काहीही विचित्र देऊ शकत असाल तर लोकं तुम्हाला वेड्यासारखे फॉलो करतील.

६. अफिलीएट मार्केटिंग :

अफिलीएट मार्केटिंग ही वेबसाईट बिझनेससाठी देवाहून कमी नाही. एक अॅफिलीएट असणे हा सर्वात लोकप्रिय आणि सोप्या पद्धतीने इंटरनेटवर पैसे कमविण्याचा मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला कुठेही भटकायची, काहीही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या क्लायंटला आणि त्याच्या कामाला सोशली प्रमोट करायचं असतं. ऑनलाईन पैसे कमविण्याचा हा एक सोपा, इंटरेस्टिंग आणि सर्वात उत्तम समजला जाणारा मार्ग आहे.

७. फ्रीलान्सर म्हणून काम करणे :

इंटरनेटवरून पैसे कमविण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. हे खूप सोपं असतं.म्हणजे जर तुम्ही एखाद्या ब्युटी प्रोडक्टचा रिव्यू चांगल्याप्रकारे देत असाल तर कुठलीही ब्युटी कंपनी तुम्हाला त्यांच्या प्रोडक्ट्सचे रिव्यू देण्यासाठी विचारू शकते! आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे किंवा फ्री प्रोडक्ट्स मिळू शकतात. असंच इतर गोष्टींच्या बाबतीतही असतं. जर तुम्ही एक चांगले फोटोग्राफर असाल तर तुमच्या फोटोसाठी देखील तुम्हाला पैसे दिले जाऊ शकतात, जर तुम्ही चांगले लेखक असाल तर तुम्हाला फ्रिलान्सर ब्लॉगर किंवा लेखक म्हणून काम करू शकता.मग इंटरनेटवर उगाचच टाईमपास करण्यापेक्षा जर त्यातून तुम्ही पैसे कमवू शकत असाल तर काय हरकत आहे…

Ejanseva Teamन्युज अपडेट
अलीकडे सोशिअल मिडीया चा वापर खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.शहरी लोकांन बरोबर गाव खेड्यातील लोकांचा हा वापर वाढत आहे. बहुतेक लोक स्मार्ट झाले आहेत. कधीकधी इच्छा असूनही सोशल मीडियापासून दूर राहणे शक्य होत नाही. सोशल मीडियाने मानवी जीवनात मोठी क्रांती आणली असली तरी त्याचे काही तोटे सुद्धा आहेत. फेसबुक,ट्वीटर,इन्स्टा,युटूब,स्नपचाट हे...
Ejanseva.com is Free Informative blog portal for all Indians. People can submit articles, content to us. We check & unique useful post publish with your name as author.
Topics - Current Affairs | Social | Politics | Agriculture | Sports | Educations | Festivals | Historical | Online Internet and many more useful
Like, Share, Follow, Subscribe, Contribute & Get Rewarded from Ejanseva Submit Article Now