Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY):प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण माहिती

गर्भवती महिलांसाठी आनंदाची बातमी आता केंद्र सरकारकडून मिळणार ५ हजार रुपये, काय आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना? जाणून घ्या अधिक माहिती.

Reshma
By Reshma
5 Min Read
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण माहिती

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

केंद्र सरकारकडून महिलांसाठी देशभरात विविध योजना राबविल्या जातात. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. गर्भवती महिलांसाठी सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana -PMMVY) नव्याने सुरु केली आहे.

पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे. आतापर्यंत करोडो महिलांसाठी पंतप्रधान मातृ वंदना योजना वरदान ठरत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गर्भवती महिला या योजनेसाठी आपल नाव नोंदवत असून त्याचा फायदा घेत आहे.असाच प्रत्येक गर्भवतीला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा फायदा व्हावा यासाठी जाणून घ्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना माहिती

Pradhan Mantri Matru Vandana Yojana Full Information: सरकार या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना ५००० रुपये आर्थिक मदत देते. पंतप्रधान मातृ वंदना योजनेंतर्गंत पहिल्यांदा गर्भवती झाल्यानंतर पोषणासाठी गर्भवती महिलेच्या खात्यात सरकार पाच हजार रुपये पाठवते. पहिला हप्ता १००० रुपये गर्भधारण झाल्यानंतर १५० दिवसांच्या आत मिळतो. तर दुसरा हप्ता २००० रूपये १८० दिवसांच्या आत मिळतो, आणि शेवटचा तिसरा हप्ता बाळाच्या जन्मानंतर त्याच्या पहिल्या लसीकरणा आधी मिळतो.

अनेक गर्भवती महिलांना केवळ आर्थिक कारणांमुळे गरोदरपणात अगदी प्रसुतीच्या टप्प्यापर्यंत कष्टाची कामे करावी लागतात. त्याचा परिणाम माता आणि बालक यांच्या आरोग्यावर होतो. यामध्ये त्यांच्या मृत्यूची शक्यता वाढत असते. असे काही घडू नये यासाठी ८ डिसेंबर २०१७ पासून राज्यात आरोग्य विभागातर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना जननी सुरक्षा योजना (JSY)अंतर्गत प्रसूतीसाठी एका महिलेला सरासरी रक्कम रु ६००० सुद्धा दिली जातील म्हणजेच १००० रु जास्त देण्यात येते.

पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा लाभ आता गरोदर महिलांना खासगी रुग्णालयांमध्येही घेता येणार आहे. यासाठी खासगी रुग्णालयांमध्येही पहिल्यांदाच माता झालेल्या महिलांना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना लाभ देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्यासाठी गरोदर महिलांना आता खासगी रुग्णालयात येण्यापूर्वी प्रथम कोणत्याही शासकीय रुग्णालयात नोंदणी करावी लागणार आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना उद्दिष्ट्ये

Pradhan Mantri Matru Vandana Yojana Objectives: केंद्र सरकार देशभरात महिला आणि नवजात बालक यांच्या भवितव्यासाठी अनेक महत्वाची पाऊल उचलत आहे. माता आणि बालक यांच्या विकासाकडे लक्ष देत सरकारने पंतप्रधान मातृ वंदना योजना सुरु केली. माता आणि बालक यांना आर्थिक मदत मिळावी हा हेतू समोर ठेवून सरकार गर्भवती महिलांना मदत करत आहे.

गर्भवती महिलांचे आणि तिच्या नवजात बालकांचे आरोग्य चांगले राहावे, बालक कुपोषित राहू नये, तसेच आई व बाळाला कुठलाही आजार होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून गर्भवती महिलांना पैसे दिले जातात. तसेच तिला सकस पुरेसा आहार मिळावा, आणि माता आणि बालक मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हि योजना महत्त्वाची ठरते.

हे हि वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra: लेक लाडकी योजना – आता आपल्या लाडक्या लेकी होणार लक्षाधीश

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पात्रता अटी

 • गर्भवती महिलेचे वय कमीत कमी १९ वर्षे असणे आवश्यक
 • या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो.
 • सरकार कडून रु.५०००/- रक्कम ३ ह्फ्त्यांमध्ये दिली जाते.
  पहिला हफ्ता १०००, दुसरा हफ्ता २०००, तिसरा हफ्ता २०००.
 • लाभार्थी महिलेचे कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्षी ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक.
 • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या स्त्रिया.
 • ४० टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या स्त्रिया.
 • दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारक स्त्रिया.
 • आयुष्मान भारतअंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील लाभार्थी स्त्रिया.
 • ई-श्रम कार्डधारक स्त्रिया.
 • किसान सन्मान निधीअंतर्गत लाभार्थी स्त्रिया.
 • मनरेगा जॉब कार्डधारक स्त्रिया.
 • गर्भवती, स्तन्यपान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती स्रिया.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कागदपत्रे

 • आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी कागदपत्र.
  (आधार कार्ड नसल्यास मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट,किसान फोटो पासबुक, यांपैकी एक)
 • माता आणि बक संरक्षण कार्ड.
 • लाभार्थी महिला बँक पासबुक प्रत.
 • बाळाच्या जन्म नोदणी प्रमाणपत्राची प्रत.
 • आर सी एच पोर्टल मधील लाभार्थांचा नोंदणी क्रमांक.
 • मोबाईल नंबर.
 • आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे.

पंतप्रधान मातृ वंदना योजनेंमुळे महिलांचे कष्ट कमी होऊन त्याना आराम मिळतो. तसेच महिलांना स्वत:ला आणि बाळाला वेळ देता येतो. अलीकडे या योजनेमुळे माता आणि बाळाच्या विकासामध्ये वाढ झाल्याची दिसून येत आहे, तसेच माता आणि बालक मृत्यूचे प्रमाण घटलेले दिसत आहे.

जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी तुमच्या जवळच्या सरकारी आरोग्य केंद्राला भेट देवून पंतप्रधान मातृ योजनेची संपूर्ण माहिती घ्या तसेच पुढील ऑफिशियल वेबसाइटववर भेट देवून संपूर्ण माहिती जाणून घ्या https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana

हे देखील वाचा : आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती

धन्यवाद.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
1 Review
 • Avatar of सोनाली पवळेसोनाली पवळे says:

  छान माहिती, शेअर केल्या बद्दल धन्यवाद.

  Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *